Mahavitaran Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी, 5 हजारहून अधिक जागांसाठी नवीन भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर..

Mahavitaran Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Mahavitaran) मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक (Electrical Assistant), कनिष्ठ सहाय्यक Junior Assistant पदाच्या तब्बल 5 हजार 815 जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, विशेष म्हणजे या पदाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर सेवेत सामावून घेण्यात येते.

$ads={1}

कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर 'या' नियमित पदावर समायोजन

Mahavitaran Bharti 2024

महावितरण अंतर्गत वेतनगट-४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहेत.

या पदाचा ३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना 'तंत्रज्ञ' (Technician) वा नियमित पदावर सामावून घेण्यात येणार आहे.

विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७५०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.

विद्युत वितरण कंपनीत 5 हजारहून अधिक जागांसाठी मेगा भरती

  • पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
  • एकूण जागा - 5347
  • पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts)
  • एकूण रिक्त जागा : 468

सदर कालावधीत देण्यात येणार  मानधन

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.

  1. प्रथम वर्ष - एकूण मानधन रुपये १५,०००/-
  2. द्वितीय वर्ष - एकूण मानधन रुपये १६,०००/०
  3. तृतीय वर्ष  - एकूण मानधन रुपये १७,०००/- 

उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल, भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.

गुड न्यूज! रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित; शासन आदेश

आवश्यक शैक्षणिक अर्हता - Mahavitaran Recruitment Educational Qualification

दिनांक २९/१२/२०२३ रोजी विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदासाठी खालील शैक्षणिक अहर्ता पूर्ण असणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीण प्रमाणपत्र किया तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एलेक्ट्रीक कटर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री, तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts) पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.Com/BMS/BBA With MSCIT or its Equivalent.

मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी, नवीन नियमावली जाहीर

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०/०५/२०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्याकरीताची वेबलिंक, रिक्त पदे, शेक्षणिक अर्हता, अटी व शती, सविस्तर जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश; या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post