National Education Policy 2020 : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ठळक यश; या टॉप 10 उपक्रमांची स्थिती काय?

Highlights of New National Education Policy 2020 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक (National Education Policy) धोरणाला दिनांक 29 जुलै 2023 रोजी तीन वर्ष पूर्ण झाले आहेत, नुकतीच नई दिल्ली येथे दोन दिवसीय अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या तीन वर्षामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महत्वाचे कार्यक्रम शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत, याबद्दलचे टॉप 10 उपक्रमांची सद्यस्थिती काय आहे? याबद्दल सविस्तरपणे पणे जाणून घ्या..

$ads={1}

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ठळक यश; या टॉप 10 उपक्रमांची स्थिती काय?

National Education Policy
National Education Policy

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शालेय शिक्षण संदर्भात विविध शैक्षणिक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शालेय शिक्षण अंतर्गत महत्वाचे एकूण 12 शैक्षणिक कार्यक्रम (उपक्रम) सद्यस्थिती पाहूया..

1. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइझिंग इंडिया - Pradhan Mantri Schools for Rising India (PM Shree) 

प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइझिंग इंडिया - Pradhan Mantri Schools for Rising India (PM Shree) ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना असून शाळांना याद्वारे अधिक उत्कृष्ट कामगिरी करण्याकरता सक्षम केले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व श्रेणीतील शाळा म्हणजे प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा निवडल्या जातील ज्याचे रूपांतर आदर्श शाळा म्हणून केले जाईल. 2022-23 ते 2026-27 या पाच वर्षांच्या कालावधीत ही योजना राबवण्याचा निर्धार आहे. पहिल्या टप्प्यात 30 राज्य/केंद्रशासित प्रदेश/संस्थांमधील एकूण 6448 शाळा (म्हणजे केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालये) यामध्ये समाविष्ट केल्या जातील. (पीएम श्री शाळा योजना सविस्तर पहा)

2. निपुण भारत (Nipun Bharat)

Nipun Bharat : विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्यासाठी राष्ट्रीय योजना (निपुण भारत) - मुलांमध्‍ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे , म्हणजे तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलांना साधा मजकूर वाचणे आणि समजून घेणे आणि सोपे अंकगणित करणे यावे हा यामागील उद्देश आहे. हे नैपुण्य हा भविष्यातील कोणत्याही शिक्षणासाठी किंवा कौशल्यासाठी महत्त्वाचा पाया मानला जातो.(निपुण भारत शासन निर्णय पहा)

3. विद्या प्रवेश (Vidya Pravesh)

विद्या प्रवेश : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, NCERT ने 'इयत्ता पहिलीसाठी विद्या प्रवेश' नावाचे 3 महिन्यांचे बालनाट्यावर आधारित 'शालेय तयारी मॉड्यूल' विकसित केले आहे. या मॉड्युलमध्ये प्रामुख्याने इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी 12 आठवड्यांच्या विकासाच्या दृष्टीने मुलांची पूर्व-साक्षरता, पूर्व-संख्याज्ञान, संज्ञानात्मक आणि सामाजिक कौशल्ये वाढवण्यासाठी योग्य सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत, सिक्कीम, मणिपूर आणि केरळ वगळता 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी वर्ष 2022-23 पासून विद्या प्रवेश लागू केला आहे. या अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 8,77,793 शाळांमधील 1,80,13,930 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे .

4. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (National Curriculum Framework)

मूलभूत स्तरावरील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCFFS) 20 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आला, हा भारतातील 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठीचा पहिला एकात्मिक अभ्यासक्रम आराखडा आहे. NEP 2020 ने शालेय शिक्षणासाठी तयार केलेल्या 5+3+3+4 ‘अभ्यासक्रम आराखडा आणि शैक्षणिक’ रचनेची ही फलनिष्पत्ती आहे. त्यानंतर, NCF FS वर आधारित जादुई पिटारा : अध्ययन अध्यापन साहित्य सामग्री 20 फेब्रुवारी 2023 रोजी सुरु करण्यात आले. 3 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांसाठी तयार केलेली ही खेळावर आधारित शिक्षण सामग्री आहे. (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा PDF पहा)

5. पारख (PARAKH)

PARAKH (Performance Appraisal, Review and Analysis of Knowledge for Holistic Development) : कामगिरीचे मूल्यांकन, आढावा आणि समग्र विकासासाठी ज्ञानाचे विश्लेषण (PARAKH) हे NCERT अंतर्गत 8 फेब्रुवारी 2023 रोजी स्थापित केलेला  स्वतंत्र स्तंभ आहे. त्या अंतर्गत मूलभूत आणि पूर्वतयारीच्या टप्प्यासाठी समग्र प्रगती पुस्तकासह मूल्यांकन सुधारणा आणि शिक्षणाचे फलित साध्य करण्याबाबत विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे . मूलभूत आणि पूर्वतयारी टप्प्यावर समग्र प्रगती पुस्तक या संकल्पनेची अंमलबजावणी 2023-24 वर्षापासून करण्यासाठी अंतिम रूप देण्यात येत आहे.

6. राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर (NDEAR)

राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर National Digital Education Architecture (NDEAR) : शैक्षणिक परिसंस्थेला नवसंजीवनी देऊन प्रेरणा देण्यासाठी एकत्रित राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा (National Digital Infrastructure) निर्माण करणे हे NDEAR चे उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षण परिसंस्थेतील क्षमतांचा लाभ घेण्यासाठी आणि कौशल्य आणि शिक्षणामध्ये अभिनव कल्पनांचा अंतर्भाव करण्यासाठी एनडीईएआर हा एक उत्तम दुवा आहे.एनडीईएआर अंतर्गत 1500 हुन अधिक मायक्रो कोर्सेस, 5 अब्ज पेक्षा अधिक शैक्षणिक सत्र, 12 अब्ज हुन अधिक QR कोड, 20K+ परिसंस्थांचा सहभाग, विविध लिंक्ड बिल्डिंग ब्लॉक्समध्ये 15हजार पेक्षा अधिक मायक्रो सुधारणा सुरु आहेत.

7. पीएम ई-विद्या (PM e-Vidya)

पीएम ई-विद्या (PM e-Vidya) : एक सर्वसमावेशक उपक्रम असलेल्या PM e-Vidya अंतर्गत डिजीटल/ऑनलाईन/ऑन-एअर (Digital/online/on-air Education) शिक्षणासाठी बहुविध पद्धती राबवण्यात आल्या. यामध्ये अंतर्भूत असलेले उपक्रम पुढीलप्रमाणे 

दीक्षा  Diksha 

दीक्षा - माहितीच्या देवाणघेवाणीसाठी डिजीटल पायाभूत सुविधा (Digital Infrastructure for Information Sharing) शालेय शिक्षणासाठीचा हा ‘एक राष्ट्र, एक डिजीटल’ ('One Nation, One Digital') प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये 3.17 लाखांहून अधिक ई-सामग्री असून, 36 भाषांमध्ये (29 भारतीय भाषा आणि 7 परदेशी भाषा) 6,600 प्रेरणादायी पाठ्यपुस्तकांचे स्टोअरहाऊस अर्थात भांडार आहे. 

ज्यात सरासरी दैनिक पृष्ठसंख्या 2.2 कोटी पेक्षा अधिक आहे आणि ते भारत सरकारने अधिसूचित केलेल्या 4 डिजिटल सार्वजनिक वस्तूंपैकी एक आहे. 7000 हून अधिक कार्यक्रमांसह 12 स्वयंप्रभा डिटीएच वाहिन्यांच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्गाच्या अंतर्गत एक टीव्ही चॅनेल उपक्रम, रेडिओ/कम्युनिटी रेडिओ प्रसारण/मोबाईल पॉडकास्ट 4000 हुन अधिक अभ्यासक्रम आधारित रेडिओ कार्यक्रम (इयत्ता 1-12) 398 रेडिओ स्टेशन्सवर प्रसारित/प्रसारण केले गेले.

11 ज्ञानवाणी एफएम रेडिओ स्टेशन, 255 कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स, आणि 132 ऑल इंडिया रेडिओ स्टेशन, iRadio आणि JioSaavn मोबाईल अॅप्सवरील पॉडकास्ट आणि iRadio वर 2900 पेक्षा जास्त थेट कार्यक्रम प्रसारित केले गेले आहेत. 

