माझी शाळा निबंध मराठी | My School Essay in Marathi

शाळा स्तरावर आपण विद्यार्थी असाल तर, निबंध लेखन आकर्षक होण्यासाठी आपण माहिती गोळा करीत असतो. परीक्षेच्या दृष्टीने निबंध लेखन चांगले होण्यासाठी सार्वजनिक स्पर्धा , स्पर्धा-परीक्षा अशा विविध कारणांसाठी आपण निबंध लेखन करण्यापूर्वी माहिती गोळा करतो. आजचा आपला विषय असणार आहे. माझी शाळा या विषयावर आपणाला या लेखात Majhi Shala Nibandh Marathi या विषयावर निबंध वाचायला मिळणार आहे. माझी शाळा विषयासंबंधित माहिती निबंध लेखन , भाषण , माहिती गोळा करणे किंवा आठवणीतील माझी शाळा म्हणून अवांतर वाचन यासाठी देखील आपण माझी शाळा या विषयावर आपल्याला वाचायला मिळेल. आज आपण विविध इयत्ता आणि वेगवेगळ्या मुद्यानुसार माझी शाळा निबंध मराठी (My School Essay in Marathi) या विषयावर लेखन करणार आहोत. 

माझी शाळा निबंध मराठी
 My School Essay in Marathi


{tocify} $title={Table of Contents}

माझी शाळा निबंध मराठी | My School Essay in Marathi

माझी शाळा निबंध लिह्ण्यापुर्वी आपण कोणत्याही विषयाचा निबंध लिहण्यासाठी तयारी कशी करावी? किंवा निबंध लेखन कसे करावे? निबंध कसा लिहावा? प्रथम  याविषयीची माहिती वाचूया. जेणेकरून आपणास निबंध लेखन करण्यासाठी मदत होऊ शकेल.

निबंध लेखन मराठी कसे करावे?

शालेय स्तरापासून ते विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा पर्यंत निबंध लेखन करण्याची गरज भासते? निबंध लेखनाचे विविध प्रकार आहेत. 

मराठी निबंधाचे प्रकार – Types of Essay 

मराठी निबंधाचे प्रकार- कथनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक निबंध , वर्णनात्मक निबंध, प्रसंगलेखन (प्रासंगिक/वर्णनात्मक निबंध), आत्मकथन, मनोगतप्रधान, वैचारिक निबंध, चर्चात्मक निबंध इत्यादींचे वर्णन संबंधित निबंध प्रकारामध्ये करावे लागते {alertSuccess}

  • परीक्षेच्या दृष्टीने किंवा विविध स्पर्धेच्या निमित्ताने निबंध लेखन तयारी करण्याआधी ज्या निबंध प्रकारचे आपणाला चांगल्या प्रकारे लेखन करता येईल ते आधीच ठरवून घ्यावे.
  • निबंध लेखन म्हणजे भाषेची चांगल्या प्रकारे रचना करता येणे आवश्यक असते. यासाठी वाचन , मनन , चिंतन  आणि प्रत्यक्ष  लेखन सराव करणे आवश्यक असते. लेखन करताना संबंधित विषयाला प्रत्यक्ष वस्तुस्ठीतीला धरून वर्तमानातील अनुभवाची जोड द्यावी. 
  • निबंध लेखनामध्ये व्याकरणाला खूप महत्व आहे. तेव्हा  व्याकरणीय दृष्ट्या हस्ताक्षर , विरामचिन्हांचा योग्य तिथे वापर करावा. 
  • दिलेल्या शब्दमर्यादेनुसार योग्य मुद्यांची तयारी करून लेखन करावे. आकर्षक सुरुवात , कविता, सुविचार , चारोळ्या यांचा वापर करता येईल परंतु अतिशयोक्ती करू नये. 
  • निबंध लेखन सुरुवात , मध्य आणि शेवट या भागात योग्य निबंध लेखनाच्या विषयाप्रमाणे घटनांचे वर्णन करून शेवटी निष्कर्ष अवश्य लिहावा.
  • निबंध लेखन करताना वेळ, काळ, स्तर लक्षात घेऊन निबंध लेखन करावे.उदा. परीक्षेसाठी दिलेल्या वेळेत आणि शब्द मर्यादेत लेखन करावे. तर सार्वजनिक निबंध लेखन स्पर्धेत त्यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीचा विचार करून लेखन करावे. 
  • निबंध लेखन करताना संबंधित घटना किंवा वस्तूचे वर्णन करताना शब्दा द्वारे वाचकांच्या सवेंदना जागृत होतील आणि वाचकांना वाचण्यास उत्सुकता वाटेल असे, रंजक पद्धतीने निबंध लेखन हे निबंध लेखनाच्या प्रकारानुसार करावे. जसे- कथनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, वर्णनात्मक निबंध, प्रसंगलेखन, आत्मकथन, वैचारिक निबंध
  • परीक्षेमध्ये निबंध लेखन करताना ज्या विषयाचे आपणास चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. तो विषय आपण निबंध लेखनासाठी निवडावा.
  • निबंध लेखन करताना विषयाचे उपमुद्दे तयार करून त्यानुसार त्याला आपल्या अनुभवाची जोड देवून लेखन करावे.
 माझी शाळा निबंध मराठी (My School Essay in Marathi) 

