टर्म इन्शुरन्स प्लान हा एक प्रकारचा वैयक्तिक विमा (Personal Insurance) आहे. मागील आर्टिकल मध्ये आपण विमा आणि विमा पॉलिसी प्रकार या बद्दलची माहिती घेतली. आजच्या काळात प्रत्येकाला विमा काढण्याची गरज भासू लागली आहे. कोरोना संकट काळात प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्या बरोबर आपल्या कुटुंबाची देखील काळजी लागलेली आहे. कधी काय होईल? कोणते संकट येईल हे सांगता येत नाही. यासाठी प्रत्येकाला वाटत आहे की, भविष्यात आर्थिक घडी बिघडू नये यासाठी योग्य आर्थिक नियोजन करू लागले आहे. त्यातच एक म्हणजे विमा काढणे, विमा आपण कोणत्या गोष्टींचा काढू शकतो. विम्याचे प्रकार कोणते आहेत? त्याची माहिती बघितली. आपण जर ते आर्टिकल वाचले नसेल तर येथे क्लिक करा. आज आपण वैयक्तिक विमा (Personal Insurance) चा एक प्रकार म्हणजे टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? (Term Insurance Meaning In Marathi) त्याचा मराठीत अर्थ समजून घेणार आहोत. त्याचबरोबर टर्म इन्शुरन्सचे प्रकार आणि फायदे कोणकोणते आहेत ते आजच्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा हे आर्टिकल संपूर्ण वाचावे.
>> विमा पॉलिसी म्हणजे काय? | विमा कोणकोणत्या प्रकारचा असतो? | विमा पॉलिसीचे महत्व
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? प्रकार व फायदे | Term Insurance Meaning In Marathi
टर्म इन्शुरन्सचा अर्थ | Term Insurance Meaning In Marathi
टर्म इन्शुरन्स (Term Insurance) हा एक वैयक्तिक स्वरूपाचा विमा आहे. टर्म (Term) या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. टर्म म्हणजे ठराविक कालावधीकरिता किंवा ठराविक मुदतीचा विमा म्हणजे टर्म इन्शुरन्स असा साधा आणि सोपा अर्थ टर्म इन्शुरन्सचा आहे. या विमा प्रकारामध्ये मध्ये टर्म ला अधिक महत्व दिलेले असते. त्याची ते अजून विस्ताराने समजून घेऊया.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | What is term insurance in marathi
Term Insurance आणि Life insurance हे दोन वैयक्तिक विम्याचे प्रकार आहे. यामधील टर्म इन्शुरन्स प्लान हा ठराविक मुदतीचा असतो, तर लाईफ इन्शुरन्स हा संपूर्ण आयुष्याचा विमा काढता येतो.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
हे आपल्याला खालील मुद्याच्या आधारे समजून घेता येईल.
- टर्म विमा हा एक मूलभूत आणि सर्वात सोपा प्रकारचा जीवन विमा आहे.
- जो विमा काढलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लाभार्थी (नॉमिनी) व्यक्तीस विमा राशी (सम अॅश्युअर्ड) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमा रकमेची भरपाई करते.
- विमाधारकास पॉलिसीकडे प्रीमियम भरावा लागतो. ज्यास त्रैमासिक, मासिक किंवा वार्षिक प्रकारे विविध प्रकारे अदा केले जाऊ शकते.
- विमाधारकांमध्ये वार्षिक आणि मासिक पर्याय सर्वात लोकप्रिय आहेत.
- पॉलिसीच्या कार्यकाळात जर विमाधारक व्यक्ती जिवंत राहिल्यास कोणताही परतावा परत मिळत नाही.
- जीवन विम्याचा सर्वात स्वस्त प्रकार असल्याने, टर्म प्लान्स इतर प्रकारांच्या विम्यापेक्षा कमी प्रीमियमवर उच्च विमा कव्हरेज देऊ करण्यात सक्षम असतात.
