मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर, शिष्यवृत्ती रक्कम आता या बँक खात्यात जमा होणार

Scholarship 2024 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) या परीक्षेचा (Scholarship Result 2024) अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, आता लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासंबंधी अटी व शर्ती निश्चित करणेबाबत शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे.

$ads={1}

Scholarship 2024

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२४ चा अंतरिम निकाल प्रसिध्द करण्यात आलेला आहे. गुणपडताळणी करणेकरीता संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

शिष्यवृत्ती रक्कम आता या बँक खात्यात जमा होणार

आता नवीन नियमानुसार मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण) शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. असा नवीन बदल करण्यात आला आहे. (शासन शुद्धीपत्रक)

सरकारी नोकरीची संधी, 5 हजारहून अधिक जागांसाठी नवीन भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर..

शालेय शिष्यवृत्ती रकमेत भरघोस वाढ

राज्यातील शालेय विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय गतवर्षी राज्य शासनाने घेतला आहे. उच्च प्राथमिक शाळा (Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) व माध्यमिक शाळा (Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)  इयत्ता 5 वी आणि 8 वी  शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पात्र विद्यार्थ्यांना Educational Scholarship देण्यात येते. या शिष्यवृत्ती मध्ये तब्बल 13 वर्षानंतर ही भरीव वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

‘आरटीई’ जागांची अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद ;प्रवेश प्रक्रिया पूर्वीसारखीच होणार

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post