Shrikrishna Janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमी

Shrikrishna Janmashtami


Shrikrishna Janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमी 

कृष्ण जन्माष्टमीगोकुळ अष्टमी हा सण श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी या तिथीला सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आणि म्हणूनच मध्यरात्री 12 वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाण्यात ठेवून पूजा केली जाते.  अस म्हणतात, मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मामा कंस याचा वध करण्यासाठी भगवान विष्णुने हा अवतार धारण केला होता. भारतात Shrikrishna Janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

गोपाळकाला | Gopalkala 

श्रीकृष्ण जन्माष्टमी  उत्सवासाठी बनवण्यात येणारा प्रसादाला आपण गोपाळकाला असे म्हणतो.  गोपाळकाला या पदार्थाचा पोहे, लाह्या, काकडी, खोबरे, दही, साखर, मीठ हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून त्यावर फोडणी दिली जाते.

गोपाळ म्हणजेच गाईंचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिसळणे, तर असं मानलं जातं जेव्हा कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गाई चरवण्यासाठी यमुना नदीच्या तीरावर जात असे,, तेव्हा सर्वजण एकत्र येऊन गोपाळकाला हा पदार्थ बनवून खात असत, आणि म्हणूनच आपण गोपाळकाला हा पदार्थ कृष्ण जन्माष्टमी प्रसाद म्हणून आवर्जून बनवतो.

दहीहंडी | Dahihandi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. असे मानले जाते कृष्णाला दही, तूप लोणी हे पदार्थ आवडत असे आणि हे पदार्थ मिळताच तो पटापट संपून त्याची हंडी रिकामी करून ठेवत असे आणि म्हणूनच त्याची आई म्हणजेच यशोदा या हंड्या उंचावर ठेवत असे, परंतु तो आपल्या मित्रांच्या सहाय्याने एकामेकावर चढून दहीहंडी पर्यंत पोहोचायचा, आणि ही हंडी फोडून त्यातले पदार्थ एकत्र बसून सर्वजण खात असत. आणि म्हणूनच बाळकृष्णाच्या या लीलांच्या आठवणी खातर आपण दहीहंडी हा सण साजरे करतो. 

'गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला' असे गाणे गात अनेक लहान, थोर, पुरुष घरोघरी नाचायला जातात. व दहीहंडी फोडतात. तर दहीहंडीच्या दिवशी एका हंडीमध्ये दही, दूध,, लोणी, तूप, साखर, फळ असे पदार्थ मिश्रण करून ती हंडी आपण उंचावर दोरीच्या सहाय्याने बांधतो. आणि मग ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. दहीहंडी फोडणाऱ्या ना आपण गोविंदा असे म्हणतो. आणि हेच गोविंदा, ‘गोविंदा आला रे आला’ असं म्हणत या हंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात’. आणि ती दहीहंडी फोडून टाकतात.

Post a Comment (0)
Previous Post Next Post