PM Young Achievers Scholarship : खुशखबर! पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार; ऑनलाईन अर्ज..

PM Young Achievers Scholarship : विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने एक महत्वाची 'यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम' (Young Achievers Scholarship Award Scheme) शिष्यवृत्ती योजना आणली आहे, यामध्ये जवळपास देशभरातील तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांची निवड करून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे 75000 रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

$ads={1}

PM Young Achievers Scholarship

'यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम' : National Testing Agency (NTA) च्यावतीने PM Young Achievers Scholarship Scheme (पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्किम) म्हणजेच यशस्वी योजना 2023 आहे. या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ही यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती रक्कम : यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम मध्ये देशभरातील तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांची निवड करून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे 75000 रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप : ही परीक्षा एकूण 100 गुणांची होणार असून, 100 प्रश्न असणार आहे. तर प्रत्येक प्रश्नांसाठी एक गुण असणार आहे. यासाठी अडीच तासाचा वेळ असणार आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना अभ्यासक्रम (PM Yashasvi Scholarship Syllabus 2023) : या परीक्षेसाठी गणित, विज्ञान, सामाजिक शास्र आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न असणार असून, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असणार आहे. यासाठी प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असणार आहे. 

  1. गणित (Mathematics) - एकूण प्रश्न 30 (गुण 30)
  2. विज्ञान (Science) - एकूण प्रश्न 25 (गुण 25)
  3. सामाजिक शास्र (Social Science) - एकूण प्रश्न 25 (गुण 25)
  4. सामान्य ज्ञान (General Awareness/Knowledge) - एकूण प्रश्न 20 (गुण 20)

एकूण प्रश्न 100 - एकूण गुण 100

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक : या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची दिनांक 29 सप्टेंबर 2023 वार शुक्रवार या दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता : यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम शिष्यवृत्ती योजना ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC), अर्ध-भटक्या जमाती (DNT/NT/SNT) संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावी. तसेच इयत्ता 9 वी, 10 वी आणि 11 मध्ये शिकत असलेले विद्यार्थी या यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतात.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - तलाठी भरती महत्वाची अपडेट बातमी - पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु - दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी

पीएम यशस्वी (PM Yashasvi Scholarship) शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख Last Date To Apply 2023 पीएम यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना https://yet.nta.ac.in/ या वेबसाईटवर दिनांक 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

$ads={2}

हे ही वाचा - शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात मोठा निर्णय-  NMMS परीक्षेसाठी येथे करा अर्ज

Post a Comment (0)
Previous Post Next Post