शिक्षक दिन निबंध मराठी

shikshak din marathi nibandh


{tocify} $title={Table of Contents}

शिक्षक दिन निबंध मराठी | Shikshak Din Nibandh Marathi

प्रस्तावना

गुरु-शिष्य यांचं नातं भारतात प्राचीन काळापासून आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण घेतले जायचं. आता आपण शाळा-कॉलेजेस मध्ये जाऊन शिक्षण घेतो. यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणजे 'शिक्षक' गुरुकुल पद्धती किंवा आताची शिक्षण पद्धती  यामध्ये शिक्षकाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे.

शिक्षकांच्या हातात देशाचं भविष्य असतं हे आपण वाचतो. आणि हे अगदी खरं आहे. शिक्षणामुळेच तर देशाचे भावी डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, लेखक, खेळाडू तसेच इतर विविध क्षेत्रामध्ये प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडविण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. 

शिक्षक दिन कधी साजरा केला जातो?

५ सप्टेंबर हा दिवस देशभरात दरवर्षी 'शिक्षक दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्व शिक्षकांचे आदर्श थोर शिक्षण तज्ञ, मानवतावादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक व वक्ते, राजकारण समाजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक तसेच भारताची प्रतिमा विदेशातून सांगणारे महान तत्वचिंतक होते. त्यांना शिक्षकांविषयी प्रचंड आदर व प्रेम होते त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून भारतभर साजरा केला जातो. 

शिक्षक दिन महत्व 

'शिक्षक दिन' हा राष्ट्राच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. शिक्षकांमुळे देशाचे भावी डॉक्टर , इंजिनीयर, शास्त्रज्ञ, लेखक, खेळाडू तसेच इतर विविध क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते.

शिक्षक दिन हा राष्ट्राच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी कष्ट करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. शिक्षकांमुळे देशाचे भावी डॉक्टर , इंजिनीयर, शास्त्रज्ञ, लेखक, खेळाडू तसेच इतर विविध क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते.

शिक्षक हा ज्ञानाचा तसेच पावित्र्याचा विशाल समुद्र असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत निस्वार्थीपणे शिक्षक पोचवितात. ते विद्यार्थ्‍यांच्‍या अंगभूत कलागुणांचा सर्वांगिन विकास करण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.

शिक्षक आपल्या जीवनातील आव्हानांना सामोर जाण्यासाठी तयार करतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यापासून सुंदर मडकी घडवतो. त्या प्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम भावी नागरिक घडवण्याचे महान कार्य करतात.

'शिक्षक दिन' हा आपल्याला संस्कारमय नागरिक बनवलेल्या महान शिक्षकांना वंदन करण्याचा दिवस आहे. या दिनी आपण गुरूंना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्यासाठी प्रयत्न करूया.


शिक्षक/मास्तर म्हणजे काय?

आपल्याला माहित असेल, खूप पूर्वीपासून शिक्षक या शब्दाऐवजी विविध शब्द वापरले गेले. त्यामध्ये गुरु, गुरुजी, शिक्षक,सर, प्राध्यापक, ग्रामीण भागामध्ये मास्तर हा एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने 'मास्तर' या शब्दाची व्याख्या एका कार्यक्रमात ऐकली ती आपणाला सांगत आहे.

मास्तर म्हणजे काय?

मातेच्या स्तरावर जाऊन मुलांचा विचार करणे.

ज्याप्रमाणे आई सर्व अडचणींवर मात करते. काय हव , नको ते सर्व अडचणीचे तिच्याकडे सोल्युशन असते. आपल्या मुलांना, ती कुठलीच अडचण येऊ देत नाही, आली तरी ती पहिल्यांदा उभी राहते. सगळा त्रास तीच सोसते. आणि मग  ती मुलांना घडवते, तर ह्या सगळ्या गोष्टीं एका आईच्याआहेत. प्रेम, काळजी, जबाबदारी हे सगळ आईकडे असते. म्हणून म्हंटले कि, मास्तर शब्दाची खूप सुंदर व्याख्या मातेच्या स्तरावर जाऊन मुलांचा विचार करणारा शिक्षक अशा सर्व शिक्षकांना आदरपूर्वक वंदन करून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेछ्या !

शिक्षक दिन कसा साजरा करतात?

शिक्षक दिनानिमित्त शासन स्तरावर शिक्षकांचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येते. त्यामध्ये गतवर्षी  #ThankATeacher हे अभियान राबविण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर या चालू शैक्षणिक वर्षामध्ये देखील Thank A Teacher अभियानाअंतर्गत 'शिक्षक कार्य गौरव सप्ताह' साजरा करण्यात येत आहे.

त्यामध्ये शालेय स्तरावर निबंध लेखनकाव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध  स्पर्धा, कार्यक्रम घेऊन विद्यार्थी आदरणीय गुरुजन विषयी आपल्या भावना यानिमित्ताने व्यक्त करतात. त्याचबरोबर शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग असतो.

सदर कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य सोशल मिडिया Facebook, Twitter, Instagram वर Facebook- @thxteacher, Twitter-@thxteacher, Instagran-@thankuteacher  अशा प्रकारे टॅग करुन अपलोड करण्यात येते. सोबतच खालील हॅशटॅग (#) चा वापर करण्यात येतो.

#ThankATeacher
#ThankYouTeacher
#MyFavouriteTeacher
#MyTeacherMyHero
#ThankATeacher2021


Post a Comment (0)
Previous Post Next Post