अशा प्रकारच्या विम्याला टर्म इन्शुरन्स (Term Insurance) असे म्हणतात.
टर्म इन्शुरन्सचे प्रकार | Types of Term Insurance In Marathi
टर्म इन्शुरन्स प्लान (मुदत विमा प्रकार) कोणते आहेत? त्याची माहिती खालीलप्रमाणे
१. लेव्हल टर्म इन्शुरन्स प्लान Level Term Plan
- लेव्हल टर्म इन्शुरन्स प्लान जो की, सामान्य टर्म इन्शुरन्स प्लान आहे.
- विशेषतः भारतातील विमा कंपन्यामार्फत दिला जाणारा लेव्हल टर्म प्लॅन हा सर्वात सामान्य प्रकार आहे.
- लेव्हल टर्म इन्शुरन्स प्लान मध्ये विमा पॉलिसी काढताना जी विम्याची रक्कम ठरवलेली असते. ती विमा पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीसाठी स्थिर राहते.
- लेव्हल टर्म इन्शुरन्स प्लान मध्ये विमा खरेदी करताना विमा काढणाऱ्या व्यक्तीचे वय जितके कमी असेल तितका प्रीमियम कमी असतो.
२. प्रीमियम चा टर्म रिटर्न इन्शुरन्स प्लान (टी.आर.ओ.पी) | Term Return of Premium Plans (TROP)
- TROP टर्म रिटर्न इन्शुरन्स प्लान मध्ये मॅच्युरिटीचे फायदे मिळतात.
- TROP टर्म रिटर्न इन्शुरन्स प्लान चे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसी कालावधीच्या शेवटी विमा धारकाला मॅच्युरिटी रक्कम गुंतवलेले पैसे परत मिळतात.
- पॉलिसी कालावधी संपला असेल आणि विमा धारक व्यक्ती टिकून असेल तर विमाधारकाला विमा पॉलिसी कालावधीत भरलेले प्रीमियम रक्कम परत केली जाते.
- TROP टर्म रिटर्न इन्शुरन्सचे प्रीमियम सामान्यत: प्रमाणित मुदतीच्या योजनेपेक्षा जास्त असतात.
३. टर्म इन्शुरन्स वाढवणे | Increasing Term Insurance
- Increasing Term Insurance प्रकारच्या प्लॅन मध्ये विमा पॉलिसी कालावधी मध्ये एका विशिष्ट काळात म्हणजेच टर्म संपण्याआधी टर्म इन्श्युरन्स विमा रक्कम वाढवण्याची सुविधा मिळते.
- या प्रकारच्या टर्म प्लॅनची मुदत ही इतर टर्म इन्श्युरन्सपेक्षा जास्त असते.
- या प्रकारच्या टर्म इन्श्युरन्स मध्ये जास्त प्रीमियम भरावा लागेल.
४. टर्म इन्शुरन्स कमी करणे | Decreasing term insurance
Decreasing term insurance या प्रकारामध्ये आपल्याला टर्म इन्श्युरन्स विमा रक्कम ही जसजसे आपले वय वाढत जाते. तसे आपले दायित्व कमी कमी होत जाते. म्हणजे विमा रक्कम देखील कमी होत जाते.
५. परिवर्तनीय मुदत योजना | Convertible Term Plans
Convertible Term Plan मध्ये निश्चित केलेल्या तारखेला दुसऱ्या प्रकारच्या विमा पॉलिसी मध्ये रूपांतरित करता येते.
