IBPS PO Recruitment 2023 : बॅकेत अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 3049 जागांसाठी मेगा भरती, ऑनलाईन अर्ज येथे करा

IBPS PO Recruitment 2023 : बॅकेत अधिकारी पदावर नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मध्ये 3 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मेगा भरतीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना तब्बल 11 बॅकामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 3049 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे.

बॅकेत अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी! 

IBPS PO Recruitment 2023

आयबीपीएसने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासुन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. Probationary Officers And Management Trainees ह्या पदांसाठी दिनांक 21ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

$ads={1}

या आयबीपीयस भरतीमध्ये उमेदवारांना तब्बल 11 बॅकामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये Bank of Baroda, Bank of India, Bank of Maharashtra, Canara Bank, Central Bank of India, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab National Bank, Punjab & Sind Bank, UCO Bank, Union Bank of India इ बॅकाचा समावेश आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. किंवा शासनमान्य संस्थेतुन पदवीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराला संबंधित पदावर काम करण्याचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे.अणि  भरतीसाठी निर्धारित करण्यात आलेल्या सर्व अटी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा

  • सदर भरतीसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी किमान 20 अणि जास्तीत जास्त 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • नियमाप्रमाणे आरक्षित गटातील उमेदवारांसाठी आवश्यक ती वयोमर्यादेत सुट देखील देण्यात आली आहे.

तब्बल 3 हजार जागांसाठी मेगा भरती

बॅकेत एकुण 3049 पदांसाठी Probationary Officers And Management Trainees इत्यादी पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 जागांसाठी भरती केली जाणार आहे तसेच बॅक ऑफ इंडिया मध्ये 224 तर कॅनरा बँकेत 500 जागा भरण्यात येणार आहेत. यासोबतच पंजाब सिंध बॅकेत 125 अणि पंजाब नॅशनल बँक मध्ये 200 जागांसाठी ही भरती करण्यात येईल. [संपूर्ण तपशील पहा]

बँक व संवर्गनिहाय 3049 जागांचा तपशील पहा

महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाईन अर्ज सुरूवात - दिनांक 1 ऑगस्ट 2023
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - दिनांक 21 ऑगस्ट 2023
$ads={2}

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक
प्रोबेशनरी ऑफिसर - जाहिरात PDF येथे पहा
बँक व संवर्गनिहाय 3049 जागांचा तपशील पहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post