Body building Competition : शरीर सौष्ठव स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांनी क्रीडा रसिकांची मने जिंकली

Bodybuilding Competition

Body building Competition : शिवकालीन खेळांचा वारसा, आपली संस्कृती जपण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे  पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे. 

या अंतर्गत भायखळा येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ११४  शरीर सौष्ठवपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यात ७ दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग होता. त्यांनी क्रीडा रसिकांची मने जिंकली.

२६ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२४ या दरम्यान मुंबईमध्ये विविध ठिकाणी सदर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत.  हा क्रीडा महाकुंभ पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून, स्पर्धेत स्पर्धकांकडून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला जात आहे.

दिव्यांग कल्याण विभागाचा आढावा, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश

या स्पर्धेमध्ये लेझीम ,लगोरी, मल्लखांब, लंगडी, रस्सीखेच, विटी दांडू, कबड्डी, खो-खो ,फुगडी, ढोल ताशा पथक असे सांघिक खेळ तर मल्लखांब, पावनखिंड दौड ,पंजा लढवणे, मल्ल युद्ध, दंड बैठक, दोरीच्या उड्या, अशा वैयक्तिक स्पर्धा होत आहेत.

अखेर! राज्यातील शाळांची वेळ बदलली! आता ‘या’ वेळेत भरणार शाळा
Post a Comment (0)
Previous Post Next Post