तलाठी भरती परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; या दिवशी प्रवेश पत्र (Hall Ticket) उपलब्ध होणार

Talathi Bharti : राज्यातील तलाठी सरळसेवा भरती २०२३ बऱ्याच दिवसपासून प्रलंबित असणारी जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली असून, तलाठी भरती परीक्षा दिनांक दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणार असून, ही परीक्षा सलग १९ दिवस चालणार आहे. याबाबत भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

$ads={1}

Talathi Bharti

परीक्षेचा फॉर्म भरून देखील बऱ्याच उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) वेळेत उपलब्ध होत नाही किंवा बऱ्याचदा परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांना माहित होते, अशा काही घटना मागील वन विभागाच्या परीक्षेदरम्यान घडल्या आहेत. मात्र आता तलाठी भरतीचा अर्ज केलेल्या उमेदवारांनी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन अपडेट राहणे आवश्यक आहे.

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (Group-C) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दि. २६ जून २०२३ रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असणार आहे. सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. 

तलाठी भरती परीक्षेची वेळ

  1. सत्र १ ले - सकाळी ९.०० ते ११.०० 
  2. सत्र २ रे - दुपारी १२.३० ते २.३०
  3. सत्र ३ रे - सायंकाळी - ४.३० ते ६.३०
$ads={2}

तलाठी भरती परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) या दिवशी उपलब्ध होणार

Talathi Bharti Hall Ticket : तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे (Exam Center) नाव परीक्षेच्या किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तलाठी भरती परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपुर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे.

सविस्तर वाचा - तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा

हे ही वाचा - राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी - लेटेस्ट जुनी पेन्शन योजना बातमी - कंत्राटी कर्मचारी ताज्या बातम्या

तलाठी भरती - हॉल तिकीट संदर्भात अत्यंत महत्वाचे

सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे. असे भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

तलाठी सरळसेवा भरती प्रसिद्धीपत्रक येथे डाउनलोड करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post