गुरुपौर्णिमा माहिती मराठी | Gurupournima Information In Marathi

सर्वाना नमस्कार आदरणीय सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज गुरु पौर्णिमा सर्वप्रथम सर्वाना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेछ्या! गुरुपौर्णिमा (Gurupournima) निमित्त आपल्याला गुरुपौर्णिमेचा इतिहास , महत्व समजून घेण्यासाठी आजच्या लेखात आपण मागोवा घेणार आहोत. या आर्टिकल मधील माहिती आपणास भाषण, निबंध लिहण्यासाठी होऊ शकेल, तेव्हा आवर्जून गुरुपौर्णिमा माहिती मराठी (Gurupournima Information In Marathi) हा लेख संपूर्ण वाचावा.

{tocify} $title={Table of Contents}

गुरुपौर्णिमा माहिती मराठी | Gurupournima Information In Marathi

Gurupournima Information In Marathi


गुरू पौर्णिमेचा इतिहास – Guru Purnima History In Marathi

गुरु पौर्णिमा हा एक महत्वाचा पारंपारिक सण आहे. जो मोठ्या उत्साहात आपल्या देशात साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. आषाढी एकादशी नंतर लगेचच येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा होय. 

गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. ऋषी व्यासांनी चार वेद, १८ पुराणे आणि महाभारत हे महान महाकाव्य लिहिले. त्यामध्ये महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान या महाकाव्यातून जगासमोर मांडले. ऋषी व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. महाभारतातून त्यांनी नितीशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडवले. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस आहे. म्हणून गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.

गुरू पौर्णिमा कधी आहे 2022 ? | Guru Purnima Date 2022 

गुरू पौर्णिमा या वर्षी 13 जुलै 2022 रोजी आहे. (ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात गुरुपौर्णिमा सण साजरा केला जातो.) 

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साधारणपणे जून-जुलै महिन्यात गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. यंदा आज दिनांक १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येत आहे. 

गुरुपौर्णिमेचे महत्व व उद्दिष्ट

गुरुपौर्णिमा हा सण गुरु बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. ज्यांनी आपले सर्व आयुष्य आत्म-साक्षात्कारासाठी जगभर ज्ञानप्रसारासाठी समर्पित केले आहे. त्यांच्यासाठी या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. 

आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखण्यासाठी हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुरूंचे महत्त्व पटवून देण्याचा आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

प्राचीन काळापासून गुरु-शिष्य यांचे नाते आपल्याला आढळून येते. गुरुचे महत्व सांगणारा एक श्लोक आपणा सर्वाना माहिती आहे. 

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः

गुरु म्हणजे ज्याला देवापेक्षा जास्त महत्व दिले गेल्याचे आपल्याला दिसते. एकदा एका भक्ताने साधूंना प्रश्न विचारला की, देव मोठे की गुरु ? 

त्यावर त्या साधूंनी खूप छान उत्तर दिले. ते उत्तर असे होते की, 

देवाला भेटण्यासाठी गुरुकडून आपल्याला देवाला भेटण्याची विद्या शिकावी लागेल, तेव्हा आपल्याला देवाला भेटता येईल. यावरून गुरुचे महत्व सिध्द होते. 

जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुरु भेटतात. वास्तविक पाहता आपल्या जीवनातील गुरु हा कोणीही असू शकतो. जो आपल्याला आपल्या यशापर्यंत पोहचण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. 

प्राचीन मान्यतेनुसार आपले आई-वडील हे आपल्या जीवनातील पहिले गुरु असून त्यांचे स्थान ईश्वरापेक्षा वरचे मानले आहे. आपण लहानाचे मोठे होतो ते त्यांच्या शिकवणीतून आपले पालनपोषण करणारे, आपल्याला प्रेम,माया दाखवणारे आई-वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. 

>> महात्मा गांधीजी निबंध 

>> छत्रपती शिवाजी महाराज निबंध 

आपल्या जीवनातील दुसरे गुरु म्हणजे आपल्या शाळेतील शिक्षक होय. जेव्हा शाळेत आपला प्रवेश घेतला जातो. तेव्हा आपल्याला घडवण्याचे काम हे आदरणीय सर्व गुरुजन वर्ग करत असतात. 

त्यांच्याकडून आपण सामाजिक बांधिलकी, आपल्यातील असणारे कलागुण यांना आकार देण्याचे काम शिक्षक  करत असतात. आयुष्यातील ध्येय ठरवण्याचे आणि ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी योग्य मार्गदर्शन आपले गुरु म्हणजेच शिक्षक करतात.

शालेय जीवनातून जसजसे आपण मोठे होऊ लागतो. एखाद्या क्षेत्रात करियर केल्यानंतर आपल्याला मित्रांच्या रुपात किंवा नातेवाईक यांच्या रूपाने गुरु सापडतो.

ते आपल्याला जीवनांतील ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवत असतो. प्रेरित करीत असतो. एवढे मोठे स्थान हे गुरूंचे आहे.

गुरुपौर्णिमा हा एक भव्य दिवस आहे. जो शैक्षणिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही मार्गांनी महत्व पटवून देणारा दिवस आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जगभरातील विद्यार्थी आणि शिष्य आपल्या शिक्षकांना हा दिवस समर्पित करतात. हा एक सामाजिक आणि धार्मिक उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो.

विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यात आणि जीवनाच्या सर्व टप्प्यांमध्ये त्याला मार्गदर्शन करण्यात गुरू किंवा शिक्षक  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गुरू एका विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास आणि त्याच्या आध्यात्मिक आणि भौतिकवादी जीवनात प्रगती करण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याची कृपा आणि आशीर्वाद विद्यार्थ्यांच्या जीवनातून अज्ञान (अंधार) दूर करण्याची विद्या आपण गुरूंकडून शिकत असतो.

गुरुपौर्णिमा या दिवशी शिष्य आणि विद्यार्थी जीवनात गुरूचे महत्त्व ओळखतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. प्राचीन काळापासून चालत आलेले हे गुरु-शिष्याचे नाते असेच पुढेही अबाधित रहावे, आपल्या आयुष्यातील गुरुंबद्दल आदर,सन्मान व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा सणाचे महत्त्व समजून घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. म्हणून आपण सर्वजण आपल्या सर्व गुरुंच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता  व्यक्त करून गुरुपौर्णिमा साजरी करूया.

या शुभ दिवशी आपण सर्वांनी आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि आपल्या जीवनात गुरूची भूमिका पार पाडलेल्या त्या सर्व लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. येथे उपस्थित असलेल्या सर्व गुरूंप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करून आणि त्यांची कृपा प्रत्येकावर कायम रहावी आणि आपले जीवन उजळावे अशी इच्छा व्यक्त करून मी माझे भाषण संपवतो. गुरुपौर्णिमे निमित्त हार्दिक शुभेच्छा.

गुरुशिवाय ज्ञान नाही

ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म

सर्वकाही गुरूंचीच देन आहे

माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



हे ही वाचा

>> चष्मा लागण्याची लक्षणे 

>> लेखापाल क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध


Post a Comment (0)
Previous Post Next Post