सूत्रसंचालन - प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

सूत्रसंचालन हे कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजनातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर कार्यक्रम यशस्वी आणि लोकप्रिय बनवायचा असेल, तर योग्य सूत्रसंचालक म्हणजेच अँकरची निवड करावी लागते. कार्यक्रम कितीही मोठा किंवा छोटा असो सर्व काही सूत्रसंचालकावर अवलंबून असते. प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे? या संदर्भातली महत्त्वाची मराठी माहिती आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

सूत्रसंचालन - प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

एक सूत्रसंचालक अँकर तेव्हाच चांगला मानला जातो, जेव्हा श्रोते त्याला पसंत करतील.{alertInfo}

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्याला करायचे आहे. कधी तरी आपल्यावर कार्यक्रमांमध्ये Sutrasanchalan करण्याची वेळ आली असेल किंवा आपण सूत्रसंचालन करण्यासाठी तयार असाल परंतु चांगले सूत्रसंचालन कसे करावे? हे मात्र कळत नसेल तर यासाठी आजच्या आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे


प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्याही प्रकारचा एक विशिष्ट गुण असतो. आपल्याला अँकरिंग करायचे आहे. पण सूत्रसंचालन कसे करावे? हे सुचत नाहीये किंवा जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा सर्व काही विसरून जाते. 

सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तींसोबत या गोष्टी होणे स्वाभाविक आहे. कारण असा यशस्वी सूत्रसंचालक एकही नसेल की त्याला या समस्यांना सामोरे जावे लागले नसेल, (तुम्हाला असा एखादा वक्ता माहिती आहे जो कधीही अयशस्वी झाला नाही?)  प्रत्येक यशस्वी अँकर या समस्यांना सामोरे गेलेलाच आहे. मात्र या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्याकडे एक पर्याय आहे. एक यशस्वी सूत्रसंचालक होण्यासाठी आपल्याला एक उपाय करावा लागणार आहे आणि तो म्हणजे सराव-सराव-सराव सूत्रसंचालन हे भाषण कलेचे एक विशिष्ट रूप आहे. ते सरावाने सहज शक्य होते.

श्रोते तुम्हाला यशस्वी होताना बघू इच्छितात अयशस्वी नाही !{alertSuccess}

आपण जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या सेल्फी कॅमेराने स्वतःच सूत्रसंचालन करून पहावे किंवा आरशासमोर सूत्रसंचालन करून पहावे. जोपर्यंत आपण व्यवस्थित सूत्रसंचालन करत नाही तोपर्यंत हा सराव सुरू ठेवावा त्यासोबतच छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये जिथे संधी मिळेल त्या संधीच सोन आपण करावं.

सूत्रसंचालन -  सूत्रसंचालकामध्ये आवश्यक असणारे गुण

ANCHOR या शब्दामध्येच दडलेल्या आहे की, एका यशस्वी सूत्रसंचालकामध्ये कोणते गुण असायला हवेत. उत्तम सूत्रसंचालकाने काय करायला हवे?

A - Applies Mind - लगेच बुद्धीचा वापर करता येणे.

कार्यक्रमाच्या प्रसंगी लगेच आपल्याला परिस्थितीवर आपल्या बुद्धीचा वापर करता येणे. म्हणजे एखाद्या वेळेस जर नियोजनानुसार एखादी व्यक्ती व्यासपीठावर आली किंवा बसण्याचा क्रम किंवा स्वागताचा क्रम बदलला असेल तर अशावेळी आपल्याला व्यासपीठासमोरील बसलेल्या प्रेक्षकांना न कळता ही परिस्थिती आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता यायला हवी.

N - Novelty - नविन पद्धती, मार्ग शोधून काढणे.

कार्यक्रमासाठी आलेले प्रेक्षक वर्ग म्हणजे व्यासपीठांसमोरील बसलेला सर्व श्रोता वर्ग यांना प्रभावित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पद्धती शोधून काढता यायला हव्यात. कोणताही श्रोता हा कोणताही वक्ता किंवा सूत्रसंचालक अयशस्वी व्हावा असा विचार न करता त्याने व्यवस्थित बोलावे असेच प्रत्येकाला वाटत असते. तेव्हा स्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी नवीन पद्धती किंवा मार्ग शोधून काढायला हवे.

C - Comedy - श्रोत्यांना हसवण्याची क्षमता

श्रोत्यांना जर कार्यक्रमांमध्ये रमवून ठेवायचे असेल, सर्वांनी कार्यक्रम संपेपर्यंत थांबायला हवे असे आपल्याला वाटत असते अशावेळी सर्वात महत्त्वाची भूमिका ही सूत्रसंचालकाकडे असते म्हणजे एखाद्या वेळेस वक्त्यांचे भाषण जर रटाळ पद्धतीचे झाले तर सूत्रसंचालक त्यावेळी आपल्या सूत्रसंचालक शैली मधून श्रोत्यांना हसवण्याची क्षमता सूत्रसंचालकाकडे हवी की जेणेकरून श्रोते शेवटपर्यंत थांबू शकतील.

यासाठी आपण शेरो-शायरी, चारोळ्या, एखादी गोष्ट किंवा एखादा किस्सा सांगून श्रोत्यांना हसवू शकता.

H - Homework - सूत्रसंचालन पूर्वतयारी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची तयारी करण्यासाठीचा हा महत्त्वाचा भाग आहे कार्यक्रम कोणता आहे कोठे आहे कधी आहे ? कार्यक्रमांमध्ये कोणते पाहुणे येणार आहेत? कार्यक्रमाचा प्रारंभ ते समारोप या दरम्यान करावयाचे सूत्रसंचालन त्यासंबंधीची संपूर्ण पूर्वतयारी सूत्रसंचालकाने करून घ्यायला हवी. त्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे मुद्दे लिहून काही चारोळ्या, शेरोशायरी, सुविचार देखील लिहून घ्यावे. आणि त्याचा व्यवस्थित सराव करायला हवा.

