ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी

online shikshan nibandh in marathi


ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | online shikshan nibandh in marathi

करोना सारख्या महामारी च्या काळात केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात शिकण्याच्या नवीन पद्धती स्वीकारणे शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेला अपरिहार्य झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सध्यातरी कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचा वापर करण्यासाठी एक संधीच मिळालेली आहे. खूप पूर्वीपासून ऑनलाईन शिक्षणावर प्रगत राष्ट्रांमध्ये भर देण्यात येत आहे. आणि त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी सुविधा देखील तेवढ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले आहे. परंतु आपल्या देशाचा विचार करता अजूनही ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा पोहोचू शकलेल्या नाहीत किंवा असा एक घटक आजही त्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकत नाही. किंवा लॅपटॉप, टेलिव्हिजन, टॅब इत्यादी साहित्य देखील काही पालकांकडे आजही उपलब्ध दिसत नाही विशेषता ग्रामीण भागांमध्ये या समस्या आढळून येतात. मात्र प्रगतीकडे वाटचाल करत असताना हे चित्र हळूहळू बदलत आहे.

>>  स्वाध्याय उपक्रम लिंक | ConveGenius Web App Scert Swadhyay Link 2022

>> माझी शाळा निबंध मराठी  My School Essay in Marathi

>> छत्रपती शिवाजी महाराज निबंध

जगभर पसरलेला कोरोना मुळे वातावरण अस्थिर झाले आहे. वर्गामध्ये बसून शिक्षण घेत असताना विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये संवाद होत असायचा, परंतु कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना संकट जगभर असल्यामुळे मुलांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेता येत नाही. परंतु शिक्षण थांबून कसे चालेल, कोरोनाचे संकट जरी असले तरी, मुलांचे शिक्षण थांबवून चालणार नाही.

या महामारीच्या काळात पहिल्यांदाच मुलांच्या शिकण्याच्या व शिक्षणाच्या पद्धतीत बऱ्याच अंशी बदल झाले आहेत. यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे आई-वडील, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण व्यवस्था यांना ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व समजू लागले आहे. या महामारी च्या काळात शाळा बंद ठेवत असताना शिक्षण बंद ठेवता येणार नाही. आणि शिक्षण बंद ठेवायचे नसेल, मुलांचे शिक्षण सुरु ठेवायचे असेल तर मुलांना ऑनलाइन शिक्षण देणे गरजेचे झाले आहे. आणि हाच पर्याय सध्या तरी आहे. या कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांचाच ऑनलाईन शिक्षण पद्धती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. हे विशेष महत्त्वाचे आहेत. आज सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणानंतर भविष्यात शिक्षणाचे एक नवीन स्वरूप समोर येईल आणि या स्वरूपात मुले शाळेच्या वर्गात बसतील आणि ऑनलाईन शिक्षण घेतील हा आपल्या सर्वांसाठी एक सकारात्मक बदल असेल, मुले शाळेत शिकतील व त्यानंतरचे त्यांचे शिक्षण ऑनलाइन शिकवणीवर आधारित असेल. 

आज देशात जवळपास तीस कोटी मुले बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. आपल्याकडे संपूर्ण शिक्षण व्यवस्था परीक्षा पद्धतीवर काम करीत असल्यामुळे मुले आपल्या पुस्तकातील अभ्यासाचे पाठांतर करतात आणि आपल्या बुद्धीच्या आधारावर परीक्षेत उत्तरे लिहिताना या कारणामुळेच मुलांना त्यांच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागते. पण आता ऑनलाईन शिक्षणाच्या काळात गुणवत्तेशी तडजोड करायची गरज नाही डिजिटल माध्यमांमुळे मुलांना दुरूनच चांगल्या शिक्षकांकडून शिकण्याची संधी मिळते. त्यांची लाईव्ह सेशन होतात. 

