10 वी नंतर काय करावे? | What to do after 10th in marathi

10 वी नंतर पुढे काय करावे? हा प्रश्न सर्वच 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व परीक्षा दिलेल्या मुलांच्या आणि पालकांच्या मनात असलेला सामान्य प्रश्न आहे. जीवनामध्ये पुढे काय करायचे? कोणत्या क्षेत्रात करियर करायचे? हा ठरवण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आज आपण पाहणार आहोत की 10 वी नंतर पुढे काय करावे? (What to do after 10th in marathi) 10 वी नंतर शैक्षणिक पर्याय कोणते आहेत? आणि शेवटच्या भागात विशेष बोनस- विविध कोर्स, आवश्यक शैक्षणिक पात्रता, संबंधित कॉलेज महाविद्यालयाची माहिती , शिक्षण/कोर्स करण्यासाठी शिष्यवृत्तीची माहिती , भविष्यातील संधी , कोणत्या क्षेत्रात तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा विषयी माहिती , आवश्यक क्षमता , नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती आपणास मोफत स्वरुपात अधिकृत माहिती कोठे मिळेल? त्याची माहिती आपणास देण्यात येईल. तेव्हा संपूर्ण लेख अवश्य वाचा.


{tocify} $title={Table of Contents}10 वी नंतर काय करावे?


 10 वी नंतर काय करावे? | What to do after 10th in marathi

दहावी नंतर काय करावे? (What to do after 10th) याचे उत्तर जाणून घेण्याआधी आपण करियर कसे निवडायचे? हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे करियर निवडण्याआधी करियर निवडण्याचे सूत्र काय आहे? ते पाहूया.

करियर म्हणजे काय? | What is career?

करिअर = आवड + क्षमता + भविष्यातील संधी 

करियर म्हणजे काय? आणि करियर कसे निवडायचे? याचे उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊया ज्या क्षेत्रात  करियर निवडण्यासाठी आपल्याला असलेली आवड+ क्षमता+भविष्यातील संधी या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करून स्वत:मधील क्षमतांचा शोध घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपण योग्य करियर निवडले असे म्हणता येईल.


थोडक्यात काय तर करियर निवडताना आपल्याला ज्या क्षेत्रात/विषयात आवड आहे. त्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता आहे आणि त्या क्षेत्रात भविष्यात संधी देखील तितक्याच अधिक प्रमाणात आहे तेव्हा आपण योग्य करियर निवडले असे म्हणता येईल. हे अजून विस्ताराने समजून घेण्यासाठी खालील आर्टिकल अवश्य वाचा.

आता आपण पाहू कि,  10 वी नंतर करियरचे शैक्षणिक पर्याय (What are career options after 10th) कोणते आहेत.

10 वी नंतर करियरचे शैक्षणिक पर्याय | What are career options after 10th

10 वी नंतर करियर कोणत्या क्षेत्रात करावे? हा मोठा प्रश्न पालक आणि मुलांसमोर असतो. मित्राने हा कोर्स केला म्हणून मी पण तोच करणार , नातेवाईकांमध्ये कोणी मेडिकल/ITI/इंजिनिअरिंग केले म्हणून मग मी पण त्या क्षेत्रात करियर करतो. हा खूप गोंधळून टाकणारा प्रश्न सध्या दहावीची परीक्षा दिलेल्या मुलांसमोर आणि विशेष करून पालकांपुढे हा प्रश्न आहे. 

पण पुढे जाण्याआधी मी आपणास सांगू इच्छितो की, खालील 10 वी नंतर करियरचे शैक्षणिक पर्याय निवडण्याआधी करियर कसे निवडावे? स्व:ची ओळख कशी करून घ्यावी? माझ्यामध्ये कोणत्या क्षेत्रात करियर करण्याची क्षमता आहे? हे आर्टिकल अवश्य वाचावे. जेणेकरून आपणास योग्य क्षेत्रात करियर करण्यास मदत होईल. चला तर आता पाहूया दहावी नंतरचे करियर साठी कोणते शैक्षणिक पर्याय आहेत. यामध्ये आपण इयत्ता 11वी आणि 12वी , डिप्लोमा कोर्सेस, मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस, पॉलिटेक्निक कोर्सेस, व्होकेशनल कोर्सेस, आयटीआय कोर्सेस ची माहिती पाहणार आहोत. 

