शिक्षक दिन भाषण | Shikshak Din Bhashan In Marathi

शिक्षक दिनशिक्षक दिन ५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा होत असतो. त्यानिमिताने शिक्षक दिनाचे महत्व , त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा , कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये निबंध लेखन , कार्यक्रमासाठी शिक्षक दिनाचे महत्व जाणून घेणे आवश्यक असते. त्यामध्ये शिक्षक दिनावर भाषण कसे करावे? काय बोलावे? असे प्रश्न आपल्याला पडतात. आज आपल्याला शिक्षण मित्र या वेबसाईटवर शिक्षक दिन विषयी भाषण (Shikshak Din Bhashan In Marathi) यावर लेख वाचायला मिळणार आहे. त्यामध्ये शिक्षक दिन या विषयावरील भाषणाची सुरुवात कशी असावी? शिक्षक दिन ५ सप्टेंबर दिनाचे महत्व काय आहे? शिक्षक दिन ५ सप्टेंबर या दिवशीच का साजरा केला जातो? शिक्षकाचे महत्व? या विषयाचे प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळणार आहे. सोबतच काही उदाहरणे देखील आपल्याला भाषण करण्यासाठी मिळणार आहे.

शिक्षक दिन भाषण | Shikshak Din Bhashan In Marathi

Shikshak Din Bhashan In Marathi


नमस्कार 

आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन  आदरणीय व्यासपीठ , व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र/मैत्रीणींनो सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

सर्व गुरुजनांना वंदन करतो/करते. आणि आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन माझ्या भाषणाला सुरुवात करतो/करते.

5 सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होण्याचे भाग्य त्यांना मिळाले. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षणाबद्दल प्रेम , जिव्हाळा होता. त्यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. 

शिक्षकांचे योगदान हे राष्ट्र घडवण्यामध्ये महत्वाचे आहे. समाजाचा विकास हा सत्तेने किंवा यंत्राने होत नाही तर आदर्श शिक्षकांमुळे समाजाचा विकास होतो. 

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा , सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. शिक्षकांचे महत्व जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार  नाही. एवढे महत्व शिक्षकांचे आहे. 

त्यांच्या या कार्याबद्दल शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस आपल्या गुरू (शिक्षकांबद्दल) आभार, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपण साजरा करीत आहोत. 

५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याच्या पाठीमागे काय आहे इतिहास ? | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काढलेले उदगार

शिक्षक दिन 5 सप्टेंबर या दिवशीच साजरा करण्यामागे एक रंजक प्रसंग आहे. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे जेव्हा आपल्या देशाचे राष्ट्रपती पदावर विराजमान असताना , काही विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची ईच्छा त्यांच्यापुढे मांडली.

यावर डॉ. राधाकृष्णन यांनी त्यावर उत्तर दिले की, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करून माझा जन्मदिवस साजरा केला तर मला सर्वाधिक आनंद होईल. 

तेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षाचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्व आहे. त्यामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यामध्ये महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना ते म्हणतात की,

     विद्ये विना मती गेली। 

     मती विना निती गेली॥

     निती विना गती गेली।

     गती विना वित्त गेले।।

     वित्त विना शुद्र खचले। 

एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

शिक्षणाचे महत्व त्यांनी समाजाला पटवून दिले. शिक्षण घेण्याचे ज्ञानमंदिर म्हणजे आपली शाळा आणि शाळेतून मिळणारे ज्ञान हे आपल्याला आपले शिक्षक देत असतात. भविष्यातील भावी पिढीचा शिल्पकार कोण असेल तर ते म्हणजे शिक्षक होय. 

समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण काम देखील शिक्षक करत असतात. समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक म्हणजे आपले शिक्षक आहे. 

देव आणि गुरु जर एके ठिकाणी उभे असतील तर शिष्य प्रथम कोणाला नमस्कार करेल? याचं उत्तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार 'गुरु' असं आहे. कारण का? तर गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय आपल्याला देव भेटू शकेल का? तर नाही. एवढे महत्व गुरूना आहे. आपल्या शिक्षकांना धन्यवाद देण्याचा हा दिवस त्यांच्या गौरव/सन्मान करण्याचा हा दिवस म्हणजे शिक्षक दिन आपण साजरा करत आहोत. 

भविष्यातले कलाकार, लेखक, विचारवंत,  तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून विविध प्रतिकृती तयार करत असतो. अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. 

एका राजाची प्राचीन काळातील गोष्ट आपल्याला सांगतो. आणि थांबतो. 

समाज परिवर्तनामध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या माणसाचा सत्कार त्या राज्याला करायचा होता. एके दिवशी राजाने समाजातील सर्वाना याबाबत दवंडी देऊन दरबारात उपस्थित रहायला सांगितले. 

दरबार भरला, आणि या दरबारामध्ये सर्व प्रकारचे लोक त्यामध्ये सहभागी झाले. त्यामध्ये काही नामांकित वैद्य, काही दानशूर व्यक्ती, व्यापारी, समाजसेवक हे सर्व त्यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी आपणच सन्मान मिळवण्यासाठी का पात्र आहोत? अशी त्यांनी आपआपली बाजू मांडली.

परंतु राजा काही प्रभावी झाला नाही, शेवटी  एक वृद्ध व्यक्ती दरबारामध्ये होता आणि त्याने आपण शिक्षक असल्याचे त्यांना सांगितलं, हे ऐकून राजा सिंहासनावरून खाली उतरला आणि त्या शिक्षकांसमोर आदराने वाकला म्हणजे त्यांचा नमस्कार केला. समाजाचे भवितव्य घडवण्याच्या कामात शिक्षकांचा सहभाग सर्वात जास्त असतो. यावर राजा प्रभावित झाला. आणि त्या शिक्षकाचा सन्मान केला. 

आजचा दिवस म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस आणि तो भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती च्या दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. अशा या महान गुरुजनांना नमन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी इथे थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची (भाषण) करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार व धन्यवाद !

हे ही वाचा
नवनविन अपडेट साठी 'शिक्षण मित्र' या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post