MahaHsscBoard Result 2024 : दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत निकालांच्या तारखा व निकाल येथे जाहीर होणार

MahaHsscBoard Result 2024 : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट अशी आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रक जारी केले असून, १० वी आणि १२ वी परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे.

$ads={1}

MahaHsscBoard Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२4 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी, १२ वी) परीक्षा घेण्यात आली होती.

बारावीचा निकाल मे महिन्याच्या (दि २५) तारखेला

मागील सन २०२३-२३ या वर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या (दि २५) तारखेला (दु २ वाजता) जाहीर करण्यात आला होता, तर दहावीचा निकाल (दि 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला होता. आता या वर्षीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

दहावी-बारावी निकाल तारखा : सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका!

MahaHsscBoard Result 2024 :  इ. १० वी. व १२ वी. च्या विद्यार्थी पालक, शिक्षक यांना कळविण्यात येते की, Social Media ‌द्वारे इ. १० वी. व १२ वी. च्या २०२४ च्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरविण्याचे प्रयत्न होत आहेत. तरी सर्व संबंधित घटकांनी, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, निकालांच्या तारखा राज्यमंडळातर्फे https://mahahsscboard.in या अधिकृत संकेत स्थळावर कळविण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.

बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास येथे पहा निकाल

दहावी-बारावीचा निकाल कोठे व कसा पाहता येईल? | HSC SSC Result 2024 Official Website

  • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (HSC SSC Exam Result 2024 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - mahresult.nic.in
  • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
  • Step 3 : तुमच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
  • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
  • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा.

दहावी-बारावीचा निकाल या तारखेला जाहीर होणार

यंदा लोकसभा निवडणुकीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने, त्यापूर्वीच लोकप्रिय मीडिया रिपोर्टनुसार १२ वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर चौथ्या आठवड्यात १० वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अधिकृत कोणतीही घोषणा केली नाही.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह; नवीन अपडेट

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्ती रक्कम आता या बँक खात्यात जमा होणार

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post