बेंजामिन फ्रँकलिन माहिती मराठी - Benjamin Franklin Information in Marathi

जागतिक स्तरावर शास्त्रशुद्ध पद्धतीने विज्ञान क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणारे, अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रेंक्लिन यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. बेंजामिन फ्रेंक्लिन (Benjamin Franklin) हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते त्याचबरोबर त्यांनी पत्रकार, लेखक, राजकारण आणि संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यासोबतच त्यांनी अमेरिकेच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. फ्रँकलिन यांच्या विषयीची मराठी माहिती (benjamin franklin information in marathi) आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

>> शास्रज्ञ- श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती

>> सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती

बेंजामिन फ्रँकलिन माहिती मराठी - Benjamin Franklin Information in Marathi

benjamin franklin information in marathi
Benjamin Franklin Information


बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म 17 जानेवारी 1706 मध्ये बोस्टन (मॅसॅचूसेट्स ) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव आबायाह व वडिलांचे नाव जोसाय होते.  त्यांचे वडील जोसाय फ्रँकलिन हे प्राण्यांच्या कातडीचे व्यापारी होते. जोसाय फ्रँकलिन यांनी दोन लग्ने केली होती. त्यांच्या एकूण सतरा मुलांमध्ये बेंजामिन हे सगळ्यात लहान होते. वयाच्या 10 व्या वर्षीच बेंजामिन यांना आपले शालेय शिक्षण सोडावे लागले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपला भाऊ जेम्स फ्रँकलिन याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जेम्स फ्रँकलिनच्या प्रिंटिंग प्रेसमधून 'द न्यू इंग्लंड कोरंट' नावाचे नियतकालिक प्रकाशित होत असे. लवकरच बेंजामिन या नियतकालिकाचे संपादक झाले.

या दरम्यान दोघा भावांमध्ये भांडण झाल्याने बेंजामिन ते काम सोडून न्यूयॉर्कला गेले आणि पुढे ऑक्टोबर १७२३ मध्ये फिलाडेल्फियाला येथे पोहोचले. तिथे लगेचच त्यांना एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी मिळाली. काही महिने काम केल्यानंतर गव्हर्नर कीथ यांनी बेंजामिन यांना काही कामानिमित्ताने लंडनला जाण्यासाठी तयार केले. परंतु लंडनला पोहोचल्यानंतर बेंजामिन यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर कीथ यांच्या म्हणण्यात काहीच तथ्य नसून, त्यांनी दिलेले वचनदेखील निरर्थक होते. मग त्यांनी तिथेच पुन्हा एकदा प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी स्वीकारली. काही काळ तेथे काम केल्यानंतर डेनमन नावाच्या एका व्यापाऱ्याच्या आग्रहावरून ते फिलाडेल्फियाला परत आले आणि त्याच्या व्यवसायात हातभार लावू लागले. 

सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती येथे वाचा

डेनमनच्या मृत्यूनंतर बेंजामिन यांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस सुरू केली आणि 'द पेनसिल्व्हानिया गॅझेट'चे प्रकाशन सुरू केले. ते त्या वर्तमानपत्रातून अनेक स्वलिखित लेखन करत. त्या वर्तमानपत्राला त्यांनी स्थानिक सुधारणांच्या हेतूने आवाज उठविणारे माध्यम बनवले. इ.स. १७३३ मध्ये त्यांनी आपले प्रसिद्ध 'पुअर रिचर्ड्स ऑल्मनॅक' सुरू केले. ज्याद्वारे आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी चांगलाच आवाज उठवला. त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. इ.स. १७५८ मध्ये त्यांनी 'ऑल्मनॅक' मधील स्वलिखित लेखांचे प्रकाशन थांबवले आणि त्यात 'फादर अब्राहम सुमेरियन' विषयी छापण्यास सुरुवात केली- जो अमेरिकन वसाहतीतील साहित्याचा प्रसिद्ध भाग मानला जातो. यादरम्यान फ्रँकलिन यांनी जनतेच्या प्रश्नांकडे, समस्यांकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली होती.

