HAL Recruitment 2023 : आयटीआय (ITI) पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी ! HAL कडून 647 जागासाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी

HAL Recruitment 2023 : आयटीआय (ITI) कोर्स उत्तीर्ण उमेदवारांसाठी तसेच पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिसच्या तब्बल 647 पदांसाठी Hindustan Aeronautics Limited (HAL) कडून भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. तेव्हा इच्छुक व पात्र उमेदवारांना अवश्य या संधीचा लाभ घेता येईल.

$ads={1}

आयटीआय (ITI) पास ते पदवीधरांना सुवर्णसंधी - HAL Recruitment 2023

HAL Recruitment 202

Hindustan Aeronautics Limited (HAL) ही भारतातील एक प्रमुख एरोस्पेस कंपनी आहे. ही कंपनी विमान, हेलिकॉप्टर आणि संबंधित यंत्रणांचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि देखभाल संबंधित कार्य करते. तसेच तांत्रिक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वित्त आणि प्रशासकीय (Technical, Engineering, Management, Finance And Administrative) भूमिकांसह विविध विषयांमधील विविध पदांसाठी भरती करते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या 647 जागासाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे.

पदाचे नाव व संख्या : Hindustan Aeronautics Limited (HAL) ने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार पदवीधर अप्रेंटिसच्या 13 पदासाठी 186, डिप्लोमा अप्रेंटिसच्या 9 पदांसाठी 111 आणि आयटीआय (ITI) अप्रेंटिसच्या 16 पदांसाठी 350 अशा एकूण 647 जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज दिनांक 23 ऑगस्ट 2023 पर्यंत मागविण्यात आले आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ITI अप्रेंटिस साठी पदानुसार नुसार संबंधित विषयातील पात्रता जाहिरातीमध्ये दिलेल्याप्रमाणे उमेदवाराने धारण करणे आवश्यक आहे.

सविस्तर वाचा - तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा

मानधन (Stipend) : पदवीधर अप्रेंटिससाठी 9000 रुपये, डिप्लोमा अप्रेंटिससाठी आणि ITI अप्रेंटिससाठी 8000 रुपये Stipend भत्ता देण्यात येणार आहे.

$ads={2}

नोट : संबंधित पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा.

अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post