School News : बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act) नुसार, राज्यातील बालकांना आपल्या राहत्या घराजवळील शाळेत प्रवेश देऊन, प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा हक्क मिळाला आहे, मात्र काही जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी विधानपरिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सविस्तर वाचा.
$ads={1}
जिल्हा परिषदेच्या एक शिक्षकी शाळा बाबत महत्वाची अपडेट
पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये बदली झाल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 100 एक शिक्षकी शाळा बंद केल्यास, हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल, याबाबत विधानपरिषदेत मा. सदस्य श्री.सचिन अहिर, श्री. महादेव जानकर, श्री. विलास पोतनीस, श्री. सुनिल शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
ग्रामविकास विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार त्यांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पोर्टलव्दारे करण्यात आलेल्या आहेत.
मात्र पालघर जिल्हा आदिवासी बहुल असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, म्हणून सन 2017 ते 2022 मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या 486 प्राथमिक शिक्षकांना स्थायी समिती व सर्वसाधारण सभा, जिल्हा परिषद पालघर यांनी ठराव केल्यानुसार पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आजतागायत कार्यमुक्त केलेले नाही. अशी माहिती राज्याचे मा. ग्रामविकासमंत्री श्री.गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.
$ads={2}
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एक शिक्षकी शाळा बंद होणार नसून, नवीन शिक्षक भरती झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे ही वाचा - संगणक परिचालक यांना किमान वेतन - सरकारी कर्मचारी बातम्या - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज पहा