10 वी नंतर करियरचे शैक्षणिक पर्याय | What are career options after 10th

 1. इयत्ता 11वी आणि 12वी (Class 11th & 12th)
 2. डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courrses)
 3. मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस (Medical & Paramedical Courses)
 4. पॉलिटेक्निक कोर्सेस  (Polytechnic Courses)
 5. व्होकेशनल कोर्सेस (Vocational Courses)
 6. आयटीआय कोर्सेस (ITI Courses)

10 वी आणि 12 वी नंतर करिअरचे  पर्याय | What are the career options after 10th and 12th?

1. इयत्ता 11वी आणि 12वी (Class 11th & 12th)

पारंपारिक चालत आलेला पहिला पर्याय म्हणजे 10 वी नंतर 11 वी व 12 वी (Class 11th & 12th) यामध्ये गोंधळून टाकणारा प्रश्न म्हणजे 10 नंतर कोणत्या शाखेला प्रवेश घेऊ, 12 नंतर पुढे कोणत्या शाखेला कुठे स्कोप आहे. हे आता आपण थोडे विस्ताराने पाहूया म्हणजे 11 वी ला प्रवेश घेतानाच आपण निच्छित असा निर्णय घेऊ शकू कि, मला 12 नंतर कोठे प्रवेश घ्यायचा आहे?
 1. विज्ञान(Science)
 2. कला (Arts)
 3. वाणिज्य (Commerce) 
 4. तांत्रिक (Technical) 
दहावीनंतर विज्ञान(Science), कला (Arts), वाणिज्य (Commerce) आणि तांत्रिक (Technical) अशा चार शाखांचा पर्याय आपल्या समोर असतो. या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याचा विस्तार कसा होत जातो. ते आता पाहुया.

1. विज्ञान (Science) विज्ञान शाखेतील करियर


10 नंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा? हे सुद्धा एकमेकांचे पाहून आपण बऱ्याचदा ठरवतो की, त्याने या शाखेला प्रवेश घेतला म्हणून मी पण घेणार परंतु आता आपण आपल्या आवडीच्या आणि क्षमतेच्या शाखेत प्रवेश घेणार आहोत. 

विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी शक्यतो इंग्रजीचा पाया बऱ्यापैकी पक्का असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विज्ञान शाखेतील विषयाचा अभ्यास हा इंग्रजीत करावा लागतो.

विज्ञान शाखेत रसायन शास्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या मुख्य विषयांचा समावेश असतो. आणि मराठी व इंग्रजी या दोन मुख्य भाषा अभ्यासावयास असतात. तर भूगोल व कृषी क्षेत्राशी संबंधित विषय हे ऐच्छिक असतात.  

विज्ञान शाखेतून बारावी नंतरचे शैक्षणिक पर्याय/कोर्सेस 

एकदा का तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतला की, त्यानंतर म्हणजेच बारावीनंतर खालील कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. म्हणजे त्या क्षेत्रात तुम्हाला करियर करता येते. 

1. वैद्यकीय (MEDICINE) शाखा

 1. एम. बी. बी. एस. (M.B.B.S.)
 2. बी. डी. एस. (B.D.S)
 3. बी. फार्मसी. (B. Pharma)
 4. बी. ए. एम. एस.
 5. बी. एच. एम. एस.
 6. पॅरामेडिकल कोर्सेस

पॅरामेडिकल कोर्सेस 

पॅरामेडिकल कोर्सेस  अंतर्गत खालील कोर्स करता येते.

1) फिजिओथेरपी
2) सी. एम. एल. 
3) स्पीच थेरपी
4) नर्सिंग
5) ऑप्टोमेट्री

2.अभियांत्रिकी (Engineering)

 1. सिव्हिल इंजिनिअर
 2. मेकॅनिकल इंजिनिअर
 3. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर
 4. मेटॅलर्जी इंजिनिअर
 5. कॉम्प्युटर इंजिनिअर
 6. प्रॉडक्शन इंजिनिअर
 7. मरिन इंजिनिअरिंग

3. तांत्रिक डिप्लोमा (Technical Diploma)

 1. आय.टी.आय.
 2. एन. आय. आय. टी.
 3. व्ही. जे. टी. आय.

