ITI Students Stipend : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! विद्यावेतन म्हणून दरमहा मिळणार 'इतके' रुपये..

ITI Students Stipend : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहोत, तसेच  सर्व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या मर्यादेत आहे. त्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे.

विद्यावेतन म्हणून दरमहा मिळणार 'इतके' रुपये

ITI Students Stipend

आयटीआय विद्यार्थ्यांना आता 500 रूपये विद्यावेतन (Stipend) सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू करणार असल्याचे उत्तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक संधीची माहिती देण्याकरिता कायमस्वरूपी हेल्पलाईन व ईमेल सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलत होते.

कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावे राज्यात 288 मतदारसंघातील 260 ठिकाणी शिबीर पार पडले. यामध्ये 1 लाख 74 हजार युवक युवतींनी सहभाग घेतला, यामध्ये 15 हजार 493 पालकांनी सहभाग घेतला. 

तसेच ज्या आस्थापनांमध्ये  नोकरभरती होणार आहे, त्यासाठीदेखील समन्वय साधून रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी जॉब कार्डबाबतही माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. पुणे व ठाणे येथे इंडस्ट्री मीट घेतली होती, अशी माहिती कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या चर्चेत विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

बालसंगोपन सुधारित योजना (रुपये २७०००) येथे पहा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post