राज्यातील पहिली व दुसरीला एकच पुस्तक या शाळेत राबविणार पायलेट प्रोजेक्ट !

विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता 1 ली व 2 री साठी एकात्मिक पुस्तकाचा प्रयोग हाती घेतलेला आहे.

नवीन शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व विषयाचा अभ्यास एकाच पुस्तकांमध्ये असणार आहे. या पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित आदी विषयांचा समावेश असणार आहे.
पहिली व दुसरीला एकच पुस्तक

पाठ्यपुस्तकांचे वजन कमी करण्यासाठी पायलेट प्रोजेक्ट बालभारती कडुन अशा पुस्तकांच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमधून दोन तालुक्यांमध्ये हा प्रयोग असणार आहे.

महत्वाचे-

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट फक्त जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांसाठी असणार आहे.

तसेच इयत्ता तिसरी व सातवीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी अशाच प्रकारचा प्रयोग करण्याचा मानस आहे.

विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे या संकल्पनेनुसार यामधून चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यास याची मदत होणार आहे.

आणखी वाचा



Post a Comment (0)
Previous Post Next Post