गणपती बाप्पा कडून मुलांना शिकवा या 5 गोष्टी
हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचे स्थान असणारा गणपती उत्सव सध्या संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपणास गणपती बाप्पा कडून शिकण्यासारख्या कोणत्या पाच गोष्टी आहेत? ते जाणून घेणार आहोत.
1.गणपती चे मोठं डोकं
गणपती बाप्पाचे मोठे डोकं सांगतं की मोठा विचार करायला शिका.
2 गणपतीचे बारीक डोळे
गणपती बाप्पाचे बारीक डोळे सांगतात बारकाईने अभ्यास करायला शिका.
3. गणपती चे मोठे कान
गणपती बाप्पाचे मोठे कान सांगतात की लक्षपूर्वक ऐकायला शिका.
4. गणपती बाप्पाची सोंड
गणपती बाप्पाची सोंड पाहून आपल्याला शिकायला मिळते की, परिस्थिती कशीही असली तरी ती स्वीकारता आली पाहिजे. संकटांचा सामना करता आला पाहिजे.
5. गणपती बाप्पाचे वाहन
गणपती बाप्पाच्या वाहन म्हणजे उंदीर मामा यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या ईच्छा , आकांक्षा मर्यादित असायला हव्यात.
गणपती बाप्पा कडून मिळालेली शिकवण
आई-वडिलांचा (पालकांचा) नेहमी आदर ठेवावा.
जेव्हा गणपती बाप्पा आणि त्यांचा भाऊ या दोघांमध्ये स्पर्धा ठेवली गेली. या विश्वाची प्रदक्षिणा सर्वप्रथम कोण पूर्ण करेल? तेव्हा गणपती बाप्पांनी आपल्या आई-वडील म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि सांगितले की, आपणच माझे विश्व आहे.