Maharashtra Teacher News : राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रत्येकी 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरु झाली आहे, या स्पर्धेसाठी अटी, व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे विषय सविस्तर पाहूया..
राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ११ मे २०२३ नुसार शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक प्रशिक्षक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुली स्पर्धा २०२३-२४ चे शासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या चळवळीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे ई-साहित्य हे राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे साठी संदर्भीय तसेच अध्ययन पूरक ठरणार आहेत. https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या लिंकवर क्लिक करून सदरच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना या प्रणालीवर आपले नामांकन करता येईल तसेच या प्रणालीवर स्पर्धेबाबतचा सर्व तपशील व निकष उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सदर लिंक सुरु असणार आहे.
हे ही वाचा - लेटेस्ट जुनी पेन्शन योजना बातमी - कंत्राटी कर्मचारी ताज्या बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या
दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये, तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्पर्धेबाबतच्या सविस्तर निकष देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत लवकरच निर्गमित केले जातील. तरी जास्तीत जास्त शिक्षक/ मुख्याध्यापक / शिक्षक प्रशिक्षक यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. [शासन निर्णय येथे पहा]