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी – 10 Lines on My School in Marathi

माझी शाळा या विषयावर निबंध लेखन करत असताना निबंध कसा लिहावा? यासाठी निबंधाचे पुस्तक किंवा इंटरनेट वरील माझी शाळा निबंध लेखनाचा मजकूर कॉपी करू नये, थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकाने आपापल्या म्हणजेच माझ्या शाळेतील शाळेतील अनुभव , माझ्या शाळेबद्दलची माहिती डोळ्यासमोर ठेवून निबंध लेखन करावे.आपण सध्या विद्यार्थी असाल तर निबंध लेखन हे वर्तमान काळातील असू शकेल, किंवा आपण कॉलेज किंवा इतर नोकरदार वर्ग किंवा पालक असाल आणि स्वतः स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माझी शाळा विषयी माहिती शोधत असाल तर भूतकाळातील आठवणी आणि वर्तमानाची जोड देवून माझी शाळा निबंध लेखन करावे. यासाठी निबंध लेखन पुस्तक किंवा गुगल वर माझी शाळा निबंध बद्दल माहिती वाचून निबंध कसा लिहावा? माझी शाळा निबंध मराठी लेखन कसे करतात? इतर माहिती , शाळेविषयी मुद्दे संकलन करून स्वतःच्या शब्दात निबंध लेखन केल्यास नक्कीच आपणास यश मिळेल. चला तर आपणाला माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी  (10 Lines on My School in Marathi) या विषयावर १० ओळीमध्ये माझी शाळा निबंध खालीलप्रमाणे आपण यामध्ये आपली शाळा डोळ्यासमोर ठेवून परिच्छेद मध्ये याचे रुपांतर करून घ्यावे.

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी – 10 Lines on My School in Marathi

  1. माझ्या शाळेचे नाव ------------ असून माझी शाळा ISO मानांकित एक प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक आदर्श शाळा आहे.
  2. माझी शाळा ग्रामीण भागात असून सर्व सुविधा डीजीटल पद्धतीने  शिक्षण देणारी पंचक्रोशीतील एकमेव शाळा आहे. 
  3. माझ्या शाळेत सुसज्ज वर्गखोल्या , बसण्यासाठी बेंच , बोलक्या भिंती , डिजीटल सुविधा , शाळेच्या परिसरात मोठे क्रीडांगण , स्वतंत्र स्वचालय , पिण्याचे पाणी , खेळाचे साहित्य असणारी माझ्याच गावातील माझी आवडती शाळा आहे.
  4. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आमची काळजी घेतात. माझे गणित विषयाचे शिक्षक मला खूप आवडतात. गणिताची चांगली तयारी करून घेतात. 
  5. माझ्या शाळेत राष्ट्रीय सण तसेच महापुरुषांच्या जयंती , दिनविशेष  कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये आम्ही सहभागी होतो.
  6. वर्षभरातील माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा ,पावसाळ्याच्या दिवसातील शाळा मला खूप आवडते.
  7. माझ्या शाळेतील सहल कोकण येथे गेली होती. त्यावेळी मी पहिल्यांदा जिल्हा बाहेर प्रवास करून पुस्तकातले कोकण प्रत्यक्ष अनुभवले, तो क्षण माझ्या शाळेतील अविस्मरणीय क्षण आहे. 
  8. माझ्या शाळेतील वकृत्व स्पर्धेतील माझ्या शालेय जीवनातील माझे पहिले भाषण मी माझ्या आजोबांकडून लिहून घेतले होते. आणि हुबेहूब पाठ करून पहिले भाषण केले होते. त्यावेळी माझा शाळेत द्वितीय क्रमाक आला होता.
  9. माझ्या शाळेतील माझ्या अभ्यासापैकी मला गणित विषय खूप आवडतो.
  10. कोरोना काळात मुलांना शाळेपासून वंचित राहावे लागले, मात्र शाळेतील शिक्षणाची जागा ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण आहे. शाळेतील शिक्षणाला ऑनलाईन शिक्षणाची जोड सध्याच्या काळात आवश्यक आहे.

