‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ | School Health Programme In Marathi

School Health Programme In Marathi



{tocify} $title={Table of Contents}


‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ | School Health Programme In Marathi

केंद्र शासनाच्या ‘आयुषमान भारत’ योजनेंतर्गत संपूर्ण देशभरात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांच्या मार्फत ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health And Wellness Programme) सुरु करण्यात आला आहे.

शालेय आरोग्य कार्यक्रमचा उद्देश

शिक्षण पद्धती मध्ये दिवसेंदिवस काळानुरूप बदल होताना आपणास दिसत आहे. पारंपारिक चालत आलेल्या शिक्षण पद्धती पेक्षा विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीकडे कल आपल्याला दिसून येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०  (NEP 2020) नुसार खूप मोठा बदल आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे. 

>> शाळा विकास आराखडा (SDP) येथे वाचा -PDF डाउनलोड करा.

>> राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) 

>> 10 वी नंतर करियर कसे निवडावे? 

मुलांमधील अतिचंचलता लक्षणे व गुणकारी उपाययोजना

शालेय आरोग्य कार्यक्रमचा मुख्य उद्देश म्हणजे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, विद्यार्थ्यांना स्वतः आरोग्याची जाणीव क काळजी घेता येणे या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा शालेय आरोग्य कार्यक्रमचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये सहभागी जिल्हे कोणते आहेत?

महाराष्ट्र ‘आयुषमान भारत’ या उपक्रमांतर्गत SCHOOL HEALTH AND WELLNESS कार्यक्रम हा यवतमाळ, पालघर, अहमदनगर, ठाणे, नाशिक, जालना व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित शाळेत राबविण्यात येणार आहे.

>> निपुण भारत मिशन कार्यक्रम २०२२

शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण हे कोणासाठी आहे?

इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

शालेय आरोग्य कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी कालावधी

नोंदणी - दि. १८/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ या कालावधीत करणे अनिवार्य आहे. 

शालेय आरोग्य कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी लिंक (School Health Program Registration Link Maharashtra) नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

शालेय आरोग्य कार्यक्रम ऑनलाईन प्रशिक्षण कालावधी

शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षणाचे आयोजन कालावधी - दि.२३/०३/२०२२ ते २६/०३/२०२२

सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक यांनी School Health Programme Portal वरील मेनू Pre-test, Training session, Schedule यावर शाळा UDISE क्रमांकाद्वारे लॉगीन करून वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित रहायचे आहे. प्रशिक्षणार्थींनी सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करून पालन करावे.

> School Health Programme Portal Official Website Link - https://shp.scertmaha.ac.in/

शालेय आरोग्य कार्यक्रम PDF | School Health Programme Training Material

School Health Programme Portal Official Website वर शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षणाचे मटेरियल PDF उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा आणि ट्रेनिंग मटेरियल डाउनलोड करून घ्या.

शालेय आरोग्य कार्यक्रम PDF | School Health Programme Training Material

शालेय आरोग्य कार्यक्रम

सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांनी School Health Programme Portal वरील Pre-test, Training session, Schedule यावर शाळा UDISE क्रमांकाद्वारे लॉगीन करून वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. 

School Health Programme Portal 

>> 10 वी नंतर करियर कसे निवडावे? 

हे ही वाचा

>> मराठी निबंध येथे वाचा

>> 'कोरोना संकट ' मराठी निबंध 


Post a Comment (0)
Previous Post Next Post