O - Originality - सूत्रसंचलनाची नैसर्गिक शैली 

बरेचदा असं होतं की, जेव्हा आपण सूत्रसंचालन करायला जातो तेव्हा आपण कोणाची तरी कॉपी करत असतो. ज्या यशस्वी अँकर ला आपण फॉलो करत आहात. त्या अँकर ची आपण कॉपी करतो. त्यामुळे आपण जे सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी पार पडत असतो. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी समोरच्या श्रोत्यांना चटकन लक्षात येतात. यासाठी आपण आपल्या शैलीमध्ये सूत्रसंचालन करायला हवे म्हणजे आपण जसे सामान्यपणे बोलतो अगदी त्याप्रमाणेच आपण सूत्रसंचालनामध्ये आवाजातील चढ-उतार, लय या गोष्टीचा विचार करून बोलायला हवे.

R - Ready For Show - नेहमी तयार असणे.

जेव्हा आपल्याला कोणत्याही कार्यक्रमांमध्ये, कधीही संधी मिळेल तिथे नेहमी तत्पर राहून कोणत्याही भूमिकेमध्ये जाऊन सूत्रसंचालन करता यायला हवे यासाठी आवश्यक आहे. सराव-सराव-सराव

>> सकारात्मक विचार कसा करावा? | आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र

सूत्रसंचालनाचे नियोजन कसे करावे?

  • सर्वप्रथम कार्यक्रमाची संबंधित पूर्ण माहिती आणि रूपरेषा आधीच माहिती करून घ्या.
  • आयोजकांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी मध्ये अवश्य सहभागी व्हा त्यामुळे तुमची त्या कार्यक्रमाच्या प्रत्येक पैलूशी ओळख होईल.
  • कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार आणि वेळेनुसार तुम्हाला मध्ये मध्ये किती वेळ मिळणार आहे त्यानुसार सूत्रसंचालनाची तयारी करा.
  • कार्यक्रमामधील प्रमुख पाहुणे आणि श्रोते यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांची थोडक्यात माहिती घ्या.
  • कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनावेळी अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी घ्या.
  • कार्यक्रमामधील श्रोते वर्ग यांचा वयोगट, शैक्षणिक पार्श्वभूमी, आवड, मानसिकतेचा एक अंदाज घेऊन त्यानुसार तयारी करा.
  • कार्यक्रमाचा उद्देश समजून घेऊन त्यानुसार शब्दरचना सामग्री गोळा करा आणि त्याची व्यवस्थित मांडणी करा.
  • सूत्रसंचालन करत असताना नकारात्मक किंवा कडवट अप्रिय शब्दांचा अजिबात वापर करू नका.
  • सूत्रसंचालन करतेवेळी धार्मिक विवादास्पद मुद्दा किंवा विषय या विषयावर बोलणे टाळा.
  • सूत्रसंचालन करतेवेळी हाव-भाव, आवाजातील चढ-उतार याकडे लक्ष द्या त्यासोबतच माईक व्यवस्थित पकडा किंवा स्टँड ला लावा.
  • सूत्रसंचालनाची पूर्वतयारी करण्यामध्ये आपण केलेल्या पूर्ण कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार स्वतःच्या मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड करून त्याचा सराव करा. किंवा मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याचा एकदा सराव करा.
  • कार्यक्रमाच्या दिवशी ड्रेस कोड म्हणजेच कपड्यांची निवड योग्य करा. स्नेहसंमेलन असेल तर त्या दृष्टीने आपला पेहराव असावा किंवा इतर प्रशासकीय शाळा स्तरावरचा कार्यक्रम असेल तर त्यानुसार आपले कपडे परिधान करा.

उत्तम सूत्रसंचालकाने काय करायला हवे?  | यशस्वी सूत्रसंचालनासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • एक स्वतःची डायरी तयार करा आणि त्यामध्ये चांगले सुविचार, कविता, महापुरुषांचे उदगार, किस्से, कथा, गोष्टी, विनोद,  चारोळ्या, शायरी इत्यादींचा संग्रह करण्यास सुरुवात करा. जो की आपल्याला सूत्रसंचालनाच्या वेळी मदत करेल.
  • संधी मिळेल तेथे त्या संधीचा लाभ घ्या. अगदी छोटीशी बैठक असो किंवा कार्यक्रम त्यामध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी घ्या हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल.
  • सूत्रसंचालन करतेवेळी पाहुण्यांचे नाव, पद आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या संदर्भातली माहिती अचूक द्या.
  • कार्यक्रमाच्या उद्देशानुसार आपले हावभाव, आवाज, ड्रेस कोड, उभे राहण्याची आणि बोलण्याची शैली योग्य असू द्या.
  • आपल्यामध्ये असणारा विशेष गुण त्याला आपली ताकद बनवा. उदा. तुम्ही चांगले गात असाल तर गा, विनोदी किस्से सांगत असाल तर श्रोत्यांना हसवा.

तुमची तयारी किती आहे हे फक्त तुम्ही जाणता

श्रोते तुम्हाला यशस्वी होताना बघू इच्छितात अयशस्वी नाही

तुम्हाला असा एखादा वक्ता माहिती आहे जो कधीही अयशस्वी झाला नाही?

सूत्रसंचालक प्रत्यक्ष आणि एक वक्ता असतो.

एक सूत्रसंचालक अँकर तेव्हाच चांगला मानला जातो जेव्हा श्रोते त्याला पसंत करतील.

हे सुद्धा वाचा

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post