हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) | Har Ghar Tiranga
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून २०२२ मध्ये ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या गौरवशाली पर्वानिमित्त दिनांक १२ मार्च २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.
हर घर तिरंगा अभियानाचा मुख्य हेतू काय आहे ?
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १3 ऑगस्ट २०२२ ते दिनांक १5 ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) म्हणजेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
>> हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) निबंध
'हर घर तिरंगा' | घरोघरी तिरंगा
घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय/निमशासकीय / खाजगी अस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे.
घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. मात्र कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल.
राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून केवळ तिरंगा झेंडा उपलब्ध होणार असून, त्यासोबत काठी मिळणार नाही. काठीची व्यवस्था स्थानिक स्तरावर करावयाची आहे.
घरोघरी तिरंगा फडकावण्याबाबतचे नियम
>> मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना
>> स्वत:मधील क्षमतांचा शोध कसा घ्यावा? | करिअर कसे निवडायचे ? | स्व ची ओळख
>> लेखापाल क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध