सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती | Sir Isaac Newton Information In Marathi

सर आयझॅक न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली विचार करत बसले होते. त्यावेळी एक सफरचंद खाली पडले तेव्हा त्यांना एक प्रश्न पडला की, सफरचंद खालीच का पडले? ते वर का गेले नाही? असे अनेक प्रश्न न्यूटनला पडले. यावर खूप अभ्यास , संशोधन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. न्यूटनने गतीविषयक तीन नियम सांगितले. पहिली परावर्ती दुर्बिण तयार केली. न्यूटन हे एक ब्रिटीश  हे एक भौतिकशास्त्रज्ञ, गणित तज्ञ व तत्त्वज्ञ होते. भौतिकशास्त्राबरोबरच त्याचे गणितातील योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. डिफरेन्शिअल आणि इंटिग्रल कॅल्क्युलस (संख्याशास्त्र) विकसित करण्यामध्ये त्याचा विशेष हातभार होता. सर आयझॅक न्यूटन या महान शास्त्रज्ञांची माहिती आजच्या लेखामध्ये दिलेली आहे. त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण, करियर, संशोधन कार्य, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटनचे गतिविषयक तीन नियम, सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेले  शोध व त्याचा मानवजातीस फायदा कसा झाला? या  प्रबोधन काळातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांची मराठी माहिती (Sir Isaac Newton Information In Marathi) आजच्या लेखात वाचायला मिळणार आहे.


{tocify} $title={Table of Contents}

सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती | Sir Isaac Newton Information In Marathi

सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती
sir isaac newton information


सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म

सर आयझॅक न्यूटन यांचा  जन्म 25 डिसेंबर 1642 रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर जिल्ह्यातील वुल्सथॉर्प बाय कॉल्स्टरवर्थ नावाच्या खेड्यात झाला. आयझॅक न्यूटनच्या वडिलांचे नाव देखील आयझॅक न्यूटन हेच होते. तर आईचे नाव हन्ना आयास्कॉफ होते.

न्यटूनच्या काळातील कॅलेंडरनुसार त्यांचा जन्म दिनांक 25 डिसेंबर 1642 रोजीचा आहे. परंतु आधुनिक कॅलेंडरनुसार त्यांचा जन्मदिवस दिनांक 4 जानेवारी 1643 चा आहे.{alertInfo}


सर आयझॅक न्यूटन यांचे बालपण

सर आयझॅक न्यूटन हे एक ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ व गणितज्ञ तसेच तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधील लिंकनशायर जिल्ह्यातील वुल्सथॉर्प बाय कॉल्स्टरवर्थ नावाच्या खेड्यात झाला. 
न्यूटन चे वडील व्यवसायाने मेंढपाळ होते. न्यूटन चा जन्म होण्याच्या तीन महिने आधी न्यूटनच्या वडिलांचा त्यांचा मृत्यू झाला. वडील वारल्यानंतर न्यूटन यांच्या आईने न्यूटन हे तीन वर्षाचे असताना दुसरा विवाह केला. त्यांच्या दुसऱ्या पतीने न्यूटनला सोबत आणण्यास मनाई केली होती. न्युटनच्या आईने न्यूटन यांना त्यांच्या आईवडिलांकडे ठेवले. तेव्हा न्यूटन हे त्यांच्या आजीकडे राहत होते. यादरम्यान न्यूटनचे वय १२ वर्ष असताना त्यांचे सावत्र वडील हे वारले. आणि पुन्हा न्युटनची आई आपल्या नवीन बाळांना घेऊन आपल्या मूळ गावी परत आली. 
यादरम्यान आजोळी असताना न्यूटन घराजवळच्या शाळेमध्ये जेमतेम २ वर्ष शाळेत गेले होते. शिक्षकांच्या मते तो आळशी होता आणि त्याचे अभ्यासात लक्ष नसायचे. त्याच्या लिखाणातून दुःख आणि राग दिसत असे. आई आपल्याला एकटेच सोडून गेली, हे त्याचे कारण असावे. मात्र त्यांना शाळेमध्ये गणित विषयाची खूप आवड निर्माण झाली होती. 

