Sanch Manyata : आधार संचमान्यता महत्वाची अपडेट ! राज्यातील या शाळा दिलासा मिळणार

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन २०२२-२३ च्या संच मान्यता शासन निर्णय दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ मधील तरतूदीनुसार वैध आधार विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्याच्या आधार करताना शाळांतील काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसणे, वारंवार प्रयत्न करुनही इनव्हॅलिड राहणे. अशा प्रकारच्या अडचणी येत होत्या, त्याचा परिणाम शाळांच्या मंजूर पदावर होऊ शकतो, यासाठी आता शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील या शाळा दिलासा मिळणार

Sanch Manyata

आधार संच मान्यता : ज्या शाळांची आधार वैध विद्यार्थी संख्या ९० टक्के पेक्षा अधिक आहे त्या शाळांना  शाळेत नियमित येत असलेल्या विद्यार्थ्याचे केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांना विचारात घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शाळांना दिलासा मिळाला असून, शिक्षक संख्या देखील टिकवून राहण्यास मदत होणार आहे.

तसेच सन २०२२-२३ या वर्षाच्या संच मान्यतेसाठी संदर्भ दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ अशी विचारात घेवून संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. मात्र अद्यापही काही शाळांच्या बाबतीत दि.३०.११.२०२२ रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यापैकी काही विद्यार्थ्यांचे अन्य शाळेमत झालेले स्थलांतर, शाळेत गैरहजर असल्याने शाळेने पटावरून नाव कमी करणे (Out of School), विद्यार्थ्याची दुबार नोंद असणे, अशा विद्यार्थ्यांची पडताळणी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या मार्फत करण्यात येईल व शाळेतून नाव कमी केलेले विद्यार्थी नियमित येत नसल्याची खात्री पटल्यानंतर गटशिक्षणाधिकारी लॉगीन वर अपडेट करता येणार आहे.

असे करता येईल अपडेट

शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्याना संच मान्यतेतून कमी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर Sanch Manyata या मेनूमध्ये Sanch Manyata Rejection 2022-23 यावर क्लिक केल्यानंतर, संबंधित शाळेचा Udise Code सुविधा नमुद केल्यानंतर Search Button वर क्लिक केल्यानंतर पात्र विद्यार्थ्याच्या नावासमोरील शेवटच्या Rejection Status आलेली या रकान्यातील चौकोना टिक करावे व त्यानंतर Reject यावर क्लिक करावे. या प्रमाणे कार्यपध्दती असेल. काही विद्यार्थी शाळेत नियमित येत असतील आणि त्याचा आधार इनव्हॅलीड असेल तर अशा विद्यार्थ्याचे नांव या सुविधेच्या आधारे कमी करण्यात येवू नये. असे कळविण्यात आले आहे. सध्यस्थितीत ज्या शाळांचे दि.३०/११/२०२२ रोजीच्या पटाचे आधार वैधते प्रमाण ८५ टक्के पेक्षा कमी आहे अशाच शाळांना ही सुविधा देण्यात आली आहे. [सविस्तर परिपत्रक येथे डाउनलोड करा]

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 संदर्भात महत्वाचे परिपत्रक येथे डाउनलोड करा
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुदतवाढ - येथे पहा संपूर्ण माहिती
NMMS परीक्षेसाठी येथे करा अर्ज

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post