हर घर तिरंगा निबंध | Har Ghar Tiranga Essay In Marathi

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या या पर्वानिमित्त देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम ७५, नावीन्यपूर्ण कल्पना ७५ नवे संकल्प ७५, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती ७५ आणि अंमलबजावणी ७५ अशा पाच आशय संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) या अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान देशाभरात २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा), स्वराज्य महोत्सव कार्यक्रमांतून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्यवीरांविषयी जाणीवजागृती केली जात आहे. या उत्साहानिमित्त ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान सर्व स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने हर घर तिरंगा अर्थात 'घरोघरी तिरंगा' या विषयावर निबंध लेखन करण्यासाठी 'हर घर तिरंगा निबंध' (Har Ghar Tiranga Essay In Marathi) आजच्या लेखात आपल्याला वाचायला मिळणार आहे.


{tocify} $title={Table of Contents}



हर घर तिरंगा निबंध - Har Ghar Tiranga Essay In Marathi 

भारतीय ध्वज - तिरंगा विषयी माहिती


Flag_of_India


भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज (तिरंगा) कधी स्वीकारण्यात आला?


२२ जुलै १९४७ या दिवशी घटना समितीच्या बैठकीमध्ये तिरंगी ध्वज हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.

तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. तिरंगा आपल्या देशाची शान व अभिमान आहे. तिरंगा आकाराने आयताकृती असून, त्यामध्ये प्रामुख्याने केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत.

तिरंग्यात सर्वात वर केशरी रंग आहे. तो त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. तर मध्यभागी पांढरा रंग असून तो स्वच्छता, शांतता व पवित्रतेचे प्रतीक आहे. तर सर्वात खाली हिरवा रंग आहे तो समृद्धी व संपन्नता यांचे प्रतीक आहे.

मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्यात 24 आरे आहेत, ते सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेण्यात आले आहे. 

22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा ध्वज हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाच्या एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. तिरंगा ध्वज नेहमी आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आपण सदैव आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे.

तिरंग्याची रचना ही पिंगाली वेंकय्या ह्यांनी केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण 2:3 असून, राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल आणि तिरंगा बघताच प्रत्येकाला स्फुरण भरेल. एवढी ताकत तिरंगा ध्वज मध्ये आपल्याला दिसते.

"माझा तिरंगा, माझा अभिमान

चला मिळून साजरा करूया,

 हर घर तिरंगा अभियान"

>>  घरोघरी तिरंगा फडकावण्याबाबतचे नियम 

>> 'हर घर तिरंगा' कार्यक्रमासाठी ई-साहित्य  | Har Ghar Tiranga Anthem Download


हर घर तिरंगा अभियानाचा मुख्य हेतू काय आहे ?


har-ghar-tiranga-essay-in-marathi


भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १3 ऑगस्ट २०२२ ते दिनांक १5 ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) म्हणजेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हर घर तिरंगा हे अभियान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रेरणा देते, हर घर तिरंगा अभियानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वयंस्फूर्तीने आपल्या घरी तिरंगा फडकावून सहभागी होणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकांच्या हृदयात देशभक्ती जागृत होऊन आपल्या राष्ट्रध्वजा बद्दल जागरुकता वाढेल, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत  राहील, व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण राहून प्रेरणा मिळेल आणि सर्व धर्मसमभाव टिकून राहील. यासाठी सर्वांनी हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) या अभियानात सहभागी व्हावे.

हर घर तिरंगा 'संकल्प से सिद्धी'

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवत, त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला तरुण वर्गाला समजावे माहिती व्हावे, आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठीच 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम देशभरात मोठया उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येत आहे. 

देशाने गेल्या ७५ वर्षात केलेली प्रगती याबरोबरच, पुढील २५ वर्षांत भारत जगात वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुद्धा प्रयत्न यामध्ये होणार आहे. 'संकल्प से सिद्धी' या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची २५ वर्षांतील वेगवेगळ्या क्षेत्रातीत प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहेत. कृषी उत्पादन, सेवा, सहकार, शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात देशाची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल. यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 

हर घर तिरंगा मोहीम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रध्वजाशी संबंधित सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे, तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाने हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी व्हावे, चला तर आपण सर्व भारतीय नागरीक हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊ या देशाचा सन्मान आणि अभिमान असणारा तिरंगा आपल्या घरावर डौलाने फडकू या.

"माझ्या घरी अभिमानाने उभारणार तिरंगा 

हर घर तिरंगा हर घर तिरंगा"


माझा तिरंगा, माझा अभिमान

चला मिळून साजरा करूया हर घर तिरंगा अभियान 


>>  घरोघरी तिरंगा फडकावण्याबाबतचे नियम 

>>  'हर घर तिरंगा' | घरोघरी तिरंगा संपूर्ण माहिती

>> 'हर घर तिरंगा' कार्यक्रमासाठी ई-साहित्य  | Har Ghar Tiranga Anthem Download

Post a Comment (0)
Previous Post Next Post