सर आयझॅक न्यूटन यांचे शिक्षण

न्यूटन यांचे वय १२ वर्ष असताना त्यांनी घर सोडले व त्यांना ग्रंथम शहरातील किंग्स शाळेत दाखल केले. त्यावेळी बहुतेक कुटुंबांतील मुले घर सोडून शाळेत जात असत. त्या शाळेत आयझॅक न्यूटन हे गणित विषय वगळता इतर मूलभूत शैक्षणिक विषय शिकले. कारण तिथे गणित हा विषय शिकवत नसत. आयझॅकला तिथे शिकायचा खूप कंटाळा येत असे. कारण त्यांना गणिताची आवड निर्माण झालेली होती. 
त्यामुळे ते जग कसे चालते? याबद्दल विचार करू लागले?  शोध घेऊ लागले? प्रयोग करू लागले? मधल्या काळामध्ये आयझॅक न्यूटन 17 वर्षांचे असताना आईने त्याला किंग्ज शाळेतून काढून घरी आणले. त्याने त्याच्या वडिलांसारखे मेंढपाळ बनाव. अस तिला वाटत होते. आयझॅकला आईचा निर्णय आवडला नाही. त्याला मेंढपाळीचे कामही जमले नाही. पुढच्याच वर्षी आईने त्याला पुन्हा किंग्ज शाळेत पाठवले. किंग्ज शाळेत 1655 ते 1660 या काळात न्यूटन किंग्ज शाळेत शिक्षण घेतले. 
किंग्ज शाळेच्या एका खिडकीवर न्यूटनचे नाव खरवडलेले आहे. असे म्हणतात की न्यूटनने स्वतःच हा उपद्व्याप केलेला आहे.
एक दिवस जोरदार वादळ झाले. वादळामुळे घराचे दरवाजे, शेताचे कुंपण, कुंपणाचे फाटक वगैरेची पडझड तर झाली नाही ना, हे पाहण्यासाठी आयझॅकच्या आईने त्याला पाठविले. बराच वेळ झाला तरी आयझॅक काही परत येईना, म्हणून आईच बाहेर पडली. बाहेर जाऊन पाहते तर, आयझॅकची स्वारी शेताच्या कुंपणावरून इकडून तिकडे अशा उड्या मारीत बसली होती. का तर म्हणे, वाऱ्याच्या बलामुळे आपल्या उडीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ! 

त्यावेळी न्यूटन यांनी वाऱ्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. यादोन्हीमधले अंतर ते मोजत असताना तिथे त्यांचे मामा आले. व त्यांनी विचारले, हे तू काय करत आहेस? आयझॅक न्यूटन म्हणाले, "मी वाऱ्याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धीमत्तेचा अंदाज आला. न्यूटन यांचे मामा विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. घरी गेल्यानंतर त्यांनी न्युटनच्या आईला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. वर्षभरात ते केंब्रिज विद्यापीठाचाच एक भाग असलेल्या ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश घेण्यास पात्र ठरले. 
इ. स. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे विद्यार्थी प्राचीन ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल विषयी शिकत. पण न्यूटनला नवनव्या कल्पनांवर विचार करायला आवडे. मग ते स्वतःहून देकार्त, कोपर्निकस आणि गॅलेलिओ या आधुनिक तत्वज्ञ आणि संशोधकांच्या विचारांचा अभ्यास करू लागले. गणित, प्रकाशविज्ञान, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे त्याचे खास आवडीचे विषय. जानेवारी १६६५ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून न्यूटन पदवीधर झाले.  पुढे १६६५ मध्ये आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीमुळे विद्यापीठ बंद झाले आणि न्यूटनला वुल्सथॉर्पला परतावे लागले. तेथे पुढील दोन वर्षांत त्याने अनेक महत्त्वपूर्ण संशोधने केली.
इ. स. १६६७ मध्ये न्यूटन पुन्हा केंब्रिज येथे दाखल झाले. तेथे तो ट्रिनिटी कॉलेजचा सभासद झाले. दोन वर्षांनंतर त्याची गणिताचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.  1672 साली वयाच्या तिसाव्या वर्षी त्याला रॉयल सोसायटीचा सदस्य बनण्याचे आमंत्रण मिळाले.  रॉयल सोसायटीचे सदस्यत्व देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. वैज्ञानिक संशोधन कार्यास उत्तेजन देण्यासाठी या संस्थेचा जन्म झाला होता. संस्थेचे सदस्य एकत्र येऊन त्यांना कोड्यात टाकणाऱ्या समस्यांवर चर्चा करत. आपल्याला न सुटलेल्या समस्या ते एकमेकांना सोडवण्यासाठी देत. गणिती समस्या सोडवण्यात न्यूटन वाकबगार होते. एडमंड हॅले या आपल्या मित्राच्या साहाय्याने लिहिलेल्या 'फिलॉसॉफी नॅचरॅलिस प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका' या पुस्तकाचे १६८७ मध्ये प्रकाशन झाले आणि न्यूटनचे नाव जगभर झाले.