4. बी. एस्सी.

 1. सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology)
 2. रसायनशास्त्र (Chemistry)
 3. भौतिकशास्त्र (Physics)
 4. संख्याशास्त्र (Statistics)
 5. गणित (Mathematics)
 6. वनस्पतीशास्त्र (Botony)
 7. प्राणिशास्त्र (Zoology)
 8. बायोकेमिस्ट्री (Biochemistry)
 9. इलेक्ट्रॉनिक्स (Electronics)
 10. विमाशास्त्र (Acturial science)

5. बी. एस्सी. (ॲग्रिकल्चर) 

6.बी. सी. ए. (Bachelor of Computer Application)

7. बी. बी. ए. (Bachelor of Business Administration)

8. बी. सी. एस. (Bachelor of Computer Science)

9. बी. एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) 

10. बी. एस्सी. (आय. टी.)

11. बी. एस्सी. (हॉटेल मॅनेजमेंट)

2. कला (Arts) | आर्ट शाखेतील करियर संधी

कला शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, इतिहास, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांचा अभ्यास अकरावी व बारावी इयत्तेत केला जातो.

कला शाखेतून बारावीनंतरचे शैक्षणिक पर्याय/कोर्सेस

 1. बी. एस. एल. एल. बी.
 2. बी. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, भूगोल, संस्कृत, संगीत इ.)
 3. आय. टी. आय.
 4. तत्सम सर्टिफिकेट कोर्सेस

३) वाणिज्य (Commerce) कॉमर्स शाखेतील करियर

कॉमर्स  शाखेत प्रवेश घेतल्यानंतर या शाखेमध्ये मुख्यतः व्यवसाय आणि वित्तीय या दोन प्रमुख बाबी अभ्यासल्या जातात. उदा. अर्थशास्त्र, टॅक्सेशन (Taxation), वाणिज्य संघटन, अकाऊंटंसी, ऑडिटिंग, गणित, चिटणीसाची कार्यपद्धती, कॉस्टिंग या विषयाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो.

वाणिज्य शाखेमध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत. या संधी तुम्हाला पुढील वेगवेगळ्या कोर्सेससाठी प्रवेश घेऊन मिळविता येतील. अर्थविषयक सर्व घडामोडींचा अभ्यास वाणिज्य शाखेत केला जातो. वाणिज्य शाखेच्या पदवीधरांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वेगवेगळे कोर्सेस करता येतात. या कोर्सेसमध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन, चार्टर्ड अकाऊंटंट, एम. कॉम. या ज्ञानशाखांचा समावेश होतो.

वाणिज्य शाखेतून १२ वीनंतरचे शैक्षणिक पर्याय/कोर्सेस

 1. बी. कॉम.
 2. आय. सी. डब्ल्यू. ए. (cost accountant) 
 3. सी. एफ. ए. (chartered financial analyst)

वरील I. C. W.A. व CFA हे कोर्स ग्रॅज्युएशन चालू असताना पूर्ण करताना म्हणजेच बी. कॉम करत असताना पूर्ण करता येतात. त्यानंतर तुम्ही कॉस्ट अकौंटंट व चार्टर्ड फायनान्सशियल अॅनालिस्ट म्हणून काम करू शकता.

वाणिज्य शाखेतून पुढील सर्टिफिकेट कोर्स व डिप्लोमा सुद्धा करता येतात.
 1. डिप्लोमा इन अकौंटन्सी
 2. डिप्लोमा इन सेक्रेटरियल प्रॅक्टिस
 3. डिप्लोमा इन कॉमर्स (D. Com)
 4. सर्टिफिकेट कोर्स इन बुक किपींग अँड अकौंटन्सी
 5. पर्सनल सेक्रेटरी
 6. सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट हॅन्ड टायपिंग

डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courrses)

