महत्वाची अपडेट! इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

English Medium School Admission : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

$ads={1}

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

English Medium School Admission

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई या कार्यालयास दि. 31 मे,2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती रक्कम आता या बँक खात्यात जमा होणार

आरटीई २५ टक्के ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद ;प्रवेश प्रक्रिया पूर्वीसारखीच होणार

दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार बदललेल्या RTE नियमाच्या विरोधात मुंबई मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, आता त्यानुषंगाने RTE  Portal सुरु असलेल्या ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात आता पालकांकरीता सूचना (2024-2025) देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत निकालांच्या तारखा व निकाल येथे जाहीर होणार

त्यानुसार RTE २५% अंतर्गत online प्रवेश प्रक्रियेचे (2024-25) अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. अशी सूचना पोर्टल वर देण्यात आली आहे, त्यामुळे आता सध्या RTE ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आले असून, सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच यासंदर्भात नवीन पुन्हा नव्याने अर्ज सुरु होऊ शकतील, यासाठी आता पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज पुन्हा कधी सुरु होणार, येथे पहा

मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी, नवीन नियमावली जाहीर

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post