सर आयझॅक न्यूटन यांनी कशाचा शोध लावला? | संशोधन कार्य

गुरुत्वाकर्षण, प्रकाश विज्ञान दुर्बीण, न्यूटनचे यामिक (न्यूटोनियन मेकॅनिक्स), कॅल्क्युलस यांचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला.
सफरचंद पडताना पाहून न्यूटनला अनेक प्रश्न पडले. सफरचंद खालीच का पडले? यावर खूप अभ्यास करून त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्यांचे गतिविषयक तीन नियम तर सर्वश्रुतच आहेत. या संशोधनामुळे भौतिकशास्त्राचा पायाच रचला गेला. 
'प्रकाशाचे काचेच्या त्रिकोणी लोलकामुळे सात रंगांत पृथक्करण होते,' हे त्यांनी दाखवून दिले. प्रकाशाच्या वापर करून त्याने सर्वप्रथम एक दुर्बीण बनविली.
संवेगाच्या अक्षय्यतेचा नियम न्यूटनने मांडला. भौतिकशास्त्राबरोबरच त्याचे गणितातील योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. 
डिफरेन्शिअल आणि इंटिग्रल कॅल्क्युलस (संख्याशास्त्र) विकसित करण्यामध्ये त्याचा विशेष हातभार होता.

न्यूटनच्या गतीविषयक तीन नियम माहिती | न्यूटनचे गतिविषयक तीन नियम कोणते?

न्यूटनचे गतीचे नियम

आयझॅक न्यूटन यांचे गतीचे तीन नियम आपल्याला माहिती आहे. वस्तू गतिमान होते तेव्हा आणि स्थिर असते तेव्हा काय घडत असते? याचे आकलन या नियमांवरून होते.

1. न्यूटनचा गतीचा पहिला नियम काय आहे?

जडत्वाचा नियम

न्यूटनच्या पहिल्या गती नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात. 
जडत्वे म्हणजे गतीला विरोध 
या नियमानुसार एखादी वस्तू स्थिर असेल किंवा सरळ रेषेत गतीमान असेल तर बाहेरून बल लावले जात नाही तोवर तिची स्थिती कायम राहाते.
या नियमानुसार जोवर एखादे नवे बल वस्तुला ओढत नाही किंवा ढकलत नाही तोवर त्या वस्तूची स्थिती बदलत नाही. त्यामुळे स्थिर वस्तू स्थिरच राहील आणि एकसमान गतीने सरळ रेषेत पुढे जाणारी वस्तू त्याच गतीने पुढे जात राहील.

न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम उदाहरण

न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे एक उदाहरण पाहू. 
एका सायकलची गती बल लावल्याशिवाय बदलत नाही. सायकलला ब्रेक लावून किंवा पेंडल मारून हे बल लावता येते.
अर्थातच, वस्तूवर बाहेरून एक बल काम करत असते गुरुत्वाकर्षण. त्यामुळेच धनुष्यातून सोडलेला बाण थेट अवकाशात न जाता जमिनीवर येऊन पडतो.