या शिक्षणामुळे मुले आपल्या शंका विचारू शकतात. ऑनलाईन शिक्षणामध्ये प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. आज देशभरात विद्यार्थ्यांना ठरलेल्या वेळेत ऑनलाइन वर्ग घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षक शिकवतात. लाईव्ह चॅट होत असते, आणि शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यापेक्षा अधिक व्यक्तिगत पातळीवर संवाद होतो. प्रत्येक शिक्षक व्यवस्थित व्यक्तिगत पातळीवर विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात. विद्यार्थ्यांना सगळ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी शिक्षक नवनवीन प्रयोग करून शिकवत आहे. 

शाळा कॉलेज बंद ठेवल्यामुळे मुलांचे जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते. हे आपण अनुभवले आहे. शाळा कॉलेज बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण हा खूप चांगला पर्याय आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा उपयोग खूप वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाइन शिक्षण पद्धती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑनलाइन शिक्षण का गरजेचे आहे? हे आपल्याला या covid-19 च्या काळात समजण्यास मदत झाली आहे. या काळात भरपूर ऑनलाइन वर्ग सुरू करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून मुलांचे शिक्षण सुरु राहावे याकरिता, म्हणून शिक्षक प्रयत्न करतआहेत. ऑनलाइन पद्धतीमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संपर्क साधता आला, आणि त्याचबरोबर पालकांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. वेळोवेळी ऑनलाईन माध्यमांचा द्वारे मीटिंग घेऊन पालकांना विद्यार्थ्यांची प्रगती सांगता येऊ लागली आहे.

आजच्या काळात कोणतीही एक पद्धत वापरून सर्व विद्यार्थ्यांना शिकवले जाऊ शकत नाही. ऑनलाइन शिक्षण पद्धतीत वेळेवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिक्षक आणि पालकांच्या दर महिन्याला नियमितपणे मीटिंग होत आहेत. विद्यार्थ्यांना विशिष्ट कालावधीसाठी स्वाध्याय दिले जात आहेत. दर पंधरा दिवसांनी क्विज व तोंडी परीक्षा देखील घेतल्या जात आहेत. आपल्या महाराष्ट्रातील अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे वैविध्य आणताना हे शिक्षण  आनंददायी रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांच्या आवडीनिवडींचा विचार करून अभ्यासक्रम तयार केला जातो आहे. 

असे म्हणतात मुले स्वतःच्या इंद्रियांनी जास्त शिकत असतात आणि त्यामध्ये 75% यांचा सहभाग असतो त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मोठा फायदा मुलांना होतो आहे एकीकडे मुलांच्या डोळ्यांवर त्यांच्या मनावर सतत मोबाइलवर डिजिटल पद्धतीने शिक्षण यामुळे ताण येतो असे म्हटले जात असले तरी याचे योग्य व्यवस्थापन केले तर ऑनलाइन शिक्षण हे नव्या युगासाठी एक मोठे वरदानच ठरेल यात शंका नाही. प्रत्येक मुलाची गरज ओळखून त्यानुसार ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. काही मुलांना ऐकून चांगले समजते, तर काहीना पाहून तर काही मुलांना प्रत्यक्ष कृती करून या मुलांच्या अध्ययन शैली चा विचार करून समग्र विचार ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये होणे आवश्यक आहे.  

मुलांना व्हिडिओ ॲनिमेशन च्या माध्यमातून एखादी गोष्ट चटकन समजते सध्याची मुले मुले अशा प्लॅटफॉर्मवर शिकत आहेत. ज्या माध्यमातून ते लवकर समजू शकतात आणि त्यांची त्यांना सवय लागत आहे. ऑनलाइन शिक्षण आणि या शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले अत्यंत दर्जेदार साहित्य हे येणाऱ्या काळात मुलांसाठी वरदान करेल आणि म्हणूनच ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज झाली आहेच पण त्याही पुढे जाऊन आपापल्या या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या आवडीनिवडी जपत त्यांना अधिक सक्रीय करता येईल आणि विशेष म्हणजे नव्या युगाच्या शिक्षणाची हीच तर मागणी आहे म्हणून चला ऑनलाईन शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू या आणि स्वीकारू या ऑनलाईन शिक्षण काळाची गरज.

हे सुद्धा वाचा


1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post