बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा | RTE admission age limit in marathi
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये कलम १२ (१) (सी) नूसार खाजगी विना अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई प्रवेश 2022-23 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे (RTE admission age limit) बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा निश्चित करण्याबाबत परिपत्रक काढून कळविण्यात आले आहे. त्याबाबत सविस्तरपणे वयोमर्यादा आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान वय किती असावे? याबाबतची माहिती जाणून घेऊया.
शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. (शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी शेवटी लिंक दिलेली आहे.) शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदल झाल्यामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा (rte admission age limit in marathi) माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख | rte admission 2022-23 maharashtra last date
आरटीई २५ टक्के प्रवेश अर्ज ( rte admission 2022-23 maharashtra last date) करण्यासाठी १० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अंशतः बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपण शासनाच्या RTE पोर्टल या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
RTE admission age limit in marathi | बालशिक्षण हक्क प्रवेश 2022 23 वय मर्यादा
RTE साठी प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे वय |
---|---|---|
प्ले ग्रुप / नर्सरी | १ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०१९ | ४ वर्ष ५ महिने ३० दिवस |
ज्युनियर केजी | १ जुलै २०१७ - ३१ डिसेंबर २०१८ | ५ वर्ष ५ महिने ३० दिवस |
सिनियर केजी | १ जुलै २०१६ - ३१ डिसेंबर २०१७ | ६ वर्ष ५ महिने ३० दिवस |