महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे निर्देश; नवीन परिपत्रक जारी

Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 नुसार राज्यातील खाजगी शाळेत वंचित व दुर्बल गटातील बालकांसाठी नवीन प्रवेशाच्या 25% राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे.

RTE Admission Latest News

मात्र यंदा या नियमामध्ये दि. ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार मोठे बदल करण्यात आले होते, मात्र या अधिसुचनेविरूद्ध मा. उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका तसेच इतर संलग्न रिट याचिका दाखल झालेल्या असून, आता मा. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

$ads={1}

आरटीई प्रवेश संदर्भात चार आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश 

सदर प्रकरणाची पुढील सुनावणी दि. १२ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली असून मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी चार आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम लागू होते वेळी राज्यामध्ये असणारी अनुदानित शाळांची संख्या, सद्यस्थितीत राज्यामध्ये असणारी अनुदानित शाळांची संख्या (जिल्हानिहाय / तालुकानिहाय) याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती सादर करतेवेळी राज्यामधील ज्या अनुदानित शाळामध्ये प्रवेशासाठी जास्त मागणी असते अशा शाळांची माहिती स्वतंत्रपणे मागविली आहे. 

परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश

दि.७ मे  २०२४ रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिनांक ०९.०२.२०२४ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने संचालनालयाचे दिनांक ६ मार्च २०२४ आणि दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

दहावी-बारावीच्याअधिकृत निकालांच्या तारखा व निकाल येथे जाहीर

आरटीई प्रवेश प्रक्रीया यापूर्वीचा नियमानुसार करण्याबाबत निर्देश

तथापि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सन २०२४-२५ या वर्षाची आरटीई प्रवेश प्रक्रीया यापूर्वीचा नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल आरटीई पोर्टलवर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. 

आरटीई प्रवेश प्रक्रीया राबविण्यासाठी या शाळांचा समावेश 

तसेच जनहित याचिका दि.०७.०५.२०२४ रोजी झालेले आदेश विचारात घेऊन दिनांक ०६.०३.२०२४ च ०३.०४.२०२४ रोजीची परिपत्रके रद्द करुन स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वयंअर्थसहाय्यीत शाळा) यांचा समावेश करुन आरटीई प्रवेश प्रक्रीया राबविण्यासाठी नव्याने परिपत्रके निर्गमित करण्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे निर्देश 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची  तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. आता लवकरच याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करून RTE पोर्टल वर पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. (परिपत्रक

आरटीई प्रवेश प्रक्रिया या तारखेपासून नव्याने सुरू होणार

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह; नवीन अपडेट

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post