RTE Admission 2024 : आरटीई अंतर्गत २५ टक्के च्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्वाची अपडेट, अशी आहे की, दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार बदललेल्या RTE नियमाच्या विरोधात मुंबई मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, आता RTE Portal वरील सूचनेनुसार आरटीई 25 टक्के प्रवेशासंदर्भात अर्ज भरण्याची लिंक बंद करण्यात आली आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
आरटीई २५ टक्के अंतर्गत खाजगी शाळा वगळण्याचा निर्णय स्थगित
शिक्षण हक्क कायदा (RTE ACT 2009) नुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा शासनाने काढलेल्या अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ नुसार नियमात बदल करण्यात आले होते.
त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्ष 2024 25 वर्षातील प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेल तरच अशा विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला होता, त्यामुळे यंदा RTE प्रवेशासाठी पालकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला, या निर्णयाच्या विरोधात मा. उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली असता, आता या बदललेल्या नियमाला स्थगिती देण्यात आली आहे.
इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
‘आरटीई’ जागांची अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद ;प्रवेश प्रक्रिया पूर्वीसारखीच होणार
मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या अनुषंगाने आता RTE Portal सुरु असलेल्या ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात आता पालकांकरीता सूचना (2024-2025) देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार RTE २५% अंतर्गत online प्रवेश प्रक्रियेचे (2024-25) अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. अशी सूचना पोर्टल वर देण्यात आली आहे, त्यामुळे आता सध्या RTE ऑनलाईन अर्ज बंद करण्यात आले असून, सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच यासंदर्भात नवीन पुन्हा नव्याने अर्ज सुरु होऊ शकतील, यासाठी आता पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शिष्यवृत्ती रक्कम आता या बँक खात्यात जमा होणार
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल; अधिसूचना जारी
महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.