Jawahar Navodaya Vidyalaya Registration 2023 24 : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्जाची संधी, ऑनलाइन फॉर्म, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका...

जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) प्रवेश घेण्यासाठी  जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षेसाठी JNVST Registration Form 2023-24 ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक 17 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे, तेव्हा ही सुवर्णसंधी सोडू नका.

$ads={1}

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्जाची संधी

Jawahar Navodaya Vidyalaya Registration 2023 24

जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारचे 100% अनुदान मिळणारे विद्यालय असून, 6 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण या विद्यालयात मोफत दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अधिकचे प्राधान्य दिले जाते. 75% जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. 

तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5% जागा राखीव असतात. जवाहर नवोदय विद्यालय दरवर्षी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे, करिता सध्या Jawahar Navodaya Vidyalaya Registration Form 2023-24 Class 6th साठी ऑनलाईन अर्ज (Online Form) भरणे सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 17 ऑगस्ट 2023 पर्यंत देण्यात आली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाइन फॉर्म - Javahar Navoday Vidhyalay Online Form

सर्व इच्छुक विद्यार्थी 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. Jawahar Navodaya Vidyalaya Online Form 2024 सत्रासाठी अर्ज भरण्यासाठी, ज्या पालकांना त्यांच्या मुलांचा प्रवेश घ्यायचा आहे.

त्यांनी नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा. किंवा आपल्या मुलाच्या शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइट लिंक (Official Website) या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाची वैशिष्टे

 • प्रत्येक जिल्ह्यात निवासी नवोदय विद्यालय उपलब्ध
 • मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
 • जवाहर नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण दिले जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
 • मोफत बोर्डिंग निवास व्यवस्था
 • NCC, Scouts & Guides and NSS उपलब्ध
 • विद्यार्थ्यांच्या आवड व छंद (कौशल्य) नुसार शैक्षणिक तसेच सांस्कृतिक, खेळ इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
 • Promotion of Sports & Games
 • Wide Cultural exchange through Migration Scheme

जवाहर नवोदय विद्यालयाची खास वैशिष्टे

 • JEE MAIN 2022 मध्ये 4296 students qualified
 • JEE Advanced –2022 मध्ये 1010 students qualified 
 • NEET – 2022 मध्ये 19352 students qualified 
 • दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा सर्वोत्तम निकाल (2021-22)
 • इयत्ता 10 वी- 99.71%
 • इयत्ता 12 वी - 98.93%

जवाहर नवोदय विद्यालय (JNVST) प्रवेश परीक्षा पॅटर्न 2023

इयत्ता पाचवीत (5 वीत) शिकणारे विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी मध्ये प्रवेश मिळेल.

या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असते. ज्यामध्ये एकूण 80 प्रश्न, 100 गुणांसाठी विचारले जातात. यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, भाषा चाचणी याविषयावर प्रश्न असतात.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (मागील) प्रश्नपत्रिका


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज -  https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

$ads={2}

नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइट - https://cbseitms.rcil.gov.in/nvs/
नवोदय विद्यालय प्रवेश माहितीपत्रक 2023 - येथे डाउनलोड करा.

हे ही वाचा - सरकारी कर्मचारी बातम्याकंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज पहा

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post