RTE Gazette 2024 : महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल; अधिसूचना जारी

RTE Admission Maharashtra 2024 25 : RTE Act 2009 शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. पुढील वर्षातील (सन 2024-25) या वर्षाकरिता आता आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल करण्यात आला असून, तशी अधिसूचना (RTE Gazette) जारी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

$ads={1}

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2024 25 | RTE Admission Maharashtra 2024 25

RTE Gazette 2024

आरटीई 25 टक्के अंतर्गत नविन प्रवेशित मुलांसाठी 25 टक्के जागा या राखीव असतात. दरवर्षी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. 

पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेशासाठी राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार (RTE Gazette 2024) नुसार आता नियमात काही बदल करण्यात आले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ (२००९ चा ३५) च्या कलम ३८ मधील उप कलम (१) आणि (२) नुसार प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारास अनुसरून आणि यासंदर्भात इतर प्रदत्त शक्तीनुसार महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार (RTE Gazette 2024) महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ सुधारित करण्यासाठी खालील नियम तयार करण्यात आले आहे.

  1. या नियमांस महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (सुधारित) नियम, २०२४ असे म्हणावे.
  2. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मधील नियम ४ (यापुढे सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल.) उप नियम (५), नंतर खालील शर्तीचा समावेश करावा, जसे की-
  3. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पद्धत) नियम, २०१३ नुसार वंचित व दुर्बल घटकातील २५ टक्के प्रवेशाकरीता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही.
  4. नियम ८ च्या उप नियम (२), नंतर खालील शर्तीचा समावेश करावा, जसे की-
  5. नियम ४ च्या उप नियम (५) खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदानित शाळा कलम १२ च्या उप कलम २ नुसार प्रतिपूर्तीकरिता पात्र ठरणार नाही.

म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता RTE 25% प्रवेश मिळणार नाही.

बारावी बोर्ड परीक्षेस शेवटची 10 मिनिटे वाढवून मिळणार

RTE प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा मागील 2023 मधील वयोमर्यादा पहा

RTE Gazette 2024

विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षकांचीही परिक्षा घेतली जाणार

सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

मुलींसाठी 5 सरकारी योजना

Post a Comment (0)
Previous Post Next Post