India Post GDS Recruitment : इंडिया पोस्ट ऑफिस (टपाल) विभागांमध्ये ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevaks (GDS) अंतर्गत इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरतीची जाहिरात निघाली आहे. याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून, पोस्ट ऑफिस भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 3 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नसून, थेट दहावीच्या गुणांवर थेट निवड करण्यात येणार आहे, तेव्हा या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घेण्यासाठी जाहिरात सविस्तर पाहूया..
$ads={1}
ग्रामीण डाक सेवकांच्या 30,041 रिक्त पदांसाठी मोठी भरती
ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevaks (GDS) अंतर्गत इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 30,041 रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यामध्ये थेट 10 वीच्या गुणांवर थेट निवड होणार आहे.
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती - पदाचे नाव
ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevaks (GDS) अंतर्गत खालील पदासाठी जाहिरात निघाली असून, एकूण 30 हजार 41 पदांची मोठी भरती निघाली आहे. त्यामध्ये खालील पदे भरण्यात येत आहे.
- शाखा पोस्टमास्टर डाक सेवक - Branch Postmaster (BPM)
- सहायक शाखा पोस्टमास्तर डाक सेवक - Assistant Branch Postmaster (ABPM) Dak Sevaks
ग्रामीण डाक सेवक आवश्यक शैक्षणिक पात्रता - GDS Educational Qualification
- माध्यमिक शाळा परीक्षा इयत्ता 10 वी (गणित आणि इंग्रजी किंवा
- निवडक विषय) विषयांसह उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक किंवा समकक्ष मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण आहे.
- स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक
- संगणकाचे ज्ञान (MS-CIT) किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती निवड प्रक्रिया
शाखा पोस्टमास्टर डाक सेवक (BPM) व सहायक शाखा पोस्टमास्तर डाक सेवक(ABPM) या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही इयत्ता 10 वी च्या गुणांवर थेट निवड करण्यात येणार आहे.
भारत पोस्ट ग्रामीण डाक सेवक GDS पगार - India Post Gramin Dak Sevaks GDS Salary
- शाखा पोस्टमास्टर डाक सेवक - Branch Postmaster (BPM) - 12,000 ते 29,380
- सहायक शाखा पोस्टमास्तर डाक सेवक - Assistant Branch Postmaster (ABPM) Dak Sevaks - 10,000 ते 24,470
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज - दिनांक 3 ऑगस्ट 2023
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - दिनांक 23 ऑगस्ट 2023
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - जिल्हा परिषद मेगा भरती अपडेट
ग्रामीण डाक सेवक आवश्यक वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग - वय 18 ते 40 वर्ष
- SC,ST उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट
- OBC प्रवर्गातील उमेदवारासाठी 3 वर्षाची सूट
ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन अर्ज सर्वसाधारण सूचना
- भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी उमेदवारांना पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी डाग विभागाकडून देण्यात आलेली जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा.
- इंडिया पोस्ट ऑफिस भरती अधिकृत वेबसाईट लिंक - https://indiapostgdsonline.gov.in/