शाळा हे ज्ञानमंदिर आहे. भविष्यात आपण करणार आहोत? कोणत्या क्षेत्रात कारीयर करणार किंवा आपण कसे कसे नागरिक असू? यामध्ये महत्त्वाचा वाटा हा शाळेचा असतो. शाळेतून मिळणारे शिक्षण हे उद्याचे भविष्य असते. असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेला अनन्यसाधारण महत्व आहे. शाळेतूनच आपल्या कलागुणांना वाव मिळत असतो आणि त्यानुसार आपण पुढे घडत जातो. अशा या पवित्र महान शाळेविषयी माझी शाळा या विषयावर मनसोक्त व्यक्त होऊया. My School in Marathi या विषयावर आपण आपल्या अनुभवाप्रमाणे माझी शाळा Marathi Nibandh लिहावा. माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी (10 Lines on My School in Marathi) , माझी शाळा इयत्ता पहिली , दुसरी, तिसरी, चौथी , पाचवी, सहावी, सातवी , आठवी, नववी , दहावी , अकरावी आणि बारावी इयत्तेसाठी आपण आपल्याला दिलेल्या शब्द मर्यादेत प्रत्यक्ष शाळा डोळ्यासमोर ठेवून शाळेतील वर्णन करावे. 

मराठी निबंध येथे वाचा

>> छत्रपती शिवाजी महाराज जयंती निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Nibandh in marathi

>> 'कोरोना संकट' मराठी निबंध 

माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi

माझी शाळा ओळख | My School Essay 

माझ्या शाळेचे नाव ------------प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक जिल्हा परिषदेची शाळा असून , माझी शाळा एका ग्रामीण भागातील खेड्या गावामध्ये आहे. माझ्या शाळेत एकूण 4 शिक्षक व 1 मुख्याध्यापक असा 5 गुरुजनांचा स्टाफ आहे. गावातील शाळा ही आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. गावातील सर्व नागरीक (पालक वर्ग) आवर्जून शाळेसाठी मदत करताना मी पाहिले आहे. माझ्या गावाच्या मध्यभागी माझी शाळेची इमारत असून , दुरूनच शाळा ओळखता येते. घर ते शाळा प्रवास खूपच आनंददायी व्हायचा, घर ते माझी शाळा अंतर तसे ५०० मीटर च्या आताच होते मात्र एवढ्या जवळ देखील जाण्यांसाठी मित्रांसोबत रमत-गमत जायला मज्जा येत असायची.

माझ्या शाळेतील इमारत व इतर सुविधा

माझ्या शाळेची इमारत सुसज्ज असून, शाळेत एकूण 7 वर्गखोल्या आहेत. एक ऑफिस , एक संगणक कक्ष , लायब्ररी , मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वछतागृह , स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्था , खेळण्यासाठी शाळेच्या आवारातच खेळाचे मैदान होते.  शाळेची इमारत लांबूनच पाहिल्यानंतर शाळा असल्याची जाणीव प्रत्येकाला होईल अशी माझी शाळा होती. शाळेच्या आवारात वेगवेगळी झाडे लावलेली होती. 

उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्टी असल्याने शाळातील झाडे जोपासण्याची जबाबदारी आम्हा गावातील मुलांवर असायची , आम्ही आळीपाळीने झाडांना पाणी देत असायचो, ग्रामीण भागात शाळा असल्याने पूर्वी एखादा सार्वजनिक कार्यक्रम शाळेमध्ये असायचा यासाठी देखील माझ्या शाळेची मदत गावातील लोकांना होत असत. शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर ठळक अशा मोठ्या अक्षरात शाळेचे नाव, इतर महत्वाची माहिती, सुविचार लिहलेले असायचे. अशी सुसज्ज माझ्या शाळेची इमारत, वर्गखोल्या माझ्या आजही डोळ्यासमोर उभी आहे.