 1. Diploma in Engineering
 2. Diploma in Hotel Management
 3. Diploma in Journalism
 4. Diploma in Education
 5. Diploma in Photography
 6. Diploma in Psychology
 7. Diploma in Elementary Education
 8. Diploma in Digital Marketing
 9. Diploma in Fine Arts
 10. Diploma in English
 11. Diploma in Fashion Designing
 12. Diploma in Graphic Designing
 13. Diploma in Web Development
 14. Diploma in Web Designing
 15. Diploma in Game Designing
 16. Diploma in Bakery & Confectionery
 17. Diploma in Hotel Reception & Book Keeping
 18. Diploma in Food Technology
 19. Diploma in Information Technology
 20. Diploma in Makeup and Beauty
 21. Diploma in Event Management
 22. Diploma in Business Management
 23. Diploma in Marine Engineering
 24. Diploma in Animation
 25. Diploma in Textile Designing
 26. Diploma in Leather Designing
 27. Diploma in Textile Engineering

मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस (Medical & Paramedical Courses)

 1. Diploma in Hospital Assistance
 2. Diploma in Rural Healthcare
 3. Pathology Lab Technician 
 4. Diploma in Paramedic Nursing
 5. Certificate of Nursing Assistants
 6. Diploma in Physiotherapy
 7. Diploma in X-Ray Technology
 8. Diploma in ECG Technology
 9. Diploma in Radiology
 10. Diploma in Dental Mechanics
 11. Diploma in Pharmacy

पॉलिटेक्निक कोर्सेस  (Polytechnic Courses)

 1. Diploma in Computer Programming
 2. Graduate Certificate in Marketing Management
 3. Diploma in Petroleum Engineering
 4. Diploma in Business Administration
 5. Diploma in Animation, Art & Design
 6. Diploma in Hospitality Management
 7. Diploma in Accounting
 8. Diploma of Early Childhood Education & Care

व्होकेशनल कोर्सेस (Vocational Courses)

 1. Digital Marketing
 2. Occupational Therapy
 3. Agriculture
 4. Journalism
 5. Certificate in Animation
 6. Certificate Course in
 7. Functional /Spoken English
 8. Certification in Mobile Repairing course -
 9. Diploma in Commercial
 10. Practise
 11. Diploma in Cosmetology
 12. Diploma in Stenography
 13. Diploma in Leather Technology
 14. Diploma in Mechanical
 15. Engineering
 16. Diploma in 3D Animation

आयटीआय कोर्सेस (ITI Courses)

 1. Electrician
 2. Radiology Technician
 3. Insurance Agent
 4. Digital Photographer
 5. Fashion Design & Technology,
 6. Sewing Technology
 7. Tool and Die Making
 8. Computer Operator and Programming Artists

10 वी नंतर काय करावे? यासाठी महाकरियर पोर्टल चा वापर कसा करावा?


10 नंतर काय करावे? यासंदर्भात विविध पर्याय आपण बघितले. करियर निवडणे जेवढे महत्वाचे आहे. मात्र आपण निवडलेल्या कोर्स , कॉलेज , शैक्षणिक शिष्यवृत्ती , भविष्यातील नोकरी च्या संधी, किती इनकम मिळू शकतो. याचे उत्तर आपल्याला महा करियर पोर्टल मध्ये मिळून जाईल. महाराष्ट्र शासनाने करियर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी दोन वर्षापूर्वी महा करियर पोर्टल सुरु केले आहे. याची माहिती आपल्याला असेलच किंवा या लेखाच्या माध्यमातून आपल्याला माहिती झाले असेल.

महाकरियर पोर्टलचा वापर करण्यासाठी इयत्ता ९ वी ते १२ वी च्या मुलांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. महा करियर पोर्टल वर लॉगीन करण्यासाठी आपल्याला सरल आयडी आवश्यक आहे. तो आपणास आपल्या शिक्षकांकडून मिळेल. आणि सर्वांसाठी पासवर्ड 123456 हा आहे.

महा करियर पोर्टल चा वापर कसा करावा? (How to use Maha Career Portal?) यासंदर्भात याआधीच्या लेखात चर्चा केली आहे. तेव्हा आपण आवर्जून हा लेख संपूर्ण वाचन करून अवश्य  महा करियर पोर्टलचा वापर करावा.
महा करियर पोर्टल मध्ये आपणास विविध कोर्स, शैक्षणिक पात्रता ,कॉलेज महाविद्यालयाची माहिती , शिष्यवृत्ती माहिती , भविष्यातील संधी , तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा विषयी , आवश्यक क्षमता , नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती आपणास महाकरियर पोर्टल वर अगदी मोफत मिळेल.Post a Comment (0)
Previous Post Next Post