मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी, नवीन नियमावली जाहीर

Technical Diploma Educational Admission New Rules : शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थांतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी देण्यात आली आहे.

$ads={1}

Technical Diploma Educational Admission New Rules

शैक्षणिक वर्ष सन 2024 25 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थांतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीत बदल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत निकालांच्या तारखा व निकाल येथे जाहीर होणार

तसेच वास्तुकला परिषद यांच्या अखत्यारित असलेल्या संस्थांतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. वास्तुकला पदविका आणि फार्मसी कौंसिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांतील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीत [Maharashtra State Technical Diploma Educational Institutions (Admission) Rules, 2019] मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. (अभ्यासक्रमांची नवीन प्रवेश नियमावली पहा)

कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दिलासा

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post