टर्म इन्शुरन्सचे काही प्रकाराची (Types of Term Insurance In Marathi) माहिती आपण बघितली. यामध्ये विमा कंपन्या काळानुरूप आवश्यक ते नवनविन फिचर/योजना आणत असतात. त्यामुळे यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपण टर्म इन्श्युरन्स प्लान घेताना अवश्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer - टर्म इन्श्युरन्स संदर्भात ही प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्ष विमा काढण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)
टर्म इन्शुरन्सचे फायदे | Term Insurance Benefits In Marathi
ज्या कुटुंबामध्ये जास्त सदस्य आहेत. आणि एका प्रमुख व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी असेल तर त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. जेणेकरून यदाकदाचित काही अपरिचित घटना घडल्यास कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे घरातील मुलांचे शिक्षण ,लग्न, आरोग्यासाठी लागणारा खर्च करण्यास याची मदत होऊ शकेल. आता आपण पाहूया लाभ टर्म इन्श्युरन्स चे फायदे कोणते मिळतात. (Term Insurance Benefits )
- टर्म इन्शुरन्स चा महत्वाचा फायदा म्हणजे कमी प्रीमियम मध्ये जास्त रिस्क कव्हर मिळते.
- टर्म इन्श्युरन्स घेतल्यामुळे घरातील कमवता व्यक्तीच्या पश्च्यात कुटुंबाला एक प्रकारे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी याची मदत होते.
- काही टर्म इन्शुरन्स प्लान मध्ये सुरक्षितता बरोबरच पैशाची गुंतवणूक होते. जी की, मुदत विमा संपल्यानंतर प्रिमियम भरलेली रक्कम परत मिळते.
- टर्म इन्श्युरन्स हा इतर विमा पॉलिसी पेक्षा समजण्यास सोपा टर्म प्लान आहे. त्याचे प्रीमियम, मुदत आणि लाभ सहजरीत्या लक्षात येतात.
- टर्म इन्श्युरन्स प्लान मध्ये एकापेक्षा जास्त डेथ बेनिफिट विमा काढता येतो.
- या प्लान मध्ये आपल्याला अतिरिक्त रायडर्स (Additional Riders to Strengthen the Policy) ची सुविधा मिळते. म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण टर्म इन्श्युरन्स प्लान काढतो, त्या व्यक्तीस एखाद्या गंभीर आजर झाल्यास प्रीमियम भरणे सक्षम नसेल अशा वेळी टर्म लाईफ कव्हर सुरूच राहतो.
- टर्म इन्श्युरन्स प्लान मध्ये रायडर्स सुविधा घेतल्यास गंभीर आजारात वैद्यकीय खर्चासोबत लाईफ मिळते.
- आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी नुसार Income Tax Benefits चा लाभ मिळतो.
- पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास मिळणारी विम्याची रक्कम ही पेआऊट मध्ये नॉमिनी हे वार्षिक , सहामाही किंवा मासिक आधारावर मिळणारे उत्पन्न (विमा रक्कम) हा पर्याय निवडू शकते.
सारांश
टर्म इन्श्युरन्स प्लान घेताना सर्वप्रथम त्यासंबंधीची माहिती करून घेणे आवश्यक असते. आजकाल गुगल च्या माध्यमातून ही गोष्ट सहज शक्य होत आहे. जीवन विमा काढण्यासाठी बहुतेक जणांच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो. की नक्की टर्म इन्श्युरन्स म्हणजे काय आहे? त्यातही मराठी भाषिक वर्ग मराठीत माहिती घेण्यास इच्छुक असतो. याच उद्देशाने आज आपण टर्म इन्श्युरन्स म्हणजे काय? (Term Insurance Meaning In Marathi) त्याचे प्रकार आणि जीवन विम्याचाच एक प्रकार म्हणजे टर्म इन्श्युरन्स काढल्यानंतर आपल्याला कोणते फायदे मिळणार याविषयीची माहिती आपण घेतली. या आर्टिकल मधून आपणस टर्म इन्श्युरन्स संबंधी असणारे खूप सारे प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तेव्हा हा लेख अवश्य वाचा.
हे ही वाचा
>> विमा पॉलिसी म्हणजे काय? | विमा कोणकोणत्या प्रकारचा असतो? | विमा पॉलिसीचे महत्व
>> टर्म इन्श्युरन्स प्लान का आवश्यक आहे? | Term Insurance Needs Analysis