2. न्युटनचा गतीविषयक दुसरा नियम

त्वरणाचा नियम

न्यूटनने मांडलेल्या गतीविषयक दुसरा नियमास त्वरणाचा नियम म्हणतात. 
या नियमानुसार वस्तुच्या गतीतील बदल त्या वस्तुवर लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि वस्तुच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
वस्तुला कुणीतरी ढकलले किंवा ओढले तर काय होते, हे हा नियम आपल्याला सांगतो. बल जेवढे जास्त तेवढेच वस्तुची गती खूप वाढते किंवा खूप कमी होते. 
जड वस्तुची गती वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जास्त बल आवश्यक असते. 

न्यूटनच्या गतीविषयक दुसरा नियम उदाहरण

  • मोटारगाडी थांबवण्यापेक्षा सायकल थांबवणे जास्त सोपे असते. या नियमानुसार, वस्तुवर बल ज्या दिशेत लावलेले असेल त्याच दिशेत वस्तु पुढे जाईल.
  • लहान मुलाच्या तुलनेत एका वयस्कर व्यक्तिला झोका देण्यासाठी जास्त बल लागते.

3. न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम

क्रिया आणि प्रतिक्रिया नियम

न्यूटनने मांडलेला गतीचा तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया नियमे म्हणून ओळखतात. 
या नियमानुसार प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरोधी प्रतिक्रिया असते.
न्यूटनच्या मते, जेव्हा एखादे बल वस्तुला ढकलते तेव्हा वस्तू उलट दिशेत त्या बलाला ढकलत असते. उलट दिशेत ढकलणाऱ्या या बलाला प्रतिक्रिया बल म्हणतात.

न्यूटनच्या गतीविषयक तिसरा नियम उदाहरण

  • पाण्यात बोट कशी चालते, याचे स्पष्टीकरण हा नियम देतो. बोटीचे विल्हे बल देऊन पाणी मागे ढकलतात तेव्हाच पाणीसुद्धा उलट दिशेने वह्यांवर बल देऊन बोट पुढे ढकलते. 
  • जमिनीवर ठेवलेली खुर्ची गुरुत्वाकर्षण बलाने खेचली जाऊन जमिनीत आरपार शिरत नाही, कारण जमीन खुर्चीला उलट दिशेत म्हणजे वर ढकलत असते. 
  • बॅटने बॉलला मारले की बॅट बॉलवर बल लावून त्याला दूर ढकलते. पण त्याचवेळी बॉलही बॅटवर प्रतिक्रिया बल लावून बॅटला मागे ढकलतो.
  • बेसबॉल आणि क्रिकेटचे खेळाडू नेहमी गतीच्या तिसऱ्या नियमाचा फायदा घेतात.

सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेले  शोध व त्याचा मानवजातीस झालेला फायदा

न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगून ग्रहांसारखे खगोल एकमेकांना आकर्षित का करतात? हे स्पष्ट केले. वस्तू हवेत आणि पाण्यात कशा वागतात, हेदेखील त्याने उलगडून दाखवले. त्याने ग्रह आणि इतर खगोलांची गती यांवर बरेच लिखाण केले.

न्यूटोनियन यांत्रिकी न्यूटनने बलांबाबत सखोल माहिती दिली. वस्तूंची हालचाल कशी होते, हे स्पष्ट करणाऱ्या न्यूटनच्या पद्धतीला न्यूटोनियन यांत्रिकी हे नाव दिले गेले. न्यूटनचे गणित वापरून आपण स्ट्रॉबेरी हवेतून वाडग्यात कशी पडेल, दगड फेकल्यावर किती वेगाने तो खाली पडेल, पुस्तक उचलण्यासाठी किती प्रयत्न करावा लागेल याचे मोजमाप करता येऊ लागले, तसेच चंद्राचे पृथ्वीभोवतीचे परिभ्रमणही समजून घेता येऊ लागले. खरंतर, आपण कोणत्याही गतीमान वस्तुला न्यूटनच्या गणिताद्वारे समजावून घेऊ शकतो. बेसबॉल आणि क्रिकेटचे खेळाडू नेहमी गतीच्या तिसऱ्या नियमाचा फायदा घेतात.

