Education Latest News : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय!

Education Latest News : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी देखील दिलासादायक ठरणार आहे काय आहे बातमी सविस्तरपणे पाहूया..

$ads={1}

Education Latest News

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते आणि या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते. राज्य सरकारने नुकतेच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता 5 वी आणि 8 वी  शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पात्र विद्यार्थ्यांना Educational Scholarship देण्यात येते. या शिष्यवृत्ती मध्ये तब्बल 13 वर्षानंतर भरीव वाढ करण्यात आली आहे. 

या निर्णयानुसार इ. 5 वीच्या शिष्यवृत्ती रकमेत रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती रकमेत रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 मध्ये परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी परिषदेच्या https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर दि. 1 सप्टेंबर 2023  रोजी पासून शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे ही वाचा  NMMS परीक्षेसाठी येथे करा अर्ज - आधार संचमान्यता महत्वाची अपडेट - सरकारी नोकरीच्या संधी पहा- सरकारी कर्मचारी बातम्या वाचा

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते. मात्र बऱ्याचदा ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे, विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसू इच्छित असून, देखील त्यांना परीक्षा फी किंवा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक संच खरेदी करण्यासाठी पैसे नसतात, यासाठी आता सरकारने परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड / मनपा निधीतून भरण्यासंदर्भात संबंधित जिल्ह्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत एक महत्वाचे परिपत्रक शासनाने काढले आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील या निर्णयाचा विद्यार्थी आणि पालकांना देखील दिलासा मिळाला आहे.

$ads={2}

डोळे येण्याच्या संसर्गापासून असा बचाव करा


Post a Comment (0)
Previous Post Next Post