राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19,460 पदांची मेगाभरती; अशी असेल संपूर्ण प्रक्रिया..

Zilla Parishad Bharti Maharashtra : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के  व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील (Zilla Parishad Bharti Group-C) गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19,460 पदांची मेगाभरती

Zilla Parishad Bharti Maharashtra
Zilla Parishad Bharti Maharashtra

मार्च, 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क (Group-C) मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगाभरती करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील (Zilla Parishad Bharti Group-Cगट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दिनांक 5 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज (Apply Online) करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Official Website) संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे.

सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार - Computerized Examination

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत Computerized Examination परीक्षा होणार, असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश (Admit Card) पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

परीक्षा प्रक्रिया पारदर्शकता : प्रक्रिया (IBPS) कंपनीमार्फत

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग) यांच्या माध्यमातून वारंवार आयबीपीएस (IBPS) तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावलेला आहे.

सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..

ज्यांनी मार्च, 2019 मध्ये अर्ज केलेला होता, वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास पात्र ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केलेला होता व वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.

हे ही वाचा - 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची चौथी यादी - महागाई भत्ता दर वाढला पगारात मोठी वाढ कंत्राटी तत्वावरील कर्मचारी सेवेत कायम होणार? -जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा

कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता

ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे. भरतीसाठी दोन वर्षाची सुट शासन निर्णय येथे पहा

$ads={2}

Zilla Parishad Bharti Syllabus 2023 : या भरतीसाठी प्रश्नत्रिकेचे स्वरूप, काठिण्य पातळी, अभ्यासक्रम, वेळ निश्चित करण्यात आली आहे, सदरची सविस्तर पदनिहाय माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना तयारीला लागावे लागणार आहे, सुधारित प्रश्नत्रिकेचे स्वरूप, काठिण्य पातळी, अभ्यासक्रम शासन निर्णय येथे पहा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post