टर्म इन्श्युरन्स प्लान का आवश्यक आहे? | Term Insurance Needs Analysis in marathi

टर्म इन्श्युरन्स  (जीवन विमा) प्रत्येकाला आवश्यकता असते असे नाही. त्याचे वेगवेगळे कारणे आहेत. आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणारी व्यक्ती, घरातील प्रमुख व्यक्ती, आर्थिक सोर्स , कौटुंबिक जबाबदाऱ्या , भविष्यातील आर्थिक चढ-उतार अशा काही ढोबळ Parameters द्वारे आपण स्वतःचे (Term Insurance Needs Analysis in marathi) करून टर्म विमा घ्यावा किंवा नाही? ठरवता येईल. 

आपल्यावर घरातील कोणी एक व्यक्ती आर्थिक दृष्ट्या अवलंबून तर नाही ना? नसल्यास शक्यतो आपल्याला टर्म इन्श्युरन्स ची आवश्यकता नाही. मात्र याउलट जर आपल्या जाण्याने आपले मुले,पती किंवा पालक यांना आर्थिक त्रास होणार असेल तर जरूर आपला टर्म प्लान असायला हवा.

टर्म इन्श्युरन्स प्लान हा जीवनामध्ये प्रत्येक टप्यावर आपल्याला याचे (Term Insurance Needs Analysis) करावे लागेल. तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकू. आज आपण काही ठराविक जीवनातील अवस्थांवर आधारित खरच टर्म इन्श्युरन्स (जीवन विमा) आवश्यक आहे का? याचे Analysis करूया. याठिकाणी आपण आपल्या परिस्तिथीनुसार योग्य निर्णय घ्यावा.

>> टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? प्रकार व फायदे | Term Insurance Meaning In Marathi

Term Insurance Needs Analysis in marathi


टर्म इन्श्युरन्स प्लान का आवश्यक आहे? | Term Insurance Needs Analysis in marathi

टर्म इन्श्युरन्स विमा काढावा किंवा नाही याचे काही Parameters  हे आजच्या परिस्थितीवर लक्षात घेऊन आपण योग्य निर्णय घ्यावा.

कुटुंबातील एकही व्यक्ती आपल्यावर अवलंबून नाही. अशावेळी टर्म इन्श्युरन्स घ्यावा का?

कुटुंबातील एकही व्यक्ती आपल्यावर अवलंबून नसेल अशा परीस्थितीत आपल्याला विम्याची आवश्यकता आहे का? याचे उत्तर नाही असे आहे. 

उदा. आपण अविवाहित आहात, विवाहित आहात पण मुल बाळ नाही, पत्नी देखील नोकरी करते.

परंतू जर घरात एखादे वयोवृद्ध पालक किंवा भविष्यात आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. किंवा आपल्या जीवनशैली नुसार आपल्या पश्च्यात दैनदिन जीवनशैली खर्च भागवण्याची कमतरता वाटत असल्यास,  अशा वेळी आपण टर्म इन्श्युरन्स  विमा काढण्याचा विचार करू शकता.

नुकतेच लग्न झाले आहे. अशावेळी टर्म इन्श्युरन्स घ्यावा का?

  • आपल्या कुटुंबात आपण दोघेही पती/पत्नी कमावते आहात का? 
  • घरातील कौटुंबिक जबाबदारी आपल्यावर आहे का?
  • कुटुंब आपल्या उत्पनावर अवलंबून आहे का?

अशावेळी जर वरील प्रश्नांचे उत्तर नाही असेल तर सध्या आपणास विमा काढण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु जर उत्तर हो असेल तर आपल्याला आपला टर्म इन्श्युरन्स  काढावा लागेल. आपण आपल्या परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.

आपले लग्न झाले आहे आणि आपल्याला मुले आहेत. अशावेळी टर्म इन्श्युरन्स घ्यावा का?

कोणत्याही प्रकारचा विमा काढताना सर्वप्रथम एक गोष्ट समोर येते ती म्हणजे आपण एकटेच कमावते आहात का? कुटुंबाची जबाबदारी आपणावर आहे का? आणि त्यातच आपले लग्न झाले आहे आहे आणि मुले लहान आहेत. त्यांचे शिक्षण सुरु आहे. अशा वेळी मुलांचा सांभाळ करणे, शिक्षणाची जबाबदारी, त्याचबरोबर आई गृहिणी आहे. अशा परिस्थितीत आपल्याला टर्म इन्श्युरन्स प्लान घेण्याची जास्त आवश्यकता आहे. घरातील आई-बाबा दोघेही कमावते असल्यास विम्याच्या तीव्रता कमी-जास्त होऊ शकेल.

आपण विवाहित असाल किंवा अलीकडे पालक झाला असाल अशा वेळी आपण टर्म इन्श्युरन्स  खरेदी करणे आवश्यक आहे. आपल्या परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.

कमावण्याचे साधन (नोकरी,व्यवसाय) शास्वती कायमस्वरूपी आहे का? अशावेळी टर्म इन्श्युरन्स घ्यावा का?

आपण प्रत्येक जण जाणत आहोत की, कोरोना संकट काळात कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय बंद पडले, रोजगार मिळू शकला नाही. अशा वेळी जर भविष्यातील अशा प्रकारची शक्यात संकट येऊ शकेल आणि एकीकडे घरातील मुलांचे शिक्षण, लग्न बाकी असेल अशा परिस्थितीत आपण विमा काढण्याचा अवश्य विचार करावा.

सारांश

टर्म इन्श्युरन्स प्लान हा प्रत्येकाच्या गरजेनुसार विमा काढावा किंवा नाही. हे ठरवता येईल. आज आपण काही कौटुंबिक जबाबदारी आणि वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन टर्म इन्श्युरन्स प्लान केव्हा काढावा? याचे Term Insurance Needs Analysis केले. त्यावरून आपल्या परिस्थिनुसार आपण योग्य निर्णय घ्यावा.

(Disclaimer - टर्म इन्श्युरन्स प्लान संदर्भात ही प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्ष विमा काढण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)

हे ही वाचा


Post a Comment (0)
Previous Post Next Post