Periodic Assessment Test : राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची चाचणी होणार; वेळापत्रक पहा

Periodic Assessment Test : STARS प्रकल्प मधील SIG 2 (Improved Learning Assessment systems) 2.2 अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे Periodic Assessment Test (PAT) आयोजन करण्यात आले आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

$ads={1}

मूल्यांकन चाचण्यांचा मुख्य उद्देश

Periodic Assessment Test

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत  होईल, सदर चाचण्या इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

कोणत्या विषयांची व वर्गाची चाचणी होणार?

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयाच्या इयत्ता तिसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

मूल्यांकन चाचण्यांचे वेळापत्रक 

  • पायाभूत चाचणी 2023 - माहे ऑगस्ट तिसरा आठवडा
  • संकलित मूल्यमापन चाचणी 1 - माहे ऑक्टोबर 2023 शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा 2023
  • संकलित मूल्यमापन चाचणी 2 - माहे एप्रिल 2024 पहिला/दुसरा आठवडा

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. 17 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

पायाभूत चाचणीचा अभ्यासक्रम

पायाभूत चाचणी ही मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती/मुलभूत क्षमता यावर आधारित असणार आहे.

पायाभूत चाचण्यांचे माध्यम विषय

सदर चाचणी ही एकूण 10 माध्यमात होणार असून, प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता 3 री ते 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी वाचण्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - आनंदाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांना सण अग्रिम परिपत्रक - जुनी पेन्शन योजना लेटेस्ट बातमी

पायाभूत चाचणी उदेश, उपयोग व फायदे

  1. विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे.
  2. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.
  3. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.
  4. अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
  5. इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.

$ads={2}

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती परीक्षा 2024 संदर्भात महत्वाचे परिपत्रक येथे डाउनलोड करा
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुदतवाढ - येथे पहा संपूर्ण माहिती
NMMS परीक्षेसाठी येथे करा अर्ज

Post a Comment (0)
Previous Post Next Post