न्यूटन आयझॅक न्यूटनेच्या सन्मानार्थ बलाचे आंतरराष्ट्रिय एकक म्हणून न्यूटन या संज्ञेस मान्यता देण्यात आली.
न्यूटनने गणितातील कॅलक्युलस ही एक अत्यंत महत्त्वाची पद्धतीचा शोध लावला. आजही गणितज्ञ, संशोधक आणि इंजिनीयर आपल्या कामात या पद्धतीचा उपयोग करतात.

वस्तू एकाच जागी स्थिर राहाणार की नाही, या घटनेला कारणीभूत ठरणारी गती आणि गुरुत्वाकर्षणासारखी नैसर्गिक बले यांमध्ये न्यूटनला विशेष रस होता. ही बले अशी का वागतात, हे न्यूटनला जात नव्हते, पण ती काय आणि किती परिणाम घडवून आणू शकतात, हे जाणून घेणे त्याला शक्य वाटत होते. त्याने पिरॅमिडच्या आकाराचा प्रिझम वापरून प्रकाशाचा अभ्यास केला. न्यूटनने नैसर्गिक घटनांमागील कारणे शोधण्यात आपले अवधे आयुष्य खर्च केले. सर आयझॅक न्यूटन यांचे दिनांक २० मार्च १७२७ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे न्यूटन हे शास्त्रज्ञ अमर झाले. त्यांना विनम्र अभिवादन !

सारांश

आजच्या लेखामध्ये प्रबोधन काळातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांच्या जीवन कार्याविषयी जाणून घेतले. त्यांचे विज्ञानकार्य न्यूटनचे गतिविषयक तीन नियम कोणते?, उदाहरण, गुरुत्वाकर्षणाचा नियम, कॅलक्युलस, शोधलेली दुर्बीण त्यांचे बालपण व शिक्षण याविषयीची माहिती संपूर्ण माहिती घेतली. घटनाक्रम खालीलप्रमाणे थोडक्यात
  • 1642 आयझॅक न्यूटनचा 25 डिसेंबर रोजी इंग्लंडच्या लिंकनशायर जिल्ह्यातील वुल्सथॉर्प बाय कॉल्स्टरवर्थ खेड्यात जन्म. वडिलांचे निधन.
  • 1646 आई हँनाने दुसरे लग्न केले. आयझॅकला आपल्या आईकडे ठेवून ती दुसऱ्या पतीच्या घरी राहायला गेली.
  • 1653 न्यूटनच्या सावत्र भावंडांना घेऊन त्याची आई परतली. 
  • 1655 ग्रंथम शहरातील किंग्स शाळेत दाखल.
  • 1659 शेती करण्यासाठी घरून बोलावण्यात आले.
  • 1661 केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश.
  • 1665 केंब्रिजमधून पदवी प्राप्त. गुरुत्वाकर्षण, कॅलक्युलस आणि प्रकाश यांवर शोध सुरू
  • 1668 केंब्रिज विद्यापीठातून मास्टर्स पदवी प्राप्त.
  • 1669 केंब्रिजमध्ये गणिताचा प्राध्यापक बनले. 
  • 1672 रॉयल सोसायटीचे सदस्य.
  • 1679 आईचे निधन.
  • 1684 कॅलक्युलसवरील काम प्रकाशित झाले.
  • 1687 प्रिसिपिया प्रकाशित झाले.
  • 1696 सरकारी टांकसाळीचा प्रमुख बनले.
  • 1703 रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनले.
  • 1705 महाराणीकडून सर या पदवीने सन्मानित.
  • 1727 निधन 20 मार्च रोजी. लंडन येथील वेस्टमिन्टर अँबे चर्चमध्ये दफन.
हे ही वाचा




>> सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती

>> सकारात्मक विचार कसा करावा? | आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र

>> सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

>> सावित्रीबाई फुले निबंध मराठी



अशाच नवनवीन अपडेट साठी आजच 'शिक्षण मित्र' WhatsApp जॉईन करा.

shikshan mitra whatsapp

Post a Comment (0)
Previous Post Next Post