Krushi Sevak Recruitment 2023 : राज्यात कृषी सेवकांच्या 952 जागांसाठी बंपर भरती, अभ्यासक्रम, जाहिरात PDF डाउनलोड करा

Krushi Sevak Recruitment 2023 : राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात 75 हजार जागांची मेगा भरती सुरु आहे, कृषी विभागात आता गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, तब्बल 952 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.

$ads={1}

राज्यात कृषी सेवकांच्या 952 जागांसाठी बंपर भरती

Krishi Sevak Recruitment 2023

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद  विभागाच्या अधिनस्त असलेल्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परिक्षेव्दारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

कृषी सेवक पगार

कृषी सेवक पगार : कृषि विभागातील कृषि सेवकांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या असलेल्या रु.६०००/- या निश्चित वेतनात तब्बल 10,000/- रुपयांची भरघोस वाढ करून आता  रु.१६०००/-  प्रमाणे मानधन कृषी सेवकांना मिळणार आहे.

कृषी सेवक पदांचा तपशील

  • औरंगाबाद – 196
  • नाशिक – 336
  • लातूर – 170
  • कोल्हापूर – 250

कृषी सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता

  • कृषी सेवक या पदासाठी उमेदवार हा कृषी पदविका डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी धारक असावा.
  • कृषी सेवक पदासाठी संगणकांची परिपूर्ण माहिती असलेल्या MS-CIT कोर्स पूर्ण असणे किंवा नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षात MS-CIT कोर्स पुर्ण करणे आवश्यक आहे.
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी - जाहिरात पहा

कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा

सरकारी भरती साठी शासनाने वेळोवेळी ठरवलेली कमीत कमी १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष (आरक्षण व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त ४५ वर्षापर्यंत)  वयोमर्यादा लागू आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज कृषी विभागाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. सविस्तर जाहिरात, अर्ज करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पध्दत, ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना इत्यादी बाबी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्ररीत्या प्रसिद्ध करण्यांत येणार आहेत.

कृषी सेवक अभ्यासक्रम, जाहिरात PDF डाउनलोड करा

१) औरंगाबाद विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Aurangabad Recruitment 2023
२) नाशिक विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Nashik Recruitment 2023
३) लातूर विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Latur Recruitment 2023
४) कोल्हापूर विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Kolhapur Recruitment 2023

कृषी सेवक अभ्यासक्रम, जाहिरात PDF डाउनलोड करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post