Scholarship : खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना - ऑनलाईन अर्ज येथे करा

Scholarship For Foreign Education : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील 'गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती' (Scholarship for quality education in foreign countries') योजना ही दि.०४ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आलेली आहे. 

Scholarship for foreign education

तंत्र शिक्षण संचालनालयाने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या दि.२१ जुलै २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील 'गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना' शैक्षणिक वर्ष २०२२ - २०२३ पासून सर्व शाखांमधील पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका (Post-graduate Degree And Post-graduate Program) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या १० वरुन ३० व डॉक्टरेटकरिता १० विद्यार्थी अशा एकूण ४० विद्यार्थ्यांची शाखानिहाय विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे. [शासन निर्णय]

Scholarship for quality education in foreign countries'

'गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा 

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती" या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ करिता शिष्यवृत्ती निवडीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे.

हे ही वाचा - खुशखबर! पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार; ऑनलाईन अर्ज..

तसेच online भरलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती संबंधित विभागीय कार्यालयास मूळ कागदपत्रांवरुन पडताळणी करुन सादर करण्याची मुदत दिनांक १४ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत करण्यांत आलेली आहे.

अधिकृत वेबसाईटhttps://dte.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in/

आयटीआय (ITI) पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी
राज्यातील शाळांसाठी महत्वाची अपडेट पहा

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post