'शिक्षक दिन' 5 सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गुरू-शिष्य परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान महत्वाचे आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी , योग्य मार्ग दाखवण्यासाठी गुरूंची आपल्याला मदत मिळते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षक करत असतात. अस म्हणतात की, देशाचा विकास हा देशाच्या शिक्षण पद्धती वर अवलंबून असतो. त्यातही शिक्षणाचे धडे देण्याचे , विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या कामाचा गौरव केला जातो. आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय , राज्य, जिल्हा स्तरावर चांगल्या कामाची पोच पावती ही सन्मान केल्याने मिळत असते. ज्याप्रमाणे आपण वर्षभरात विविध दिन साजरे करतो. त्यात एक दिवस म्हणजे शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आजच्या या माहितीचा उपयोग आपणास शिक्षक दिन भाषण , निबंध लेखन करण्यासाठी होईल.
{tocify} $title={Table of Contents}
शिक्षक दिन निबंध | Teacher Day Essay In Marathi
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
गुरू-शिष्याचे नाते हे खूप प्राचीन काळापासून चालत आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. बालवयात घरात आई-वडिलांकडून संस्काराचे धडे गिरवले जाते. शाळेत गेल्यानंतर शिक्षक हेच मुलांना घडवण्याचे काम करत असतात.
शिक्षक दिन भारतात कधी साजरा केला जातो?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षाचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
जीवनामध्ये योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून घडते. यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. एवढे महान कार्य शिक्षकांच्या हातून घडते. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे आपल्याला दिसते. या महान गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक दिन 5 सप्टेंबर लाच का साजरा केला जातो?
वर्षभरामध्ये आपण विविध दिन साजरे करतो. आणि प्रत्येक दिवसाला एक महत्व आणि इतिहास असतो. त्याप्रमाणे भारतात 5 सप्टेंबर या दिवशी 'शिक्षक दिन' साजरा करतात. यामागे देखील एक इतिहास आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिवसाचे महत्व असे आहे की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी असतो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राजकारणामध्ये तसेच शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षकांचा शेवटपर्यंत आपला कामाचा ठसा उमटविला त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपदी झाल्यानंतर त्यांना एकदा विद्यार्थ्यांनी विचारलं की, आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यावर त्यांनी उत्तर असे दिले की, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करून माझा जन्मदिवस साजरा केला तर मला सर्वाधिक आनंद होईल. तेव्हा त्यांचा जन्मदिवसाच्या दिवशी शिक्षकांचा सन्मानाचा दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक दिन कसा साजरा केला जातो?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ही 5 सप्टेंबर या दिवशी असते त्यानिमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन हा साजरा करण्यात येतो.
शाळेमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेतील काही मुलांना शिक्षक मुख्याध्यापक वर्गशिक्षक विषय शिक्षक शाळेतील इतर कर्मचारी या सर्वांची भूमिका साकारण्यात येते आणि मुलांना या दिवशी शाळा चालवण्याची जबाबदारी दिली जाते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांना एक दिवस शाळा चालवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते त्याचबरोबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शाळा स्तरावर मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थी साजरा करतात.
शिक्षण क्षेत्रातील शिक्षणतज्ञ इतर कर्मचारी, अधिकारी वर्ग आणि विशेष म्हणजे शिक्षक यांच्यासाठी हा दिवस एक उत्साहाचा दिवस असतो. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षण क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव , सन्मान केला जातो.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध वयोगटातील व्यक्ती आपल्या गुरू बद्दल, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानतात. त्यांचे आशीर्वाद घेतात.
शिक्षक दिनाच्या दिवशी समाजामध्ये समाज प्रबोधन केले जाते. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षक दिन साजरा केला जातो.
सारांश
भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता त्यांचे आभार मानण्याचा तसेच आदर्श शिक्षकांचा गौरव, सन्मान करण्याचा हा दिवस म्हणजे 'शिक्षक दिन' संपूर्ण भारतभर या दिवशी शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.
हे ही वाचा