RTE Admission : अखेर! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची चौथी यादी जाहीर, 'आरटीई' प्रवेशपत्र करा डाऊनलोड, डायरेक्ट लिंक..

RTE Admission : सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ४ मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करण्यात आले असून, पालकांना SMS पाठवण्यात आले आहेत.

$ads={1}

अखेर! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची चौथी यादी जाहीर

RTE Admission
RTE Admission

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३- २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक ०५/०४/२०२३ रोजी काढण्यात आली आहे.

सर्व जिल्हयांतील निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १, २ व ३ मधील सर्व बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व जिल्हयांमध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२३ पासून प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ४ मधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. 

दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ४ मधील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठविण्यात आले आहेत. प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ४ मधील बालकांचे पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसारच SMS पाठविण्यात आले आहेत.

पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती - RTE Application Status या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.

हे ही वाचा संगणक परिचालक यांना किमान वेतन  सरकारी कर्मचारी बातम्या - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज पहा

प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ४ मधील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून अॅलोटमेंट लेटरची (Allotment Letter) प्रिंट काढावी. सदर अॅलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक ०४/०८/२०२३ ते दिनांक १४/०८/२०२३ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा. 

'आरटीई'  प्रवेशपत्र करा डाऊनलोड | RTE Admit Card Download

RTE पोर्टल वर लॉटरीच्या प्रतीक्षा यादी ४ मधील निवड करण्यात आलेल्या मुलांची यादी जाहीर करण्यात आली असून,  पालकांना SMS पाठवण्यात आले आहेत. आता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पालकांना डाउनलोड करता येणार आहे, 'आरटीई' प्रवेशपत्र डाऊनलोड येथे क्लिक करा.

$ads={2}

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post