कौशल्य प्रशिक्षण : यशस्वी करिअरची गुरुकिल्ली; कौशल्य प्रशिक्षण मिळविण्यासाठी 'येथे' करा नोंदणी

Skill Training : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARATHI) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास (Skill Development Training) प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार (Employment And Self-employment) मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.  जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.

$ads={1}

मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम - यशस्वी करिअरची गुरुकिल्ली

Skill Training

'सारथी' (SARATHI) च्या लक्षीत गटातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या प्रवर्गाच्या एकूण 20,000 उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती (Employable After Skill Training) रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) देण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यामधून स्किल इंडिया (Skill India Portal) पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता 5 स्टार, 4 स्टार व 3 स्टार ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विहीत प्रक्रियेचा अवलंब करून प्रशिक्षण राबविले जाणार आहे.

विहीत कोर्स निहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या पात्र 18 ते 45 वयोगटातील उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

लेटेस्ट- सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19,460 पदांची मेगाभरती; अशी असेल संपूर्ण प्रक्रिया..

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर, 175 श्रेयस चेंबर, पहिला मजला, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई 400001 येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी 022-22626440 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य प्रशिक्षण मिळविण्यासाठी 'येथे' करा नोंदणी

कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम (Skill Training And Courses) मागणी नोंदविण्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या लिंकवर भेट देऊन उमेदवारांनी नोंदणी करावी.

$ads={2}

हे ही वाचा - 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची चौथी यादी - महागाई भत्ता दर वाढला पगारात मोठी वाढ जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश ऑनलाईन अर्ज
Post a Comment (0)
Previous Post Next Post