JNV Admission 2023: गुड न्यूज! जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशाची आणखी एक संधी, समितीने घेतला हा मोठा निर्णय!

जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) प्रवेश घेण्यासाठी  JNVST Registration Form 2023-24 ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 17 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा जवाहर नवोदय विद्यालय समितीने निर्णय घेतला असून आता दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे, तेव्हा ही सुवर्णसंधी सोडू नका.

$ads={1}

JNV Admission 2023

जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारचे 100% अनुदान मिळणारे विद्यालय असून, 6 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण या विद्यालयात मोफत दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अधिकचे प्राधान्य दिले जाते. 75% जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. 

तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5% जागा राखीव असतात. जवाहर नवोदय विद्यालय दरवर्षी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे, करिता सध्या Jawahar Navodaya Vidyalaya Registration Form 2023-24 Class 6th साठी ऑनलाईन अर्ज (Online Form) भरणे सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत देण्यात आली आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाची खास वैशिष्टे येथे पहा

लेटेस्ट अपडेट तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा - पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु

जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाइन फॉर्म - Javahar Navoday Vidhyalay Online Form

सर्व इच्छुक विद्यार्थी 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. Jawahar Navodaya Vidyalaya Online Form 2024 सत्रासाठी अर्ज भरण्यासाठी, ज्या पालकांना त्यांच्या मुलांचा प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा. किंवा आपल्या मुलाच्या शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. 

नवोदय विद्यालय अधिकृत वेबसाइट - https://navodaya.gov.in/
नवोदय विद्यालय ऑनलाईन अर्ज - येथे करा
नवोदय विद्यालय प्रवेश माहितीपत्रक 2023 - येथे डाउनलोड करा.

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now