लवकरच Benjamin Franklin यांनी साहित्य, कला, शास्त्र यांच्या विकासासाठी एका संस्थेची योजना तयार केली, जी पुढे स्वीकारण्यात आली. पुढे चालून याच संस्थेचे पेनसिल्व्हानिया विद्यापीठात रूपांतर झाले. संशोधनाशी संबंधित लोकांकडून त्यांनी शोध लावलेल्या विषयांवर चर्चा घडवून आणण्याच्या हेतूने त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी बेंजामिन यांनी 'अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. फ्रँकलिन यांनी स्वतः विजेशी संबंधित अनेक शोध लावले.

राजकारणात एका कुशल, उत्तम प्रशासकाचे प्रतिबिंब त्यांच्यात दिसून आले. परंतु नोकरीमधील कौटुंबिक मुद्द्यांवरून ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. स्थानिक राजकारणात त्यांनी केलेली टपालसंबंधी सुधारणा हे त्यांचे सर्वांत महत्त्वपूर्ण कार्य तर ठरलेच, परंतु एक राजकारणी म्हणून ग्रेट ब्रिटन तसेच फ्रान्सबरोबर वसाहतींशी संबंधित कार्य हे त्यांच्या लोकप्रियतेचा प्रमुख आधार सिद्ध झाले. 

इ.स. १७५७ मध्ये वसाहतीच्या सरकारमधील पेन कुटुंबीयांच्या प्रभावाला विरोध करण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. जिथे त्यांना वसाहतीच्या झालेल्या अवस्थेची लोकांसमोर तसेच इंग्लंडच्या मंत्रालयासमोर माहिती देण्यासाठी जवळपास पाच वर्षे लागली. अमेरिकेत परत येताच त्यांनी 'पिंक्स्टन प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र त्यामुळे त्यांना सभागृहातील आपले पद गमवावे लागले.

इ.स. १७६४ मध्ये त्यांना वसाहतीचे प्रतिनिधी म्हणून पुन्हा इंग्लंडला पाठवण्यात आले; परंतु यावेळेस त्यांना इंग्लंडच्या राजाकडून दलालांच्या हातून सत्ता हिसकावण्याच्या हेतूला विरोध करण्याचे कार्य सोपवण्यात आले. लंडनमध्ये प्रत्यक्षात त्यांनी 'स्टॅम्प अॅक्ट'ला (टपाल अधिनियम कायद्याला) विरोध केला. परंतु त्यांच्या एका अमेरिकन मित्रासाठी स्टॅम्प एजंटचे पद मिळवण्याच्या प्रकरणात त्यांना आपल्या कामगिरीवर पाणी सोडावे लागले. इ.स. १७६७ मध्ये जेव्हा ते फ्रान्सला गेले तेव्हा त्यांचे अभिनंदन करण्यात आले, परंतु इ.स. १७७५ मध्ये आपल्या मायदेशी परतण्यापूर्वीच विन्सन तसेच ऑलिवरच्या ऐतिहासिक पत्रांची माहिती च्युसेट्सला उपलब्ध करून दिल्याच्या आरोपात त्यांना पोस्टमास्टरच्या कार्यावरून पदच्युत व्हावे लागले. 

फिलाडेल्फियाला परत आल्यावर त्यांची 'कॉन्टिनेन्टल कॉंग्रेसचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि १७७७ मध्ये त्यांना संयुक्त राज्य अमेरिकेचे आयुक्त म्हणून फ्रान्समध्ये पाठविण्यात आले. तिथे १७८५ पर्यंत राहून त्यांनी आपल्या देशाचे कामकाज मोठ्या कुशलतेने आणि बुद्धिचातुर्याने पार पाडले. ते आपल्या मायदेशी परतले तेव्हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यानंतर महत्त्वाचे स्थान प्राप्त करणारे फ्रैंकलिन हे दुसरे व्यक्ती ठरले. १७ एप्रिल १७९० रोजी त्यांचे निधन झाले.

हे सुद्धा वाचा

>> शास्त्रज्ञांची माहिती 

>> शास्रज्ञ- श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती

>> सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती

>> आदर्श शालेय परिपाठ सूत्रसंचालन येथे वाचा

>> सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती

>> सकारात्मक विचार कसा करावा? | आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र

>> सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

>> सावित्रीबाई फुले निबंध मराठी



अशाच नवनवीन अपडेट साठी आजच 'शिक्षण मित्र' WhatsApp जॉईन करा.

shikshan mitra whatsapp


Post a Comment (0)
Previous Post Next Post