RTE Admission Latest News : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह; नवीन अपडेट काय आहे? जाणून घ्या..

RTE Admission Latest News: शैक्षणिक वर्ष 2024 25 साधारणपणे 15 जून पासून सुरू होते, यंदा मे महिना संपत आला तरी आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रलंबित आहे. आता पुन्हा नवीन प्रश्नचिन्ह आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत निर्माण झाले आहे, नवीन अपडेट काय आहे? जाणून घ्या..

$ads={1}

RTE Admission Latest News

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या स्थगितीमुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे आर टी ई प्रक्रिया राबवल्यास इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत 25% जागा ह्या रिक्त असणे आवश्यक आहे, मात्र या शाळांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्यामुळे त्या शाळेत आता 25 टक्के जागा कशा भरता येऊ शकेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्यामुळे आता या संदर्भात राज्य शासन काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे अजून तरी काही दिवस पालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आरटीई  25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत यावर्षी पहिल्यांदाच शासनाने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यातील RTE प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.

त्यानुसार या विरोधात जाऊन पालक संघटनांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असता न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

त्यांनतर आरटीई पोर्टलवर सुद्धा पालकांसाठी सूचना निर्गमित केल्या असून, सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत निकालांच्या तारखा व निकाल येथे जाहीर होणार

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये RTE Act 2009 अंतर्गत 25% जागा ह्या आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

मात्र यंदा बदललेल्या नियमानुसार RTE Admission Official Website https://student.maharashtra.gov.in/पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करताना इंग्रजी माध्यमाच्या शाळाच दिसत नसल्याचे स्पष्ट झाले होते.

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज पुन्हा कधी सुरु होणार, येथे पहा

शिष्यवृत्ती रक्कम आता या बँक खात्यात जमा होणार

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post