माझ्या शाळेतील पहिला दिवस | My first day at school short essay

उन्हाळी सुट्टी संपत आली की, चाहूल लागते ती म्हणजे शाळेची मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात मामाच्या गावाला घालवलेली सुट्टीत केलेली धमाल आजही आठवते. खेड्यागावातील शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू झाल्याची चाहूल लागताच शाळा सुरू होणार असल्याची खात्री पटायची. जून महिन्याच्या सुरुवातीलाच जेव्हा पहिल्या पावसाची रिमझिम सुरू होताच मातीचा दरवळलेला सुंगध पहिला पाऊस असायचा. सात जूनला पाऊस सुरू व्हायचा आणि मग एकीकडे शेतातील कामे आणि शाळा सुरू झाल्याची गडबड एकच असायची. 

शाळेत जाण्यासाठी वह्या, पुस्तके, पेन , दप्तर घेण्यासाठी  बाबांजवळ हट्ट धरायचा, आमच्या तालुक्याला रविवारी आठवडी बाजार राहत असे, या दिवशी आजोबांसोबत जाऊन खरेदी करायची आणि मग शाळेत जाण्यासाठी तयार व्हायचो, शाळेचा पहिला दिवस , शाळेत जाण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्रीच पूर्वतयारी करून ठेवायचो, आणि मग शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व आवराआवर करून आम्ही सर्व मित्र आनंदाने शाळेत जात असायचो. 

शाळेच्या पहिल्या दिवशी नविन प्रवेशित मुलांचे स्वागत, पुस्तकांचे वाटप इतर कार्यक्रम शाळेत असायचे, उन्हाळी सुट्टीतील गप्पा, खरेदी याविषयी गप्पा मारत शाळेचा पहिला दिवस (My first day at school) संपायचा.

माझ्या शाळेतील वर्ग

शाळा तिथे वर्ग माझ्या शाळेत एकूण ८ वर्ग होते. त्यामध्ये इयत्ता १ ली पासून ते ८ वी पर्यंतचे वर्ग होते. माझ्या शाळेत मी सर्व वर्गात शिक्षण घेतले. माझ्या शाळेतील वर्गात मी सर्वात पुढे बसायचो. प्रार्थना संपल्यानंतर रांगेत आम्ही आमच्या वर्गात जावून बसायचो. वर्गामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान विषयाच्या कथन संकल्पना चे चार्ट , गणितीय सूत्रे भिंतीवर लावलेली असायची. येता जाता त्यावर नजर पडत असे, अशा पद्धतीचे वर्ग त्यावेळी होते. आता तर त्यामध्ये खूप सारे बदल आपल्याला दिसून येते. "नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" नुसार तर शिक्षण क्षेत्रात खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. 

सविस्तर वाचा - "नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" 

२१ व्या शतकातील शाळेतील वर्गामध्ये बोलक्या भिंती , डिजिटल साधने , बसण्यासाठी बेंचेस , आकर्षक कार्टून रंगरंगोटी बघायला मिळते.

माझ्या शाळेतील राष्ट्रीय सण (माझ्या शाळेतील संविधान दिवस)

भारत माझा देश आहे. आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले. १५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र देशासाठी महान थोर महापुरुष, क्रांतीकारक यांनी देशासाठी आपले बलिदान दिले. त्यांच्यामुळे आज आपण स्वंतत्र भारताचे नागरिक म्हणून देशात वावरत आहोत. त्यानंतरचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे २६ नोव्हेबर १९४९ या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  दोन वर्ष, ११ महिने, १८ दिवस काम करून संविधान राष्ट्राला अर्पण केले. २६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना (संविधान) लागू करण्यात आले. २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

माझ्या शाळेमध्ये १५ ऑगस्ट जवळ आला म्हणजे चाहूल लागायची ती म्हणजे नविन कपडे मिळणार याची, १५ ऑगस्ट पूर्वीच टेलर कडे कपडे शिवायला टाकायचे आणि मग १५ ऑगस्ट च्या दिवशी सकाळीच लवकर उठून ध्वजारोहणासाठी शाळेत हजर राहायचे. या दिवशी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात येत असे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्ताने शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला, भाषण, निबंध लेखन, विविध स्पर्धा आयोजन करण्यात येत होते. या निमित्ताने स्पर्धेत सहभागी होऊन कलागुणांना वाव मिळत असे, याचे कोडे आज उलगडताना दिसून येते. अशा प्रकारे माझ्या शाळेत राष्ट्रीय सण साजरा करण्यात येत होते.

