प्रत्येकाच्या आयुष्यात एका टप्यावर आपल्याला योग्य करियर चे क्षेत्र निवडावे लागते. त्यामध्ये तर बहुतेक जण पारंपारिक घराणेशाही मध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय निवडतात. डॉक्टर च्या मुलांनी डॉक्टर व्हावे, घरामध्ये आई वडिलांना सरकारी नोकरी असेल तर मग माझा पण मुलगा सरकारी नोकरीला लागावा, घरांमध्ये चालत आलेला पारंपारिक व्यवसाय असेल तर मुलांनी तो व्यवसाय पुढे चालू ठेवावा. अशी एक प्रकारची मानसिकता झालेली आहे. खूप कमी पालक आपल्या मुलांच्या कलेनुसार आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यास सांगतात. पण आता पहिल्या सारखे राहिलेले नाही. कौशल्य आधारित शिक्षण आणि नोकरी व्यवसाय हा मुलांच्या मध्ये असलेले स्कील , क्षमता त्यानुसार भविष्यात यशस्वी होता येईल.