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी, तसेच दृष्टीहीन आणि ऐकू न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेत डिजीटल रुपातील माहिती Digital Form In Sign Language (DAISY) उपलब्ध करुन देण्यात आली. 4200 पेक्षा अधिक भारतीय सांकेतिक भाषा Indian Sign Language (ISL) आधारित आशयसामग्री, टॉकिंग पुस्तके (Daisy स्वरूपात) आणि 3860+ ऑडिओ पुस्तके विकसित केली गेली आहेत. सर्व 10,000 भारतीय सांकेतिक भाषांमधील शब्द, शब्दकोश DIKSHA वर अपलोड केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, ऐकू न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेचा वापर करुन एक डिटीएच वाहिनी (DTH channel) सुरु करण्यात आली.(दीक्षा APP कसे वापरावे पहा)

8. एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP)

Integrated Teacher Education Program (ITEP): एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम हा कार्यक्रम (ITEP) भारतीय तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, प्रादेशिक शिक्षण संस्था आणि सरकारी महाविद्यालये यांचा समावेश असलेल्या 41 केंद्रीय/राज्य विद्यापीठ/संस्था, शैक्षणिक सत्र 2023-24 पासून कार्यान्वित करतील. एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम हा दुहेरी प्रमुख कार्यक्रम आहे-पहिले म्हणजे शालेय स्तरावरील प्राविण्य आणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाखेतील प्राविण्य.

9. शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके (NPST)

National Professional Standards for Teachers (NPST): शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके NPST हे गुणवत्तेचे दुसरे नाव आहे आणि त्याद्वारे वेगवेगळ्या टप्प्यांवर/स्तरांवर शिक्षकांची क्षमता परिभाषित केली जाते तसेच त्या क्षमतांवर आधारित कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. हितसंबंधींशी व्यापक सल्लामसलत, क्षेत्रीय स्तरावरील संशोधन आणि यथार्थ विचार विनिमय करून मार्गदर्शक दस्तऐवज विकसित केले गेले आहे.

10. राष्ट्रीय मार्गदर्शक मोहीम  (NMM)

राष्ट्रीय मार्गदर्शक मोहीम  (National Mission for Mentoring) : NMM मोहिमेअंतर्गत व्यावसायिक मार्गदर्शकांच्या द्वारे शालेय शिक्षकांच्या क्षमता वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाणार आहे. हितधारकांशी व्यापक सल्लामसलत, क्षेत्रीय स्तरावरील संशोधन आणि योग्य विचारविनिमय करून "ब्लूबुक ऑन मेंटॉरिंग" विकसित केले गेले. त्यानंतर, NMM देशभरातील 30 केंद्रीय सरकारी शाळांमध्ये (15 केंद्रीय विद्यालये 10 जवाहर नवोदय विद्यालये, आणि 5 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) प्रायोगिक तत्त्वावर चालवले गेले. आतापर्यंत, 60 मार्गदर्शकांनी ऑनबोर्ड मार्गदर्शन केले असून मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यासाठी वेब पोर्टल कार्यान्वित केले जात आहे. (जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश ऑनलाईन अर्ज)

11. विद्यांजली पोर्टल (Vidyanjali Portal)

विद्यांजली पोर्टल (Vidyanjali Portal) : समुदाय/स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रमाला पाठबळ देते. याद्वारे समुदाय/स्वयंसेवक हे  त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये सामायिक करण्यासाठी तसेच मालमत्ता/साहित्य/उपकरणे या स्वरूपात योगदान देण्याकरता त्यांच्या आवडीच्या शाळांशी संवाद साधून त्यांच्याशी थेट संपर्क साधतात. सध्या, देशातील एकूण 4,76,412 शाळांचा यात सहभाग असून त्यात एकूण 4,19,485 स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. 55,61,193 बालकांना याचा लाभ होतो आहे.

12. नव भारत साक्षरता कार्यक्रम (ULLAS)

नव भारत साक्षरता कार्यक्रम ULLAS (Understanding of Lifelong Learning for All in Society) : समाजातील सर्वांसाठी आजीवन शिक्षणाची समज "जन - जन साक्षर": सर्वांसाठी शिक्षण (पूर्वी प्रौढ शिक्षण म्हणून ओळखले जाणारे), "नव भारत साक्षरता कार्यक्रम किंवा उल्लास" या विषयावर केंद्र प्रायोजित योजना, भारत सरकारने 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व निरक्षरांवर लक्ष्य केन्द्रित केले आहे. एनईपी 2020 च्या अनुषंगाने आर्थिक वर्ष 2022-23 ते 2026-27 या कालावधीत अंमलबजावणीसाठी 1037.90 कोटी रुपयांची मंजूरी दिली आहे. ही योजना स्वयंसेवकाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

$ads={2}

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश ऑनलाईन अर्ज
NMMS परीक्षा ऑनलाईन अर्ज 

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post