माझ्या शाळेतील सांस्कृतिक | वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतील सांस्कृतिक, स्नेहसंमेलन कार्यक्रम म्हणजे आठवणीतील दिवस वर्षभरातील हा महत्वाचा दिवस वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने स्पर्धत सहभागी होण्यासाठी शाळेत एक महिना आधीपासूनची तयारी लगबग , कपड्यांची शोधाशोध आजही प्रत्येकाला आठवत असेल, माझ्या शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात मी एका नाटिकेमध्ये सहभागी झालो होतो. त्याचबरोबर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण देखील मी प्रथमच केले होते. आजोबांनी लिहून दिलेले भाषण जशाच तसे पाठ करून मी भाषणाची चिठ्ठी हातात ठेवून भाषण केले होते. आणि मध्येच सर्व विसरून गेले आणि पंचायत झाल्याची आठवण आजही ताझी आहे. पण त्याच वकृत्व स्पर्धेत मी भाग घेऊ शकलो म्हणूनच तर तेव्हा पासून लागलेल्या सवयीमुळे आज १०० जणांच्या वर्गात किंवा सभेत, मिटिंग मध्ये बोलू शकतो. आपण पुढे कोण असू? आपण काय करणार? हे सर्व शाळा ठरवत असते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम म्हणजे शाळेतील सांस्कृतिक, वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम होय.

माझ्या शाळेतील सहल

मी इयत्ता ५ वी मध्ये शिकत असताना माझ्या शाळेतील सहल कोकणात गेल्याची मला आठवते. प्रथमच मी पुस्तकातले कोकण प्रत्यक्ष अनुभवले. निसर्गरम्य डोंगर , दऱ्या आणि समुद्र किनारा जवळून अनुभवला. तेथील लोकांचे जीवनमान हातात कोयता आणि लुंगी घालून चाललेली माणसे त्यावेळी मी जवळून पहिली.  भात आणि मासे यांचा आहार , कौलारू घराची रचना , छोटी छोटी गावे पण स्वच्छ सुंदर परिसर, गावात पोहोचेपर्यंत जंगलात गाव आहे की गावात जंगल याचा अंदाज लवकर लावता येत नाही. उष्ण व दमट हवामान कोकणच्या सहलीमधून अनुभवायला मिळाले. सहलीमध्ये दिलेले खर्चासाठी पैसे आणि बिचकत बिचकत केलेला खर्च  आजही अंगावर शहारा आणून जातो. 

शाळेचे महत्व

देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासासाठी विकसनशील देशाचे भवितव्य हे सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते. असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. कारण आताच्या पिढीला जे आपण शिक्षण देतो. जसे मुलांना घडवितो तसा देशाचा विकास हा अवलंबून असतो. शाळेतील शिक्षण मुलाचे चारित्र्य विकसित करण्यास मदत करते. 

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण हे खूप महत्वाचे बनले आहे. २१ व्या शतकात कौशल्य आधारित शिक्षणावर अधिक भर आपल्याला पाहायला दिसून येतो. शिक्षणाची गुणवत्ता ही मुलाच्या वाढीस लागणार्‍या समाजाच्या विकासाचा निर्णय घेते. म्हणूनच शाळा एखाद्या राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जाहीर झाल्यापसून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. कसे असेल  नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०  (NEP 2020) सविस्तर वाचा त्यासाठी येथे क्लिक करा.

अन्न, वस्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असल्याचे आपण ऐकत आलो, मात्र आता शिक्षण ही देखील एक चौथी गरज बनली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण घेण्याचे ठिकाण म्हणजे शाळा होय. शाळा ही एक अशी जागा आहे. तिथे आपले संपूर्ण जीवन कसे घडेल याची पूर्वतयारी म्हणजे शाळा, आपल्यामध्ये असणाऱ्या बारीकसारीक कलागुण शोधण्याची जागा म्हणजे शाळा आहे. आज करोडो रुपये खर्च करून देखील शाळेसारखे शिक्षण मिळणे कठीण आहे. याचा अनुभव आपण कोव्हीड-१९ च्या काळात अनुभवला. गावातून बाहेर गेलेला व्यक्ती कोठेही जगाच्या पाठीवर असला तरी शाळा मात्र तो विसरू शकत नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात शाळेला फार महत्व असल्याचे आपण यशस्वी व्यक्तीच्या तोंडून ऐकत असतो. समाजाच्या उद्धारासाठी शाळा हे महत्वाचे ठिकाण आहे. 

