'परीक्षेची यशस्वी तयारी' ऑनलाईन सत्र २०२२ | scert online session 2022

२१ व्या शतकातील कौशल्य आधारित शिक्षणाकडील वाटचाल आणि नविन शैक्षणिक धोरण २०२० मधील शिक्षण क्षेत्रातील झालेला महत्वपूर्ण बदल हा भविष्यातील राष्ट्र विकसित देशाची ओळख निर्माण होत आहे. आजची शिक्षण पद्धती वर उद्याचे भविष्य अवलंबून आहे. माहिती तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे कोरोनाच्या काळात याची खूप मोठी मदत झाल्याचे आपण पहिले. लवकरच इयत्ता १० वी व १२ वी च्या लेखी परीक्षा सुरु होणार असून, त्याबाबत मुलांना अधिक चांगली तयारी करण्याच्या हेतूने ऑनलाईन युगात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होताना दिसून येत आहे. इयत्ता १० वीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT Pune) आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षेची यशस्वी तयारी' ऑनलाईन मार्गदर्शन सत्र बुधवार, दि. २३/०२/२०२२ ते मंगळवार, दि. ०१/०३/२०२२ दुपारी ३:०० ते ०४:३० या वेळेत SCERT YouTube Channel वर Live  ऑनलाईन मार्गदर्शन सत्र (scert online session 2022) आयोजित करण्यात आले आहेत.

scert online session 2022
scert online session 2022


{tocify} $title={Table of Contents}

'परीक्षेची यशस्वी तयारी' ऑनलाईन सत्र २०२२ | scert online session 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी SSC Exam 2022 (इ.१० वी)  लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC Exam 2022  (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी" या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन SCERT YouTube Channel वर Live  दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात आले आहे. 

परीक्षेला सामोरे जाताना जसजशी परीक्षा जवळ येते, तसे अभ्यासाचे ओझे वाटणे ,स्वाभाविक आहे. मात्र यासाठी आपण जर अभ्यासाचे योग्य नियोजन आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास केल्यास नक्कीच आपण परीक्षेस यशस्वी व्हाल. परीक्षेच्या दृष्टीने तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे या लेखामालेतील या तंत्राचा आपणास अभ्यास करण्यासाठी मदत होईल.

तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे

>> परीक्षेला सामोरे जाताना तंत्र अभ्यासाचे रहस्य यशाचे | Study Tips for SSC/HSC Exam 

>> तंत्र अभ्यासाचे वाचन व त्राटक तंत्र | Best way to read books

>> अभ्यासाचे स्मरण , मनन , चिंतन आणि स्वसंमोहन तंत्र Exam Preparation Tips

>> वेळेचे नियोजन , दैनिक अभ्यासाचे नियोजन व स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र  Time Mangement and Study Time table for students

>> फ्लॅश नोटस् (Notes) काढण्याचे  तंत्र 

>> परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र Notes


इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी खालील वेळापत्रकानुसार आपण 'परीक्षेची यशस्वी तयारी' ऑनलाईन सत्र २०२२ साठी जॉईन होऊ शकता. यासाठी वेळोवेळी नविन अपडेट साठी SCERT Official Website ला भेट द्या. https://www.maa.ac.in/

>>  'परीक्षेची यशस्वी तयारी' ऑनलाईन सत्र २०२२

>> SCERT YouTube Channel

SCERT Online session 2022

बुधवार, २३/०२/२०२२ , दुपारी ३:०० ते ०४:३०

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ - https://youtu.be/lwXeYdSY_LM


गुरुवार, २४/०२/२०२२ दुपारी ३:०० ते ०४:३० 

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ - https://youtu.be/Rjd5N7PFilQ

 

शुक्रवार, २५/०२/२०२२ दुपारी ३:०० ते ०४:३०

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ - https://youtu.be/2DpF3qVxttM


सोमवार, २८/०२/२०२२ दुपारी ३:०० ते ०४:३० 

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ - https://youtu.be/NvFMY0Ezemo


मंगळवार, ०१/०३/२०२२ दुपारी ३:०० ते ०४:३०

परीक्षेची यशस्वी तयारी - https://youtu.be/0YtknXBrCKo


हे ही वाचा





Post a Comment (0)
Previous Post Next Post