>> शैक्षणिक बातम्या 

>>  स्वाध्याय उपक्रम लिंक | ConveGenius Web App Scert Swadhyay Link 2022

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

माझी शाळा निबंध मराठी या विषयावर निबंध लेखन करत असताना काही प्रश्न वारंवार विचारले जातात.

प्रश्न १. प्रत्येक मुलाने शाळेत का जावे?

उत्तर- प्रत्येक मुलाने शाळेत का जावे? या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर द्यायचे झाल्यास असे सांगता येईल की, 'उद्याचे भविष्य ठरवण्यासाठी प्रत्येक मुलाने शाळेत जावे.' आणखी थोडे विस्ताराने समजून घेऊ, प्रत्येकाच्या आयुष्यात करियर ला अनन्यसाधारण महत्व आहे. मुलाचा जन्म झाल्यापासून घरामध्ये मुलांचा विकास सुरु होतो. मुलांवर जसे संस्कार होतात. तसे मुले घडत जातात. शाळा ही मुलांसाठीची अशी जागा आहे. तिथे मुलांचा सर्वांगीण विकास होतो. अन्न, वस्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. २१ व्या शतकातील चौथी गरज म्हणजे 'शिक्षण' ही बनली आहे. शिक्षण ही गरज पूर्ण करण्याची जागा म्हणजे शाळा , शाळेतून मुलांना 'दर्जेदार शिक्षण' मिळून उद्याचे भविष्य आजच्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते. सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक अशा सर्व अंगाने सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक मुलाने शाळेत जावे.

प्रश्न २. शाळा आम्हाला काय शिकवते?

उत्तर- आपण जर विद्यार्थी असाल तर, आपण थोडे आतापर्यंतच्या शाळेतील आठवणी ताज्या करून आठवावे. की, शाळेतून आम्ही काय शिकलो. समाजातील इतर घटकांनी आपण थोडे शालेय दिवस आठवले किंवा यशस्वी व्यक्तीच्या यशाचे रहस्य विचारले असता शाळेतून आपल्या शिक्षणाला खऱ्या सुरुवात झाली. शाळेतूनच आपल्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळाला. नैतिक मुल्यांची ओळख शाळेतून झाली. शाळा आम्हाला घडवते. आपल्याला रस्ता दाखवते. आपले भविष्य उज्वल करते. या गोष्टींची ओळख शाळा आम्हाला शिकवते.

>> ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध

>> संत गाडगेबाबा माहिती मराठी 

माझी शाळा निष्कर्ष 

प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय काळ हा महत्वाचा आहे. माझी शाळा या विषयावर निबंध लेखन करण्यासाठी शालेय स्तरावर मुलांना परीक्षेसाठी आवश्यकता भासते. तर शाळा/कॉलेज मध्ये विविध स्पर्धेसाठी निबंध लेखन करावे लागते. मात्र बहुतांश जण निबंध लेखन कसे करावे? याविषयी गोंधळून जातात. या लेखाच्या सुरुवातीला आपण निबंध कसा लिहावा? निबंध लेखन कसे करावे? कोणती काळजी घ्यावी/ याविषयीची माहिती घेतली. त्यानंतरच्या भागात आपण माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी (10 Lines on My School in Marathi) मध्ये निबंध लेखन वाचायला मिळाले. या १० ओळीच्या अनुषंगाने आपण आपल्या शाळेतील अनुभवाची जोड देवून माझी शाळा निबंध लेखन करू शकता. पुढे आपण माझी शाळा निबंध मराठी  (My School Essay in Marathi) या विषयावर सविस्तर वाचले त्यामध्ये शाळेचे वर्णन, काही अनुभव आपण वाचले. अशा पद्धतीने आपण माझी शाळा या विषयावर आपण परीक्षेसाठी किंवा विविध स्पर्धेसाठी निबंध लेखन करून यशस्वी होता येईल. त्यानंतर वारंवार विचारले जाणारे शाळेविषयी प्रश्न त्याची उत्तरे आपण वाचली. अशा पद्धतीने आपणस माझी शाळा निबंध वाचयला मिळाला.

Post a Comment (0)
Previous Post Next Post